काही वेळा कसे योगायोग जुळून येतात बघा. आज सकाळी आमचा मित्र एक जाहिरात घेऊन आला. आपल्या पेपर सोबत जे पॅम्प्लेट येतं बघा, तशी ती जाहिरात होती. एका लग्न जुळवणाऱ्या संस्थेची ती जाहिरात होती. त्यातील एक वाक्य खूप आवडून गेलं. ‘आपल्या जोड्या स्वर्गातच जुळतात, आम्ही मात्र निमित्तमात्र आहोत’ ! या एका वाक्यात छान संदेश दिलेला होता. असं काही कलात्मक बघायला मिळालं की मजा येते. त्यात आमच्या टीमचे काही जण लग्नाचे आहेत. मग काय त्यांची पण थोडी मजा घेता आली.
पण खरी गंमत तर नंतर घडली. आजच्या लेखासाठी विषय काय म्हणून व्हिडियोज बघत होतो. तेवढयात एक जुना व्हिडियो पाहण्यात आला. तो व्हिडियो पाहिला आणि त्यातील जोडी ही जणू एकमेकांसाठीच बनली आहे असं वाटून गेलं. वर उल्लेख केलेलं, ‘जोड्या स्वर्गातच बनतात’ याची खात्री पटली. कारण यात आपल्याला दिसून येतं ते अर्थातच एक जोडपं. हे दोघेही जण एके ठिकाणी गरबा खेळायला आले असावेत. आता गरबा आणि तरुणाई म्हंटली की आनंदाचा भाग असतो. त्यास हे जोडपं ही अपवाद नसतं.
यात खास बात असते ती या जोडीचं ट्युनिंग होय. आता गरबा खेळत असाल आणि एकमेकांसोबत ट्युनिंग नसेल तर मजा येत नाही. पण या जोडीचं ट्युनिंग एवढं जबरदस्त असतं की असा एकही क्षण जात नाही जिथे या जोडीचं कौतुक वाटत नाही. या जोडीचा हा गरबा आपल्याला जवळपास एक मिनिट बघायला मिळतो. एरवी सेकंदा सेकंदाला शॉर्ट व्हिडियो बघणारे आपण, हा व्हिडियो मात्र अगदी कौतुकाने बघतो. कारण अर्थातच आपल्याला माहिती आहेच – या जोडीचं ट्युनिंग ! पण एवढंच एक कारण असतं का? नाही. अजून एक कारण असतं. ते कारण म्हणजे या व्हिडियोतील दादा आणि ताई एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व असलेले वाटत असतात. कारण व्हिडियो सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कायम राहतं. त्यात दादांचा मजा घेत डान्स करण्याचा स्वभाव सुद्धा आवडून जातो. या एका मिनिटांतही काही क्षण असे येतात की आपलं लक्ष दादांच्या हावभावांकडे जातं. त्यातही ४० व्या सेकंदाला ‘जेव्हा तुझं नी माझं जुळं’ या वाक्यावर ते जे मस्त हावभाव देतात त्यावरून ते या गाण्याची खरंच मजा लुटत असतात हे कळून येतं.
ताई सुद्धा सदैव हसतमुखाने मस्तपैकी गाण्याची मजा घेत असतात. एकंदर काय तर मस्त मजा घेत डान्स करणारी जोडी पहायची असेल तर हा व्हिडियो नक्की बघा. कारण त्यांना डान्स करताना बघून आपल्याला ही आनंद होतोच. बरं आमची टीम सातत्याने विविध व्हिडियोज बघत असते. त्यामुळे त्या अनुभवावरून हे नक्कीच सांगू शकतो की असे व्हिडियोज वारंवार बघायला मिळत नाहीत. या व्हिडियोतुन दिसणारं ट्युनिंग, त्यातून मिळणारा आनंद प्रत्येक व्हिडियोतुन मिळेल याची खात्री नसते. पण हा व्हिडियो मात्र आपल्याला अगदी मनापासून आवडून जातो. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याही पसंतीस उतरला असेल. पण आपण हा व्हिडियो अद्याप ही पाहिला नसेल तर मात्र एक सुंदर व्हिडियो बघण्याचा अनुभवाला तुम्ही मुकत आहात. तेव्हा आपली टीम हा व्हिडियो खाली शेअर करते आहे. त्याचा जरूर आनंद घ्या. या लेखाच्या निमित्ताने या जोडीला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा ! असेच आनंदी राहा !
बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :