Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मराठमोळ्या नवरीने लग्नमंडपात केलेली एंट्री होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

ह्या मराठमोळ्या नवरीने लग्नमंडपात केलेली एंट्री होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

एप्रिल मे महिना सुरू झाला की सहसा उन्हाळी सुट्यांचे आणि लग्न कार्यांचे वेध लागतात. यंदा जी परिस्थिती आहे, त्यामुळे या दोहोंच्या बाबतीत काही करता येईल अशी परिस्थिती नाही. पण म्हणून निराश होऊ नका. आपल्या जीवनात आनंद पसरवण्याचा आपल्या टीमने ध्यास घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला अनेक लग्न सोहळ्यांतून सहभागी होता आलं नाही तरीही हरकत नाही. आपली टीम आपल्यासाठी येत्या काळात लग्नातील वायरल व्हिडियोज वर सातत्याने लेख लिहिणार आहे. बाकीचे विषय ही असतीलच. पण विशेष लक्ष असेल ते लग्नातील वायरल व्हिडियोज ना. याच मांदियाळीतील हा पहिला लेख. हा व्हिडियो आहे एका मराठी कुटुंबाच्या लग्नातील. कदाचित करोना पूर्वीच्या काळातील असावा. या व्हिडियोत आपल्याला नववधू ताई लग्नाच्या मंडपात प्रवेश करताना दिसते. सुंदर व्यक्तिमत्व, त्यांना सर्वोत्तम साडी आणि दागिन्यांची जोड यांमुळे ही ताई अगदी सुंदर दिसत असते.

तिच्या सोबत असलेले सगळे ही अगदी उत्तमोत्तम पोषाखात आलेले असतात. त्यामुळे सगळेच रुबाबदार दिसत असतात. त्यामुळे पहिल्या काही क्षणातच आपल्या मनात एक प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं आपण पाहतो. ताई आणि तिच्या सोबत चालत येणारी वर्हाडी मंडळी अगदी रुबाबात चालत येत असताना पाठी एक गाणं सुरू होतं. ‘आली ठुमकत नार, लचकत मान, मुरडत हिरव्या रानी’ हे ते गाणं. पिंजरा या सुप्रसिद्ध चित्रपटातलं हे गाणं ‘पुढे मुंबई पुणे मुंबई ३’ या चित्रपटात पुन्हा नव्या अंदाजात पेश केलं गेलं. आदर्श शिंदे यांचा आवाज या नवीन अंदाजातील गाण्याला लाभला आहे. तर असं हे नव्या रूपातलं गाणं इथे वाजत असतं. मग आपल्याला दिसतात ते मंडपातील काही वर्हाडी आणि ही नववधू या गाण्यावर ताल धरत नाचायला सुरुवात करत असतात. खरं तर लग्नाचे पेहराव करून नाचणं म्हणजे कठीणच. पण आवड असेल तर काहीही अशक्य नसतं. नववधू आणि बाकीची मंडळी ही अशीच डान्स ची दर्दी असल्याचं जाणवतं. कारण अगदी मनमुराद पण आपले पोशाख सांभाळून डान्स करत असतात. स्टेप्स ही मस्त असतात. त्यामुळे आपसूकच आजूबाजूची मंडळी ही कौतुकाने डान्स बघत असतात आणि यातच हा व्हिडियो कधी संपतो ते कळतही नाही.

हा व्हिडियो आहे अवघ्या ४६ सेकंदांचा. त्यामुळे वर उल्लेख केलेल्या गोष्टी चट्कन होत असतात. त्यांना शब्दात पकडण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी आशा आहे. गेल्या काही काळात नवऱ्या मुलामुलींनी अगदी मस्त नाचत, गात लग्न मंडपात प्रवेश करण्याची पद्धत रूढ होते आहे. त्यात गैर म्हणावे असे काहीच नाही. किंबहुना आपल्याच लग्नात ताण घेऊन बसण्यापेक्षा मस्त मजा घेत आलेलं केव्हाही चांगलं. या ताईने केलेल्या या सुंदर डान्स साठी तिचं कौतुक.

आपल्याला आवडतील असे विषय निवडण आणि त्यावर लेख लिहिणं हे आपल्या मराठी गप्पाच्या टीमला आवडतं. त्यात तुमचं प्रोत्साहन आम्हाला सतत मिळत असतं. कधी कमेंट्स मधून तर कधी लेख शेअर करण्यातून. आपला आमच्या बाबतीचा हा स्नेह असाच वृद्धिंगत होत राहू दे ही इच्छा. लोभ असावा. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *