Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मराठमोळ्या मुलींनी कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनादिवशी केला अफलातून डान्स, बघा व्हिडीओ

ह्या मराठमोळ्या मुलींनी कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनादिवशी केला अफलातून डान्स, बघा व्हिडीओ

कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे सगळ्या मुलामुलींसाठी पर्वणीच असते. यानिमित्ताने आपल्यातील अनेक कलागुण सादर करण्याची संधी मिळत असते. यात हमखास आढळणारा एक कलाप्रकार म्हणजे डान्स हा होय. अर्थात त्यात एवढी विविधता असते की नवनवीन प्रयोगशील असं काही तरी नेहमीच बघायला मिळत असत. आता आपल्या टीमने आज पाहिलेल्या वायरल व्हिडियोचं उदाहरण घ्या ना. या वायरल व्हिडियोत आपल्याला तीन मुलींनी एकत्र येत रिमिक्स गाण्यांवर केलेला डान्स अनुभवायला मिळतो. चला तर मग वेळ न दवडता, या व्हिडियो विषयी जाणून घेऊयात.

हा व्हिडियो माणगाव, रायगड येथील एका महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा आहे. या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने वर उल्लेख केलेल्या तीन मुलींनी धमाल असा डान्स परफॉर्मन्स सादर केला होता. बरं यात कौतुकास्पद बाब अशी की केवळ पाच मिनिटांत त्यांनी जवळपास सात ते आठ गाण्यांवर डान्स सादर केला होता. इथे एका गाण्यावर डान्स करत असताना, स्टेप्स लक्षात ठेवताना मारामार असते. तिथे सात ते आठ गाण्यांवर आधारित स्टेप्स लक्षात ठेवायचं म्हणजे दिव्यच. पण या मुली हे आव्हान सहज पार करतात.

व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा आपल्याला छबिदार छबी या गाण्याच्या नवीन आवृत्तीचं म्युझिक कानावर पडतं. यात गाण्याचा काही अंश वाजवला जातो. पण एवढा वेळ ही या तिन्ही मुली स्टेजवर दाखल होण्यास अगदी पुरेसा असतो. मग आपल्याला दुसरं प्रसिद्ध गाणं ऐकू येऊ लागतं. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ हे ते गाणं असतं. यावर या मुली जुन्या आणि नव्या स्टेप्स चा उत्तम संगम करत परफॉर्मन्स देत राहतात. पुढे पूर्ण परफॉर्मन्स भर याची झलक बघायला मिळत राहते. सोबतच त्यांच्या पोषाखाचं ही कौतूक करायला हवं. नवीन आणि जुन्याचा मेळ घालत त्यांनी हा पोशाख केलेला असतो. गर्ल्स या मराठी चित्रपटात ही असाच काहीसा पोशाख केला गेल्याची आठवण यानिमित्ताने होते. असो. मग पुढे तिसरं आणि चौथं गाणं आपल्या कानावर पडतं. पण या मुलींचा परफॉर्मन्स एवढा उत्तम होत असतो की उपस्थितांकडुन जल्लोष होत असतो. या जल्लोषात ह्या गाण्यांचा आवाज फारसा येत नाही आणि ही गाणी कोणती हे कळत नाही. पण या मुलींचा डान्स मात्र बहरत जात असतो हे नक्की. मग मात्र जे गाणं ऐकायला येतं ते आपल्या लाडक्या गाण्यांपैकी एक असतं. ‘मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गं उभी’ हे गाणं आपल्याला ऐकायला येत असत. या नटखट गाण्यावर तेवढाच मस्त परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळत असतो.

सहाव्या गाण्याने तर अजून बहार येते. या रावजी, बसा भावजी ही लावणी आपल्या कानावर पडते. या मुलींमध्ये इतका उत्साह येतो कुठून हा प्रश्न पडायला लागतो. पण जेव्हा मनापासून एखादी गोष्ट आवडत असेल की उत्साह आपोआप टिकून राहतो. तसच काहीसं इथे होत असणार. या मुलींना असणाऱ्या आवडीमुळे त्या इतक्या विविध गाण्यांवर डान्स करू शकतात. पुढचं गाणं ही त्यांचं उत्तम उदाहरण ठरतं. ‘लै लै लै’ या गाण्यावर डान्स करायला प्रचंड ऊर्जा लागते कारण गाणं तेवढं तडकतं फडकतं आहे. एवढा वेळ डान्स करूनही मुली या डान्सच्या वेळीही जोशात नाचतात. एव्हाना हा डान्स परफॉर्मन्स संपायला आलेला असतो. यावेळी त्यांच्याकडून आपल्या आवडत्या गाण्यावर डान्स केला जातो. हे गाणं म्हणजे एका लोकप्रिय मालिकेतील गीत असतं. ‘जय मल्हार’ या मालिकेतील हे गाजलेलं गीत असतं. हे गाणं ऐकून आपल्या मनातल्या या मालिकेच्या जुन्या आठवणी ताज्या होतात हे नक्की. हा डान्स परफॉर्मन्स जवळपास पाच मिनिटं चालतो पण खूप मजा देऊन जातो.

गाण्यांच्या नवीन अंदाजावर मुलींनी केलेला डान्स आपल्याला आवडून जातो. हा व्हिडियो आपल्या टीमने पाहिला तेव्हाच वाटलं की आपल्या वाचकांना या व्हिडियो विषयी वाचायला आवडेल. त्यातूनच आजचा हा लेखप्रपंच मांडला गेला आहे.

आपल्याला आमच्या टीमचा हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच उत्तमोत्तम लेख घेउन येत असते. यापुढेही आपली टीम उत्तमोत्तम लेख लिहीत राहिलंच याची आपण खात्री बाळगा. आपणही आम्हाला जसे नेहमी प्रोत्साहन देत आले आहात तसेच यापुढेही देत राहालाच. लवकरच नवीन विषयासह भेटू. तोपर्यंत आपल्या टीमचे न वाचलेले अन्य लेख वाचा. आठवणीने सगळे लेख शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *