Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मजुराने केलेला डान्स पाहून मायकल जॅक्सनची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, बघा व्हिडीओ

ह्या मजुराने केलेला डान्स पाहून मायकल जॅक्सनची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, बघा व्हिडीओ

सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपण सगळेच जण कोणत्या ना कोणत्या कामात गुंतलेले असतो. मग ते आपलं अर्थार्जन करणारं काम असेल वा सामाजिक मदत करणारं काम असेल. बरं हे सगळं करत असताना घरच्यांना वेळ देणं ही तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सांभाळताना वेळ कसा जातो ते कळत नाही. कधी कधी तर आपल्यासाठी, स्वतःचा असा वेळच वाचत नाही असं वाटतं. मग नाही म्हंटली तरी चिडचिड होतेच. पण यावर एक रामबाण उपाय असतो.

हा उपाय म्हणजे स्वतःचे छंद जोपासणं होय. कारण एरवी स्वतःला द्यायला वेळ उरत नसला तरी एखादा छंद आपल्याला असेल, तर आपण बरोबर वेळात वेळ काढून तो पूर्ण करत असतो. कारण आपल्या थकल्या भागल्या मनाला आणि शरीराला, ऊर्जा देण्याचं काम आपले छंद करत असतात. त्यामुळे कामाच्या धबाडग्यात ही हे छंद मनाला प्रसन्न ठेवतात. काम करण्यासाठी नवीन ऊर्जा देतात. तसेच या छंद जोपासण्यात जेवढं सातत्य असेल तितकं उत्तम ! कारण आपल्याला एखाद्या कलेचा छंद असेल आणि आपण तो निग्रहाने आणि सातत्याने जोपासत असाल तर आपसूक काही वर्षांनी आपण त्या कलेत अगदी माहिर होता. तसेच आपण या कलेच वेळोवेळी सादरीकरण ही करत असाल तर आपसूकच आपण लोकप्रिय कलाकार म्हणून ही उदयास येऊ शकता.

त्यात हल्लीचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. त्यामुळे आपली कला मांडण्यासाठी अनेक हक्काची माध्यमं उपलब्ध झालेली आहेतच, फक्त त्यांचा सुयोग्य वापर करून घेता यायला हवा. आता एका चायनीज बांधकाम मजुराचं उदाहरण घ्या ना. या बांधकाम मजुराचं नाव ‘कैकै’ आहे. एव्हाना आपल्यातल्या प्रत्येकाने मनात एक विनोद केला असणारच – ‘काय काय’ नाव असतात यांची म्हणून ! असो. विनोदाचा भाग जाऊद्या. हा बांधकाम मजूर गेल्या काही काळात इंटरनेट वर चर्चेचा विषय ठरला होता. त्यातही चीनमध्ये तर त्याचे अनेक व्हिडियोज हे वायरल ठरले होते. कारण होतं, त्याच्या जबरदस्त डान्स कौशल्याचं ! कैकैने जवळपास दशभराहून अधिक काळ डान्स शिकण्याचा ध्यास घेऊन त्यातील पॉपिंग या डान्स स्टाईलमध्ये कौशल्य प्राप्त केलं आहे. त्याच्या या सातत्याची दाद द्यायला हवी. कारण तो हे सगळं बांधकाम मजूर म्हणून काम करताना मिळणाऱ्या जेवणाच्या सुट्टीत करत असे. तसेच त्याने आपलं हे कौशल्य अगदी एकलव्याप्रमाणे घडवलं आहे. कारण यात सोशल मीडियावर असणाऱ्या डान्स ट्युटोरिअल्सचा त्याने अभ्यास केला आहे. म्हणजे जवळजवळ स्वतःच स्वतःला शिकवलं आहे. पण एवढं असूनही त्याने केलेला डान्स हा एखाद्या कोरिओग्राफरला ही लाजवेल असा असतो.

आपणही कदाचित त्याने केलेल्या डान्स परफॉर्मन्सचे व्हिडियोज बघितले असतील. कारण गत काळात त्याच्या या नृत्य कौशल्याने नटलेले व्हिडियोज मोठ्या प्रमाणात शेअर झाले होते. आता अस झाल्यावर चर्चा तर होणारच ना. त्यातही त्याचा एक व्हिडियो विशेष वायरल झाला होता. या व्हिडियोत आपल्याला कैकै आणि त्याचे सहकारी एका बांधकाम होत असलेल्या ठिकाणी उभे दिसून येतात. अर्थातच त्यांच्या ब्रेक ची वेळ झाली असणार. मग गाणं सुरू होतं आणि कैकै त्याचं कौशल्य दाखवायला सुरुवात करतो. पहिल्या काही क्षणांतच, मायकल जॅक्सन यांची आठवण यावी अशा स्टेप्स तो करू लागतो. या स्टेप्स करत असताना त्याने एका लाकडी पट्टीचा आधार घेतलेला असतो. या पट्टीचा अगदी खुबीने वापर करत तो आपलं पदलालित्य आपल्याला दाखवत असतो. पदलालित्य या शब्दाला तो अक्षरशः जागतो असंच वाटतं. कारण त्याचे पाय एवढ्या सहजतेने आणि सुंदरपणे हलत असतात की विचारू नका. त्याच्या या डान्सचं आपल्याला कौतुक वाटत असतंच.

तसेच तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला त्याचं कौतुक वाटत असतं. खासकरून तो जेव्हा जमिनीवर पडल्यासारखी स्टेप करून पुन्हा उभा राहतो तेव्हा तर टाळ्यांचा कडकडाट होतो. इतर काही व्हिडियोत त्याचे काही सहकारी त्याच्या पासून प्रेरणा घेऊन त्याच्यासोबतच डान्स करताना आपण पाहतो. या व्हिडियोत तस होत नसलं तरी उपस्थितांना आपल्या या कलंदर सहकाऱ्याविषयी कौतुक वाटत असतं हे नक्की. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही जाणवलं असेल. तसेच व्हिडियो आणि पर्यायाने त्याचा डान्स ही आवडला असेलच. पण आपण हा व्हिडियो अजूनही बघितला नसेल तर हरकत नाही. आपली टीम आपल्या वाचकांसाठी हा व्हिडियो लेख संपल्यावर शेअर करणार आहे. आपण तेव्हा हा व्हिडियो बघू शकता.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *