Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मराठमोळ्या नवऱ्याने लग्नात आई आणि बायकोसबात केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

ह्या मराठमोळ्या नवऱ्याने लग्नात आई आणि बायकोसबात केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

आतापर्यंत आपण लग्नातील अनेक वायरल व्हिडियोज बघितले आहेत. यातील बहुतेकांमध्ये आपल्याला नवरा नवरी आणि त्यांची मित्र मंडळी डान्स करताना दिसून येतात. पण आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो काहीसा वेगळा आहे. म्हणजे यात नवरा नवरी आहेतच. पण अजून एक खास व्यक्ती आहे. चला याविषयी जाणून घेऊयात. हा व्हिडियो महेंद्र कापुरे यांचा आहे. त्यांच्या लग्नप्रसंगी ते आणि त्यांच्या पत्नीने छान डान्स केला होता. सोबतच त्यांनी महेंद्र यांच्या आईंना पण यात सामील करून घेतलं होतं. खरं तर वर उल्लेख केल्याप्रमाणे सहसा व्हिडियोज मध्ये नवरा बायको डान्स करताना दिसतात. काही वेळेस वडील आणि मुलगी डान्स करते आहे असंही दिसत. पण कुटुंबाची माय व्हिडियोत दिसणं तसं कमीच असतं. पण या व्हिडियोत मात्र महेंद्र यांनी अगदी आवडीने स्वतःच्या आईला या डान्स मध्ये सामील करून घेतलं आहे.

माऊली सुद्धा अगदी आनंदाने नाचल्या आहेत आणि जर आपण ते नाचत असलेलं गाणं नीट ऐकलं ना तर अजून धमाल येते. हे एक अस्सल अहिराणी खान्देशी गाणं आहे. यात अहिराणी भाषेचा गोडवा जाणवतो आणि आवडून ही जातो. ‘माडी वहु तुले येई जाई करमने लगन’ हे ते प्रसिद्ध गाणं. युट्युब वर या गाण्याच्या व्हिडियोला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. तसेच महेंद्र यांच्या प्रमाणे अनेक लग्नांमध्ये हे गाणं वाजवलं गेलं आहे.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा महेंद्र, त्यांच्या पत्नी आणि आई हलके हलके ठुमकत असतात. मग या गाण्यातील एक ओळ येते ज्यावर डान्स करण्यापेक्षा अभिनय करण्यापेक्षा महेंद्र अभिनय करतात. त्यात त्यांच्या आईसुद्धा सामील होतात. गाण्याच्या शब्दांनुसार दोघांचा अभिनय सुरू असतो. त्यात महेंद्र गाण्याप्रमाणे आईला सांगत असतात की त्यांचं लग्न का करून द्यावं आणि आई या कारणाला वैतागलेली असते. अभिनय करत असताना दोघांची मस्त मजा येते आणि महेंद्र यांची पत्नी मात्र बाजूला उभ्या राहून गंमत बघत असतात.

मग पुन्हा जेव्हा म्युझिक सुरू होतं आणि तिघेही डान्स करायला लागतात तेव्हा बेमीसाल डान्स सुरू होतो. तिघेही रंगात आलेले असतात. तेवढ्यात व्हिडियो संपतो. आपण थोडे खट्टू होतो. या तिघांनी केलेला पूर्ण डान्स बघता आला असता तर मजा आली असती अस वाटून जातं. पण ठीक आहे म्हणत आपण हा व्हिडियो पुन्हा पुन्हा बघत आनंद घेतो. या तिघांनीही जो धमाल डान्स केला तो आपल्या टीमला तर आवडलाच.

सोबतच आपल्या वाचकांना ही याविषयी लेख वाचायला आवडेल असं वाटलं आणि हा लेखप्रपंच मांडला. त्यामुळे तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रियांच्या द्वारे नक्की कळवा. कारण या प्रतिक्रियांतून आम्हाला नवनवीन गोष्टी शिकता येतात आणि प्रोत्साहन ही मिळतं. तेव्हा आम्ही आपल्या प्रतिसादाची वाट बघतो आहोत. आपणही नेहमीप्रमाणे आम्हाला प्रोत्साहन द्याल हे नक्की. त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.