Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मराठमोळ्या मुलींनी ‘लल्लाटी भंडार’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या मराठमोळ्या मुलींनी ‘लल्लाटी भंडार’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

काही दिवसांपूर्वीच नवरात्रोत्सव साजरा झाला. परंतु सोशल मीडियावर अजूनही त्यादरम्यानचे व्हिडीओ वायरल होत आहेत. त्या संदर्भातील जुने नवीन व्हिडीओज सजेशन्स मध्ये दिसत असतात. ‘ललाटी भंडार’ हे गाणं ऐकावं अस वाटलं. म्हणून युट्युब वर सर्च केलं तर या गाण्यासोबतच एक डान्स व्हिडियो ही पाहता आला. हा व्हिडियो खूप आवडला. आपल्या वाचकांना याविषयी कळायला हवं असं आपल्या टीमला अगदी मनापासून वाटलं. मग काय आमची डिजिटल लेखणी चालायला लागली आणि आजचा हा लेख आपल्या भेटीस येतो आहे. चला तर मग, या व्हिडियो विषयी जाणून घेऊयात.

हा व्हिडियो आहे अपूर्वाह नामक एका युट्युब चॅनेलचा. अर्थात हे चॅनेल अपूर्वा नावाच्या मुलीचं आहे हे आपण ओळखलं असेलच. हे चॅनेल आहे ही अगदी उत्तम. छान कंटेंट ने भरलेलं. अपूर्वा ही स्वतः उत्तम डान्सर असून डान्सची कोरिओग्राफी सुद्धा करते. गेल्या काही काळापासून तिची विविध नृत्यं आपल्याला तिच्या या चॅनेल वरून बघायला मिळतात. कधी सोलो तर कधी पार्टनर परफॉर्मन्स बघायला मिळतो. आज आपल्या टीमने पाहिलेला तिचा परफॉर्मन्स हा पार्टनर परफॉर्मन्स आहे. या तिच्या परफॉर्मन्स मध्ये आरुषी हिने तिला उत्तम साथ दिली आहे. तसेच हा परफॉर्मन्स खुद्द अपूर्वा आणि दीपाली यांनी बसवलेला आहे. तसेच Pune TDF Studio इथे याचं चित्रीकरण झाल्याचं कळून येतं.

या व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा अपूर्वा आणि आरुषी या आपल्या समोर येतात. सुरुवातीची २० सेकंद त्यांच्या संगीतावरील स्टेप्स बघायला मिळतात. शब्दांचा आधार घेत डान्स करता येतोच. पण म्युझिक वर ही उत्तम डान्स करणं जमलं पाहिजे. या दोघींनाही ते छान जमलंय अस दिसून येतं. तेव्हाच आपल्याला अंदाज येतो की पुढील व्हिडियो मनोरंजक असणार आणि आपला हा अंदाज अगदी बरोबर ठरतो. पुढची दोन मिनिटं या दोन्ही मुली खूप सुंदर असा नृत्याविष्कार दाखवतात. त्यात त्यांच्या हस्तमुद्रा, चेहऱ्यावरचे हावभाव आणि गाण्याला साजेसा वेग यांमुळे परफॉर्मन्स उत्तरोत्तर बहरत जातो. तसेच त्यांनी कोरिओग्राफी करत असताना नवीन आणि जुन्या स्टेप्सचा उत्तम समतोल साधलेला दिसून येतो त्यामुळे आनंद अजून वाढतो. तसेच दोघींचा परफॉर्मन्स असला तरी दोघींना एकेकटीने सुद्धा परफॉर्मन्स देण्याची संधी काही क्षणांसाठी मिळते. या दोघी या संधीचं सोनं करताना दिसून येतात. व्हिडियो जस जसा शेवटाकडे सरकतो तस तसे आपण या परफॉर्मन्स मध्ये आणि त्या गाण्यात अगदी गुंग झालो आहोत हे जाणवतं.

शेवटच्या क्षणी जेव्हा दोघी एकत्र उभ्या राहतात आणि कॅमेऱ्यामागून त्यांच्यावर फुलं उधळली जातात तो क्षण ही खास वाटतो. एकंदरच या व्हिडियोची ही सव्वा दोन मिनिटं आपलं मनसोक्त मनोरंजन करून जातात. या सव्वा दोन मिनिटांत आपलं एवढं मनोरंजन होतं की आपण आपसूक हा व्हिडियो अजून एकदा बघतो. या दोघींचं यानिमित्ताने कौतुक करायलाच हवं. आमच्या टीमला तर हा व्हिडियो खूप आवडला. आमच्या टीमकडून या दोघींना त्यांच्या कला क्षेत्रातील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

आपणही जर हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आवडला असणार यात शंका नाही. जर नसेल बघितला तर आवर्जून बघा. आपल्याला हा परफॉर्मन्स नक्की आवडेल. सोबतच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी सार्थ अपेक्षा आहे. आपण वाचक म्हणून आमच्या लेखांचं नेहमीच कौतुक करत आला आहात. आम्हीही उत्तम लेख लिहीत आलो आहोतच आणि यापुढेही लिहीत राहू. त्यासाठी आपलं प्रोत्साहन आम्हाला यापुढेही मिळत राहू दे हीच सदिच्छा. तोपर्यंत लेख वाचत राहा, शेअर करत राहा आणि आनंद वाटत रहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *