Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मराठमोळ्या मुलाने लग्नात सलमानच्या गाण्यांवर सलमानपेक्षाही अफलातून डान्स केला, स्टेप्स पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल

ह्या मराठमोळ्या मुलाने लग्नात सलमानच्या गाण्यांवर सलमानपेक्षाही अफलातून डान्स केला, स्टेप्स पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल

‘कभी गरम, कभी नरम’ असा असणारा सोशल मीडिया कधी कधी इतका भारी वाटतो, कारण त्यावेळी आपल्यासमोर काहीतरी भन्नाट आणि मूड फ्रेश करणारी गोष्ट आलेली असते. लहान मुलांपासून ते तरुण आणि वृद्ध लोकांचे डान्स व्हिडीओ तर खास चर्चेचा विषय ठरतात. अशा व्हिडीओंना आवडीने पाहिले जाते. असाच एक मूड फ्रेश करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अवघ्या 3-4 वर्षाच्या मुलाचा हा व्हिडीओ असून यात त्याने एकदम दिलखूष डान्स केलेला आहे. या छोट्याश्या हिरोचा बहारदार डान्सचा व्हिडीओ एकदा बघून तुमचं मन भरणार नाही, हे मात्र नक्की. त्यांचा हा डान्स पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकरी हा व्हिडीओ पाहून आनंदीत झाले आहेत. एवढ्या लहान असलेल्या मुलाला एवढा आकर्षक डान्स कसा जमतो, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक उत्स्फूर्तपणे व्यक्त होत असून त्याला आपल्या अकाऊंटवर शेअरसुद्धा करत आहेत. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

सर्वसाधारणपणे कुठल्याही लग्नात नवरी-नवरदेवाचे नातेवाईक- मित्र मंडळी नाचतात. आजकाल नवरा-नवरी पण खास डान्सची तयारी करतात आणि स्वतःच्याच लग्नात बेभान हरपून दणकून नाचतात. पण आता यात म्हातारी माणसं आणि लहान मुलेही पुढे आहेत. लग्नात कुठे वजन हानायचं, हे लहान मुलांनाही कळतं. अशाच एका भन्नाट लहान पोराचा डान्स व्हिडीओ व्हायरल झालेला आहे, महत्वाची बाब म्हणजे त्याला लाखो विव्हज मिळालेले आहेत. आता या मुलाने फक्त डान्सच नाही केला सेम सलमान खानची स्टाईल कॉपी केली आहे. चालणे, वागणे डान्स सगळीकडे तो सलमानची कॉपी करतो.. डान्स करताना तो ज्या गाण्यांवर डान्स करत आहे, ती गाणी सलमानचीच आहेत. मात्र सलमानपेक्षा जास्त सरस डान्स या मुलाने केला आहे. अवघ्या अडीच मिनिटांच्या या व्हिडीओत या मुलाने सलमानच्या वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स केला.

सगळ्यात भारी गोष्ट तर या व्हिडीओच्य शेवटी आहे, या व्हिडीओच्या शेवटी या मुलाने एक स्टेप अशी दाखवली आहे, जी त्याच्या वयात कुणीच करू शकत नाही. तिथे असणारा प्रत्येक जण या लहान मुलाचा नक्कीच फॅन झाला असेल. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर या छोट्या सलमानच्या डान्सचे नेटिझन्सनी खूपच कौतुक केले आहे. लग्नात उपस्थित असलेल्या या मुलाच्या नातेवाईकाने हा व्हिडिओ आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. या व्हिडिओला नेटिझिन्सनी खूप चांगली पसंती दिली आहे. इतक्या लहान वयात या छोट्या सलमानने केलेला हा जबरदस्त डान्स पाहून प्रत्येक जण हैराण होताना दिसून येत आहे.

हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *