सध्या आपलं आयुष्य थोडं थोडं का होईना वळणावर येईल की काय अशी परिस्थिती आहे. अचानक आलेल्या क’रोना ने गेल्या दोन ते अडीच वर्षांत सगळ्यांना अगदी धुपवलं आहे. त्यामुळे जीवनगाडा ओढताना आता प्रत्येकाची ओढाताण होते आहे. परिस्थिती सुधारावी यासाठी प्रत्येक जण धावपळ करतो आहे. जे गेलं ते गेलं, निदान यापुढील काळ व्यवस्थित रहावा या इच्छेने सगळे कामाला लागलो आहोत. पण शेवटी किती करणार हो ! मन आणि शरीर थकून जातंच ना. पुन्हा काम करण्यासाठी थोडी विश्रांती तर हवी आणि सोबत विरंगुळा ही हवाच.
आता विश्रांती कधी आणि कुठे घ्यायची हे आपण स्वतः ठरवु शकता. पण विरंगुळा म्हंटलं की काय करायचं हा प्रश्न उभा राहतो. एखादा व्हिडियो बघावा किंवा कोणता एखादा लेख वाचवा किंवा अजून काही मनोरंजन करून घ्यावं असं वाटून जातं. पण प्रत्येकवेळी समोर दिसेल ते आपल्याला आवडेलच अस नसत. पण आमची टीम असताना चिंता कशाला ! आतापर्यंत आपल्या टीमने अनेक विषयांवर लेखन केले आहे. त्यातही वायरल व्हिडियोज म्हणजे तर आपल्या वाचकांचा आवडता विषय आहे. त्यामुळे व्हिडियो आणि लेख असं डबल धमाल मनोरंजन आपली टीम आपल्या भेटीस घेऊन येत असते. त्यातून आपल्या वाचकांना काय आवडतं याची कल्पना एव्हाना आमच्या टीमला आली आहे.
यातूनच मग आज सारखा एखादा व्हिडियो हाताला लागला की मग बघायला नको. मस्त मजा येऊन जाते. हा व्हिडियो खरं तर चार ते पाच वर्षे जुना आहे. पण आजही त्यातील कंटेंट जबरदस्त आहे. आता कंटेंट काय आहे तर तो आहे एका पोराचा जबरदस्त डान्स होय. असा जबरदस्त की तुमच्या खिशातील पैसे निघालेच पाहिजेत आणि त्यांचा वर्षाव झाला पाहिजे. आपण तर केवळ याबद्दल जाणून घेताय. पण ज्यांनी हा डान्स खुद्द बघितला आहे त्यांना तर आवडून गेला आहेच. त्यातील एका काकांनी तर त्या पोरावर पैशेच ओवाळून टाकले होते. अहो हा व्हिडियो आहेच असा मस्त ! बरं हे पोरगं लय झिंगाट नाचत. एकतर ‘तेरे कदमो मैं सारा जमाना, फिरता हुं आवारा’ हे जुनं असलं तरी उडत्या चालींचं गाणं लागलेलं असतं. त्यावर व्हिडियो सुरू झाल्यापासून हा पोरगा अगदी मस्त नाचत असतो. काय त्याच्या एकेक स्टेप्स बघाल. फुल फिदा होऊन जाल. त्यात मध्ये एकदा मिथुन चक्रवर्ती यांची ही एक स्टेप येऊन जाते. पण बाकी राडा सगळा भाऊंचाच असतो. फुल मूड मध्ये येऊन आणि गाण्याची मजा लुटत हा नाचत राहतो. असा काही नाचतो की आजूबाजूला असलेली चिल्ली पिल्ली त्याला येऊन मिळतात. ती ही नाचायला लागतात.
पण याचं लक्ष फक्त स्वतःच्या नाचण्यावर असतं. त्यामुळे त्याच्या पाठी असलेल्या पोरांमध्ये न नाचता त्याचा आपला आपला डान्स चालू असतो. अर्थात त्याचा उत्साह ही एवढा असतो की आपसूक त्याचं ते वेगळेपण दिसून येतं. आपणही जर हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही त्याचा उत्साह आवडला असेल. पण आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर जरूर बघा. आपली टीम हा व्हिडियो खाली शेअर करेलच. वर म्हंटल्याप्रमाणे या लेखाप्रमाणे या व्हिडियोचा ही आस्वाद घ्या आणि डबल धमाल आनंद अनुभवा.
बरं तर मंडळी आता पुरती निरोप घेण्याची वेळ आली आहे. हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :