माणूस दिवसरात्र मेहनत करून आपले जीवन अधिकाधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकाची हीच इच्छा असते कि आपल्या मेहनतीचे फळ मिळेल, परंतु मेहनतीसोबतच नशिबाने जर साथ दिली तर व्यक्तीला स्वतः केले गेलेल्या परिश्रमासोबत फळ नक्कीच मिळते. अनेकदा पाहिले गेले आहे कि मजूर दिवसरात्र मेहनत करतात परंतु जितके ते काम करतात त्यात ठिकप्रकारे घर चालवणे खूपच कठीण होते. परंतु अचानकच कोणाचे नशीब बदललं गेले आणि लाखोंची वस्तू त्याच्या हातात लागली तर ह्यापेक्षा जास्त आनंदाची बातमी काय असेल. तुम्ही सर्वांनी ह्या सर्व गोष्टी फक्त म्हणी किंवा कथेत ऐकल्या असतील, परंतु असं खरंच घडलं आहे. होय, नशिबाने एका मजुराला एक खूप मोठी भेट दिली आहे. निसर्ग ह्या मजुरावर इतके मेहेरबान झाला कि त्याचे नशीबच बदलून गेले. दिवाळीच्या अगोदरच नशिबाने जी दिवाळी भेट दिली आहे, ह्यामुळे ह्या मजुराच्या कुटुंबातील सगळेजण खूप खुश आहेत.
दिवाळीच्या अगोदरच निसर्गापासून मिळालेली भेटवस्तूने मजुराचे नशीबच बदलून गेले आहे. खरंतर, हिरे खोदकामात मजुराला जवळजावलं ३५ लाख रुपये किमतीचा हिरा सापडला. आम्ही तुम्हाला ज्या मजुराबद्दल सांगत आहोत, त्याचे नाव बलबीर सिंह यादव आहे, ज्याला हिरे खोदकामात हिरा सापडला आहे. ७.२ कॅरेटच्या ह्या हिऱ्याची किंमत जवळजवळ ३५ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ह्या मजुराला जसे हा हिरा मिळाला, ताबडतोब त्याने हिरा कार्यालयात त्याला जमा केले. खूपच लवकर ह्या मजुराला आपल्या मेहनतीचे फळ मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार, बलबीर सिंह एक मजूर आहे. त्याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान त्याच्याजवळ काम नव्हते. तेव्हा त्याने आपल्या भावांसोबत हिरे खोदकाम करण्याचा निर्णय घेतला, ज्यासाठी त्याने हिरे विभागाला अर्ज सुद्धा केला होता. खोदकामाच्या दरम्यान त्यांना हा उज्ज्वल प्रकारचा ७.२ कॅरेटचा मोठा हिरा मिळाला.
हिरा मिळाल्यामुळे मजूर बलबीर सिंह यादव आणि त्याचे कुटुंब खूप खुश आहे. दिवाळीच्या अगोदर हिरा मिळाल्यामुळे त्याच्या घरतील आनंद अनेक पटीने वाढला आहे. सध्यातरी हिऱ्याला मजूर बलबीर सिंह यादव ने हिरा कार्यालयात जमा केले आहे, येणाऱ्या दिवसात होणाऱ्या लिलावात ह्या हिऱ्याला ठेवले जाईल. लिलावात हिरा विकल्यावर १२.५% रॉयल्टी का पल्यानंतर उर्वरित पैसे हिरा मालकाला प्रदान केले जाणार. मजुराला आपल्या मेहनतीचे फळ जरूर मिळणार. पटरीबाजरीया जिल्ह्यातील कृष्ण कल्याणपूर गावातील उथली हिरे खोदकामात बलबीरला हा हिरा मिळाला होता. हा हिरा खूप चांगल्या दर्जाचा हिरा असल्याचे सांगितले जाते. पन्ना ह्या जागेची ओळख जगात हिऱ्यांच्या खाणीसाठी आहे. इथे अनेकदा ह्या अगोदर सुद्धा मजुरांना हिरे मिळाले आहे. लॉकडाऊन च्या दरम्यान उथली खाणीत मिळालेल्या हिर्याने मजुराचे नशीब बदलले होते. ह्याअगोदर सबल नावाच्या मजुराला सुद्धा जरुआपूर येथील उठली खोदकामात तीन हिरे मिळालेले आहेत, ज्याची किंमत २० लाख ते ३० लाख रुपयेपर्यंत सांगितली जात आहे. खोदकामात मिळालेल्या ह्या उच्च प्रतीच्या हिर्यांनी मजुरांना मालामाल केले होते.