Breaking News
Home / मनोरंजन / ह्या भावाने बहिणीच्या लग्नात ‘तारों का चमकता गेहना’ गाण्यावर केलेला डान्स होतोय वा’यरल, बघा व्हि’डीओ

ह्या भावाने बहिणीच्या लग्नात ‘तारों का चमकता गेहना’ गाण्यावर केलेला डान्स होतोय वा’यरल, बघा व्हि’डीओ

लग्नातील डान्स चे व्हिडियोज वायरल होतात हे आपण सगळे जाणतोच. गेल्या काही काळापासून मराठी गप्पाच्या टीमने यावर सातत्याने लेखन केललं आहेच. त्यात खासकरून भरणा दिसून येतो ते स्वतःच्या लग्नात मस्त मजा घेत डान्स करणाऱ्या नवरा नवरीचा. त्यामुळे स्वतःच्या लग्नात नवरा नवरी अवघडून बसलेत हे चित्र जवळपास पालटलं आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. आनंदच आहे. पण लग्नात केवळ नवरा नवरी, त्यांचे मित्र मैत्रिणी एवढेच थोडे असतात. लग्नात नवरा नवरीच्या भावा बहिणींना मानाचं स्थान असतं. पण बरेच दिवस झाले या विषयावर काही लिहावं अशी इच्छा होती पण काही ना काही कारणाने राहून जात होतं. पण इच्छा तिथे मार्ग निर्माण होतोच. तसंच काहीसं झालं आणि कसा काय तो आज पाहिलेला व्हिडियो आपल्या टीमसमोर पुन्हा आला. मौका भी है और दस्तुर भी असं म्हणत आमच्या टीमने मग यावर लिहायला घेतलंय आणि आजचा हा मस्त लेख तयार होतोय.

हा व्हिडियो जवळपास तीन वर्षे जुना आहे. हा व्हिडियो अपलोड केला आहे डॉ. अभिषेक शर्मा यांनी. काही वर्षांपूर्वी ते त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. नेहा यांच्या सोबत लग्नबंधनात अडकले. एक युट्युबर म्हणूनही कार्यरत असणारे डॉ अभिषेक यांनी आपल्या लग्नातील एक व्हिडियो तीन वर्षापूर्वी शेअर केला आणि तो तुफान वायरल झाला. इतका की आजतागायत जवळपास ३ कोटी लोकांनी हा व्हिडियो पाहिला आहे. पण काय खास आहे व्हिडियोत?

अहो खासच खास आहे हा व्हिडियो. कारण डॉ नेहा यांच्या भावाने यात आपल्या बहिणीबद्दल असलेलं प्रेम या निमित्ताने व्यक्त केलं होतं त्याचा हा व्हिडियो आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा हा भाऊराया आपल्या बहिणीला हात धरून घेऊन येतो आणि डान्स सुरू होतो. पाठी उदित नारायण यांच्या आवाजातलं ‘तारो का चमकता गेहना हो’ हे गाणं वाजत असतं. या गाण्यातील शब्दांना तोलामोलाच्या भावना भावा बहिणीच्या मनात उचंबळून येत असतात. ज्या बहिणीवर जीवापाड प्रेम केलं त्या बहिणीचं लग्न होताना बघताना त्याला आनंद वाटत असतोच. त्याच्या डान्स मधून तो आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो.

बऱ्याच अंशी तो यशस्वी ही होतो. आपल्या भावाच्या मनातील भावना ओळखून ताईची अवस्था ही कौतुक, आनंद आणि जुन्या आठवणींचा मेळ अशी झालेली असते. बरं यात आवडणारी बाब अशी की इतर उपस्थितांनाही या डान्स मध्ये सहभागी करून घेतलं जातं. दोनदा ही सभोवतालची मंडळी नवपरिणीत जोडप्याभोवती मस्त फेर धरत रिंगण करतात. छान वाटतं. तसेच यात डॉक्टर साहेबही सहभागी असतात. त्यांच्याही चेहऱ्यावर मेव्हण्याविषयी कौतुक दिसत असतं. हा व्हिडियो जवळपास पाच मिनिटं चालतो पण आनंद देऊन जातो. नवरा नवरी लग्नात धमाल डान्स करतात हे पाहून आणि त्याविषयी लिहून त्याची सवय झाली होती. पण या व्हिडियोच्या निमित्ताने काहीसा वेगळा व्हिडियो बघायला मिळाला आणि लिहिण्याची संधी सुद्धा याचा आंनद आहे.

आम्ही जसा या व्हिडियोचा आनंद घेतला तसाच आनंद तुम्ही या लेखातून घेतला असेल अशी अपेक्षा आहे. पण केवळ हो असं म्हणू नका. कारण आपली टीम तुमच्यासाठी खास असे लेख लिहीत असते. त्यात वायरल व्हिडियोज, कलाकारांविषयीचे लेख, सामान्य ज्ञान आणि बऱ्याच विषयांवर लेखन केलेलं असतं. केवळ तुमच्यासाठी. ते दररोज प्रसिद्ध ही होतं. तेव्हा या नवनवीन लेखांचा आनंद घेतल्याशिवाय जायचं नाही. आपला आणि मराठी गप्पाचा वाढता स्नेह आम्हाला आनंद देऊन जातो आहे. आमच्यावर असलेला लोभ असाच कायम ठेवा. मनापासून धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *