Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मराठमोळ्या नवरीने लग्नमंडपात थाटात केलेली एंट्री पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

ह्या मराठमोळ्या नवरीने लग्नमंडपात थाटात केलेली एंट्री पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

ज्याची आपण सगळेच बऱ्याच काळापासून वाट बघत होतो तो सिजन एकदाचा आला आहे. अहं, गरमीचा सिजन नव्हे. गरमीचा सिजन येण्याची नव्हे तर जाण्याची आपण सगळे जण वाट बघत असतो. त्यातही यंदा गरमीचा सिजन यंदा अंमळ लवकरच आला आहे आणि अगदी लाहीलाही होते आहे. पण या सगळ्यांवर काही अंशी तरी फुंकर घालणारा अजून एक सिजन या काळात असतो. हा सिजन म्हणजे लग्नाचा सिजन होय.

अर्थात गेल्या काही दिवसांपूर्वी या सिजनचं ही आगमन झाले आहेच. येत्या काळात यातील धामधूम अजून वाढेल यात शंका नाही. बरं या सिजनची चाहूल लागते दोन गोष्टींनी ! एक म्हणजे लग्नाची निमंत्रण आपल्याला यायला लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या लग्नातील मस्त मजेशीर क्षणांचे व्हिडियोज आपल्याला पाहायला मिळतात. तसे ते वर्षभर पाहायला मिळतात. पण या काळात नवनवीन व्हिडियोजची भर पडत असते. असाच एक व्हिडियो आज आपल्या टीमच्या पाहण्यात आला आहे. हा लेख लिहीत असण्याच्या काही आठवड्यांपूर्वी हा व्हिडियो प्रकाशित झाला होता.

आमच्या टीमला नुकताच दिसला. या व्हिडियोत आपल्याला नवराई डान्स करताना दिसते. तिचा उत्साह आणि प्रसन्न व्यक्तिमत्व हे या व्हिडियोचं वैशिष्ट्य म्हणायला हवं. कारण या दोन्ही गोष्टींचं प्रतिबिंब हे तिच्या डान्समध्ये पडलेलं जाणवतं. व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा या ताईंचा मंडप प्रवेश होत असतो. त्यासाठी सगळी मंडळी तयार झालेली असतात. व्हिडियो सुरू होताना ही सगळी मंडळी दोनच्या रांगेत पुढे येतात. अर्थातच मस्त डान्स करत. मग या दोघांमधून ही ताई अवतरते. ती त्यांच्या या डान्समध्ये अजून भर घालते. सगळं वातावरण उत्साहाने भारलेलं असतं. याची प्रचीती येते जेव्हा मागे उभे असलेल्या ताई थेट कॅमेऱ्याच्या फोकस मध्ये नसतात पण तरीही डान्स करत असतात हे बघून ! असं काही बघितलं की मजा येते. कारण सगळे जणं त्या क्षणांचा आनंद घेत असतात. यात अर्थातच आघाडीवर असते ती आपली ताई. मग व्हिडियो संपता संपता तिचे नवरोबा सुद्धा तिला येऊन सामील होतात. मग दोघा लव्ह बर्डसचा डान्स सुरू होतो आणि हा व्हिडियो संपतो.

त्या मानाने कमी वेळेचा असा हा व्हिडियो आपल्याला संपताना मात्र खूप छान आनंद देतो हे मात्र नक्की. आमच्या टीमने तर हा आनंद नक्कीच घेतला आहे. ‘आली ठुमकत नार’ या गाण्यावर ताईने आणि तिच्या कुटुंबातील आणि मित्रमैत्रीण परिवारातील सगळ्यांनी केलेला हा डान्स निदान एकदा तरी बघावा असा आहेच. तेव्हा आपणही हा व्हिडियो जरूर बघा. आमची टीम आपल्या वाचकांसाठी सदर व्हिडियो या लेखाच्या शेवटी शेअर करतो आहोत. त्याचा आनंद घ्या.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *