Breaking News
Home / मनोरंजन / ह्या भावा-बहिणीचं निरागस भांडण पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

ह्या भावा-बहिणीचं निरागस भांडण पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

लहान मुलं म्हंटली की त्यांच्यातील मजा, मस्ती, मस्करी, खोड्या या सगळ्यांची गंमत वाटते. एवढंच काय त्यांच्यात होणारे वाद सुद्धा चेहऱ्यावर हसू उमलवून जातात. त्यात हे वाद जर लहान बहीण भावा मध्ये होत असतील तर अजूनच मजा. कारण त्यांच्यात तर क्षणाक्षणाला भांडणं होत असतात. अर्थात हे सगळं लुटुपुटूचं असतं. नंतर यांच्यापैकी जर कोणाला त्रास झाला तर दुसरं भावंडं आपोआप पाहिल्याच्या जवळ जात आणि काळजी घेतं. आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे आपल्या टीमने पुन्हा पाहिलेला एक वायरल व्हिडियो. पुन्हा म्हणण्याचं कारण हा व्हिडियो दोन वर्षे जुना आहे आणि जेव्हा वायरल झाला होता तेव्हा आपल्या टीमने पाहिला होता. पण त्यावेळी लिखाण केलं नव्हतं. पण आज मात्र त्यावर लिखाण करावं असं ठामपणे वाटलं आणि आजचा हा लेख लिहिला जातो आहे. हा व्हिडियो आहे दोन पंजाबी भाऊ आणि बहिणीमधील लुटुपुटूच्या भांडणाचा. बरं त्यात अडकलेत त्यांचे वडील. पण त्यांच्यामुळेच भावा बहिणीचं हे गोड भांडण आपल्यापर्यंत पोहोचतं.

व्हिडियोला सुरुवात होते तेव्हा यातील भाऊ जो वयाने मोठा आहे तो समोर येतो. मग त्याच्या पाठी त्याची छोटी बहीण येते. दोघेही गोड दिसत असतात हे नमूद करायला हवं. तर, त्या दोघांच्या मध्ये झालेलं असतं भांडण. बहीण काही तरी करत असते आणि तिचा भाऊ तिला समजवायला जातो. पण त्याच्या म्हणण्याप्रमाणे ती त्याच ऐकत नाही. तर बहिणीच्या म्हणण्याप्रमाणे त्या भावाने तिला विनाकारण चापट मारलेली असते. बरं त्याच्या दृष्टीने ही एक हलकीशी चापट असते तर तिला मात्र अगदी जोराने लागलेली असते. सुरुवातीला तर दोघांकडून मूळ विषय पटकन कळत नसतो. पण त्यांच्या समोर असलेले वडील त्यांच्या कडून खरं काय घडलं हे जाणून घेण्यात यशस्वी होतातच. शेवटी काय बाप हा बापमाणूस असतो. एकंदर झालेला प्रकार त्यांच्या लक्षात येतो आणि त्यांना हसू आवरत नाही. म्हणजे मुलांसमोर ते तसं दाखवत नाहीत पण व्हिडियोत त्यांच्या हसण्याचा किंचित आवाज येतो. तसेच गंमतीचा भाग असा की बहिणाबाई लहान असल्याने तिला स्वतःची बाजू मांडताना एकच मुद्दा असतो. तर भाऊ थोडा मोठा असल्याने झाला प्रकार वडिलांना सांगण्यात यशस्वी होतो. त्यात कौतुकाची एक बाब म्हणजे ते दोघांकडूनही त्यांची त्यांची बाजू ऐकून घेतात. काहीही न ऐकता कौल देत नाहीत.

एकंदरच या व्हिडियो विषयी तुम्ही वाचाल पण त्यापेक्षा तुम्ही तो व्हिडियो बघितलात तर अजून छान. याच कारण, त्या दोन्ही मुलांचा निरागसपणा शब्दांत पकडता येत नाही. तसेच त्यांचा हा वादविवाद पुन्हा पुन्हा बघावासा वाटतो. तेव्हा आपल्याला संधी मिळाली तर हा व्हिडियो जरूर बघा. आपल्या टीमला तर हा व्हिडियो खूप आवडला. आपण हा व्हिडियो पाहिला असल्यास आपल्याही पसंतीस उतरला असेलच. नसेल तर यावेळी या व्हिडियोचा आनंद घ्या.

त्याचसोबत मंडळी नेहमीप्रमाणे आपल्या टीमने लिहिलेल्या लेखांवर आपला प्रतिसाद नोंदवत राहा. त्यासाठी कमेंट्स सेक्शनचा वापर करा. आपल्या सकारात्मक कमेंट्स आम्हाला नवनव्या विषयांवर लेखन करायला प्रोत्साहन देऊन जातात. तर आपल्या सकारात्मक सूचना बरंच काही शिकवून जातात. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत हे लक्षात घ्या आणि बरं का, आपला हा लेख मोठ्याप्रमाणात शेअर करायला विसरू नका. लेख वाचा, आनंद घ्या आणि लेख शेअर करून तो वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *