Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मराठमोळ्या तरुणींनी केला जबरदस्त डान्स, तिघींच्या स्टेप्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या मराठमोळ्या तरुणींनी केला जबरदस्त डान्स, तिघींच्या स्टेप्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

काळ बदलत जातो त्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला काळानुरूप बदल होत जातात. बहुतेक सगळ्याच बाबींचा या बदलात समावेश होतो. कलाक्षेत्र तर याबाबतीत अगदी आघाडीवर असतं. कारण बदलत्या समाजाची स्पंदनं हेच क्षेत्र आपल्याला मनोरंजनाच्या माध्यमातून दाखवत असतं. पण अनेक वेळेस असं ही बघायला मिळतं, या नवीन बदलांमध्ये जुन्या आणि उत्तम गोष्टींचा ही आधार घेतलेला असतो. त्यामुळे जुनं आणि नवीन यांचा उत्तम संगम यानिमित्ताने अनुभवायला मिळतो. आज हे सगळं मांडण्याचं कारण आपल्या टीमने पाहिलेला एक वायरल व्हिडियो. खऱ्या अर्थाने हा व्हिडियो वायरल आहे असं म्हणायला हवं. कारण दीड वर्षात या व्हिडियोला जवळपास ७५ लाखांहून अधिकांनी पाहिलं आहे आणि आजही दिवसेंदिवस ही संख्या वाढते आहे. चला तर मग या नव्या जुन्याचा संगम असलेल्या व्हिडियोविषयी माहिती जाणून घेऊयात.

हा व्हिडियो आहे Do D Dance यांच्या टीमचा. ही एक मराठी तरुण मुलामुलींची टीम असून ही सगळी गुणी कलाकार मंडळी एकत्र येत धमाल डान्स परफॉर्मन्स सादर करत असतात. त्यांच्या युट्युब चॅनेल वरील डान्स परफॉर्मन्स बघणं म्हणजे मनोरंजनाची खात्री. याच चॅनेल वरील एक व्हिडियो म्हणजे, या ग्रुपमधील काही मुलींनी एकत्र येत केलेला डान्स परफॉर्मन्स होय.

हा डान्स परफॉर्मन्स करताना त्यांनी एक धमाकेदार गाणं वापरलं होतं. हे गाणं म्हणजे जुन्या आणि नवीन यांचा छान संगम आहे असं वाटतं. ‘छबिदार छबी’ हे ते गाणं. काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘Girlz’ या मराठी सिनेमात हे गाणं होतं आणि खूप गाजलं ही होतं. जुन्या छबिदार छबी या गाण्याचा बाज आणि काही शब्द वापरत या नवीन गाण्याची रचना केली गेली होती. हा नवीन प्रयोग लोकप्रिय ठरला होता. तसेच यावरील मूळ चित्रपटातील डान्स परफॉर्मन्स ही भाव खाऊन गेला होता. आज आपल्या टीमने पाहिलेला डान्स परफॉर्मन्स ही अफलातून आहे. हा डान्स परफॉर्मन्स तेजश्री, उन्नती आणि तन्मयी यांनी सादर केलेला आहे. त्यातील तेजश्री आणि उन्नती यांनी हा डान्स कोरिग्राफ केल्याचं कळतं. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एकेक करून या तिघींची ओळख होते. मूळ सिनेमात ज्या प्रमाणे पेहराव केलेले होते त्याचा प्रभाव त्यांच्या पोशाखावर पडलेला दिसून येतो.

जुनं आणि नवीन यांचा संगम साधण्याचा प्रयत्न इथे दिसून येतो. मग गाणं सुरू होतं आणि या तिघी एकत्र येत डान्स करताना दिसतात. त्यांचा आत्मविश्वास, प्रसन्न व्यक्तिमत्व आणि उत्तम डान्स स्टेप्स यांमुळे हा परफॉर्मन्स उत्तरोत्तर बहरत जातो. डान्स करत असताना प्रत्येकीला केंद्रस्थानी येत डान्स करण्याची संधी मिळते हे बघून बरं वाटतं. सोबतच त्यांच्यामध्ये असलेला ताळमेळ ही उत्तम असतो. त्यामुळे तिघींच्या स्टेप्स अगदी एकत्र होत असतात. तसेच योग्य वेळी या व्हिडियोत एडिटिंग करत छोटे पण आवडून जातील असे स्पेशल इफेक्ट्स दिलेले दिसून येतात. मग गाण्याच्या सुरुवातीला स्लो मोशन वापरणं असो वा लाईक्स आणि हार्ट्स वापरणं असो वा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे लोगो वापरणं असो. त्यामुळे या गाण्याला एक वेगळेपण येतं. यासोबतच हा व्हिडियो तसा दोन मिनिटांचा आहे पण त्यातील परफॉर्मन्स हा दीड ते पावणे दोन मिनिटांचा आहे.

त्यामुळे हा व्हिडियो सुरू होतो, आपण या व्हिडियोसोबत एका लयीत येतो, मजा घेतो आणि अगदी योग्य वेळी हा व्हिडियो संपतो. जर हा व्हिडियो अजून थोडा वेळ चालला असता, तर कदाचित हे मत बदलू शकलं असतं. त्यामुळे या आघाडीवरही ही टीम अगदी मस्त कामगिरी करते. आपल्या टीमला तर हा व्हिडियो खूप आवडला. आपणही जर त्या ७५ लाख व्ह्यूज मधले असाल तर आपणही पाहिला असेल. आता पुन्हा पहालाच कारण तुम्हाला ही तो आवडला असणार. जर का नसेलच पाहिला तर नक्की बघा. तुम्हाला हा व्हिडियो जरूर आवडेल. यानिमित्ताने आपल्या टीमकडून या सगळ्या मुलींना आणि त्यांच्या टीमला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !! उत्तम काम करत राहा, यशस्वी होत राहा.

तसेच मंडळी आपले ही धन्यवाद. आपली टीम आपल्या वाचकांना डोळ्यासमोर ठेऊन नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर लेखन करत असते. पण त्यासाठी आपण देत असलेला पाठिंबा आणि प्रोत्साहन हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते तुम्ही मोठ्या प्रमाणात आम्हाला देत असता. हेच प्रोत्साहन यापुढेही देत राहा. आपली टीमसुद्धा आपल्यासाठी वैविध्यपूर्ण विषयांवर उत्तम लेख आणत राहीलच. लवकरच नवीन विषयासह भेटू. तोपर्यंत आपल्या टीमचे लेख वाचत राहा, शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.