Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मराठमोळ्या महिलांनी इतका सुदंर डान्स केला कि पाहून तुम्हीसुद्धा कौतुक केल्याशिवाय राहवणार नाही, बघा व्हिडीओ

ह्या मराठमोळ्या महिलांनी इतका सुदंर डान्स केला कि पाहून तुम्हीसुद्धा कौतुक केल्याशिवाय राहवणार नाही, बघा व्हिडीओ

कलाकृती मग ती कोणतीही असो, जर मनापासून तयार आणि सादर केलेली असेल, तर ती आवडून जातेच. तसेच या कलाकृतीला उत्तम दिग्दर्शनाची जोड असेल तर त्यात अजून रंग भरले जातात. कारण त्यामुळे कलाकृतीला एकप्रकारे सौष्ठव प्राप्त होतं आणि एक सुंदरता ही प्राप्त होते. खासकरून नृत्य या कलाप्रकाराला दिग्दर्शनाची जोड असेल आणि ते उत्तमरीत्या केलेलं असेल तर बहार येते. कारण मनाला वाटलं म्हणून नाचलं तरी आनंद मिळतो आणि इतरांना ही होतो. पण त्यास कोरिओग्राफरने शिस्त लावली की त्यातून लक्षात राहील असं नृत्य आकाराला येतं.

आता आमच्या टीमने आज बघितलेल्या एका व्हिडियोच उदाहरण घेऊ. हा व्हिडियो काही वर्षांपूर्वीचा आहे. कदाचित एखाद्या रहिवासी संकुलातील कार्यक्रमाचा हा एक भाग असावा असं वाटतं. या व्हिडियोत आपल्याला हौशी स्त्रियांचा एक समूह भेटतो. कदाचित एखाद्या समारंभासाठी वा सणासाठी ही मंडळी एकत्र जमली असावीत. अर्थात लोकं अशी एकत्र जमली की डान्स आणि गाणं होणारच. तसंच इथेही होताना दिसत. इथे एक फरक मात्र असतो. वर उल्लेख केलेल्या सगळ्या भगिनींनी एकत्र येत कोरिओग्राफ केलेल्या गाण्यांवर डान्स करायचं ठरवलेलं असतं. त्याचा प्रत्यय आपल्याला पुढील काही मिनिटांत येतो.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा या सगळ्या जणी विशिष्ट पोझ घेऊन उभ्या असतात. त्या विशिष्ट पोझवरून कळून येतं की पुढचा परफॉर्मन्स हा कोरिओग्राफ केलेला असणार आहे. पण एक मात्र नक्की की हा परफॉर्मन्स अपेक्षेपेक्षा ही जबरदस्त ठरतो. सुरुवात होते ती तडकत्या फडकत्या म्युझिकने ! मग चट्कन त्याची जागा, ‘पिंगा’ या गाण्याने घेतली जाते. हे गाणं किती लोकप्रिय आहे हे आपण जाणतोच. तसेच त्यात उत्साह ही भरून राहिलेला आहे. तोच उत्साह या डान्स मध्ये ही दिसून येतो. आता सहसा एकावेळी एक डान्स परफॉर्मन्स बघण्याची आपल्याला सवय असते. पण इथे तीन तीन गाण्यांवर डान्स परफॉर्मन्स बसवलेले असतात. त्यासाठी ज्या सहभागी स्त्रिया आहेत, त्यांच्या जागा वेळोवेळी बदलून त्यात काहीसं नावीन्य आणण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. तसेच, गाणी ही वेगवेगळ्या धाटणीची निवडलेली आहेत. त्यामुळे अर्थातच कोरिओग्राफी आणि त्यातील ऊर्जा यांवर ही परिणाम होतोच. जसे की दुसरं गाणं हे, इंग्लिश विंग्लिश सिनेमातील ‘नवराई माझी लाडाची गं’ हे गाणं आहे. आधीच्या गण्यापेक्षा या गाण्यातील मूड वेगळा आहे. तोच कोरिओग्राफीत ही प्रतिबिंबित होताना दिसतो. तसेच या बदललेल्या कोरिओग्राफीला, सहभागी भगिनींनी ही उत्तम प्रतिसाद दिला आहे. तसेच प्रत्येक गाण्यासोबत त्यांचा वाढत जाणारा उत्साह हा त्यांच्या नृत्य प्रेमाची साक्ष देणारा ठरतो. अर्थात तिसरं गाणं ही जबरदस्त असावं अशीच आपली अपेक्षा असते. ते तसं असतंही !

काही वर्षांपूर्वी आलेल्या पण तेव्हापासून आपल्या मनात घर केलेल्या, ‘ऐका दाजीबा’ या गाण्याने या परफॉर्मन्सचा शेवट होणार असतो. हेच तिसरं गाणं असतं. अर्थात या गाण्याची उडती चाल, त्यातील नटखट विचार सगळ्यांनी उत्तमरीत्या सादर केलेला आहे. तसेच त्यासाठी लागणारी ऊर्जा ही आपल्याला यात दिसून येते ही कौतुकाची बाब म्हणायला हवी. कारण, दोन गाण्यांवर डान्स केल्यावर ही दमायला होतंच. त्याचा परिणाम अनेकवेळा पुढच्या परफॉर्मन्सवर झालेला दिसून येतो. पण इथे मात्र काहीसा अपवाद दिसून येतो. येथे मिळून साऱ्याजणी असा काही धुमशान परफॉर्मन्स देतात की व्हिडियोची सांगता ही मस्त होते. आपल्या टीमला तर हा व्हिडियो बघताच क्षणी आवडला. आपल्या वाचकांना याविषयी जाणून घ्यायला आवडेल अस वाटलं आणि आजचा हा लेख लिहिला गेलेला आहे. या लेखाच्या शेवटी सदर डान्स परफॉर्मन्सचा व्हिडियो, आपली टीम आपल्या वाचकांसाठी शेअर करेल. त्यातील डान्सचा आपण जरूर आनंद घ्यावा. असो.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *