Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मराठमोळ्या नवरीने स्वतःच्या लग्नामध्ये केला जबरदस्त डान्स, बघा व्हिडीओ

ह्या मराठमोळ्या नवरीने स्वतःच्या लग्नामध्ये केला जबरदस्त डान्स, बघा व्हिडीओ

लग्न आणि वायरल व्हिडियो हे समीकरण आता तसं बरच रुळलय. आपल्या सगळ्यांनाच याची आता सवय झाली आहे. पण असं असलं तरीही काही व्हिडियोज हे असे असतात की आपली वेगळी छाप पाडून जातात. आत आज आपल्या टीमने पाहिलेल्या व्हिडियोचं उदाहरण घ्या ना. हा व्हिडियो तसा सात महिन्यांपूर्वीचा आहे. पण त्यात जाणवणारी ऊर्जा, प्रसन्नता आपल्याला आजही आवडून जाते, आनंद देऊन जाते. आपल्या टीमला तर हा व्हिडियो बघून खूप आनंद झाला. म्हंटलं हा आनंद आपण आपल्या वाचकांसोबत शेअर करूयात आणि म्हणून आजच्या या लेखाचा घाट घातला आहे. चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडियो विषयी.

लग्नाचे व्हिडियोत म्हंटले की सहसा नवरी मुलगी ही त्यात असतेच. पण अनेक वेळा असंही होतं की, ‘सैय्यां मेरे सुपरस्टार’ म्हणत ती डान्स करत राहते आणि इतर व्हिडियोज सारखा तो एक व्हिडियो होऊन जातो. पण आज आपण पाहिलेल्या व्हिडियोतील ताई मात्र एकदम जबरदस्त डान्सर निघते. कारण ती जवळपास तीन ते चार गाण्यांवर डान्स करते आणि ते ही ५.५५ मिनिटांत. म्हणजे बघा किती आवडत असेल तिला डान्स करायला हे यावरून लक्षात येतं.

कारण डान्सची आवड असलेली व्यक्तीच एवढ्या कमी वेळेत ऐकायला येणाऱ्या गाण्यांवर अचानकपणे डान्स करू शकते. व्हिडियो सुरू होतो तेव्हा टाईमपास सिनेमातील ‘पहिल्या धारेच्या प्रेमाने साला’ हे गाणं सुरू असतं. जवळपास बाकीची अगदी तुरळक मंडळी असतात. पण ताई मात्र अगदी मस्त झोकात येऊन डान्स करत असते. एवढंच नव्हे तर बाकीच्यांनीही डान्स करावा यासाठी तिचा आग्रह असतो. तेवढ्यात गाणं बदलतं. ‘रुपेरी वाळू, सोनेरी लाटा’ हे आपल्या सगळ्यांचं आवडतं गाणं वाजायला सुरुवात होते. ताईचं सुरुवातीला लक्ष थोडं विचलित होतं. पण पुन्हा एकदा लक्ष गाण्यावर केंद्रित झालं की पुन्हा रंगात येते. मग सुरू होते धमाल. जी जी व्यक्ती समोर येते त्यांना डान्स करण्याचा आग्रह करीत करीत ताईंचा डान्स सुरू असतो. जवळच असलेली चिल्ली पिल्ली पण आपल्या सोबत नाचावीत यासाठी ताई प्रयत्नशील असते. तिच्या उत्साहाचं कौतुकच केलं पाहिजे. तिच्यामुळे प्रत्येक व्यक्ती या व्हिडियोत थोडं थोडं का होईना पण नाचताना दिसते. त्यांच्या संगतीने पूर्ण व्हिडियोभर आपली ताईपण मस्त डान्स करत वावरते. बरं यात तिच्या स्टेप्स ही वाखाणण्याजोग्या असतात.

तिच्या ठुमक्यांनी गाण्यातील बिट्स पकडत तिचा डान्स चालू असतो. तेवढ्यात एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे ताईमुळे अनेक जण एव्हाना डान्स करायला लागलेले असतात. एक काका तर येतात तेच डान्स करत. मग काय आपली ताई पण त्यांना तोडीस तोड डान्स करते. धमाल येते. मग एकदा दोनदा तर व्हिडियो कॉल चालू असताना ताईला डान्स करण्याचा आग्रह केला जातो. ताई पण एकदम जोशात डान्स करते. या जवळपास सहा मिनिटांच्या व्हिडियोत तिचा वावर खूप ठळकपणे जाणवतो. आणि का जाणवू नये? ती स्वतः तर डान्स करतेच आणि वरून इतरांनाही डान्स करायला भाग पाडते. त्यामुळे आधी अगदी रिकामा वाटणारा मंडप अगदी उत्साहाने आणि आनंदाने न्हाऊन जातो. त्यामुळे तिच्या डान्सचं तर कौतुक आहेच आणि सोबतच कौतुक आहे ते तिच्या सगळ्यांना सामावून घेण्याच्या वृत्तीचं. आपल्या टीमला तर तिचा हा स्वभाव आवडला. हा लेख ती वाचेल की नाही याची कल्पना नाही. पण आमच्या टीमकडून तिला सुखी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. अशीच नेहमी हसत खेळत, प्रसन्न आयुष्य जग ही सदिच्छा.

मंडळी, आपणही हा व्हिडियो पाहिला असेलच. नसेल पाहण्यात आला तर नक्की बघून घ्या. उत्तम डान्सचा आनंद घेण्याची संधी चुकवू नका. आणि बरं का, आमच्या टीमने लिहिलेला हा लेख नक्की शेअर करा. शेवटी काय आहे ना, आपलं प्रोत्साहन आम्हाला नवनव्या विषयांवर लेखन करायला ऊर्जा देतं. हे प्रोत्साहन आपल्या सकारात्मक कमेंट्स आणि लेख शेअर करण्यातून मिळतं. तेव्हा आपलं प्रोत्साहन आम्हाला सदैव मिळत राहू द्या. तुमच्या मनोरंजनासाठी उत्तम लेखन करण्याची जबाबदारी आमची. तेव्हा चला, पटापट हा लेख शेअर करा आणि बाकीचेही नवनवीन लेख वाचायला सज्ज व्हा. लवकरच नवीन विषयांसह भेटूच !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.