Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मराठमोळ्या मुलींनी कोळी गाण्यावर केला जबरदस्त डान्स, बघा एकदा व्हिडीओ

ह्या मराठमोळ्या मुलींनी कोळी गाण्यावर केला जबरदस्त डान्स, बघा एकदा व्हिडीओ

आपल्या लोककलांमधील दोन मानाची पानं म्हणजे कोळीगीत आणि त्यावरील कोळीनृत्य होय. या दोन्ही कलाप्रकारांनी आपल्या आयुष्यातील काही क्षणांना कधी ना कधी तरी स्पर्श केलेला असतो आणि अफाट असा आनंद दिलेला असतो. आपल्या इथे संपन्न होणाऱ्या प्रत्येक समारंभात कोळीगीतं आणि कोळीनृत्य यांचा समावेश हा असतोच. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम होय. या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हमखास एक तरी कोळीगीत हे असतंच आणि सहसा ते ‘मी हाय कोली’ हे असतं.

मुळातच या गाण्यात जो गोडवा आहे ना त्याचा अनुभव आपण गेली कित्येक दशकं घेत आहोत. एवढी वर्षे उलटून गेली ना तरी हे गाणं आजही सदाबहारच आहे. तसेच वर उल्लेख केल्याप्रमाणे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचा एक महत्त्वपूर्ण भाग राहिलेलं आहे. तसेच या गाण्यावर लहानपणी केलेला वा पाहिलेला डान्स हा आपल्या आठवणींच्या कप्प्यातली एक सुखद आठवण आहे. त्यामुळे हे गाणं आजही कुठे ऐकलं किंवा पाहण्यात आलं की जुन्या आठवणी चट्कन डोळ्यांसमोर येतात.

आज आपल्या टीमच्या बाबतीत असच झालं. मुळातच कोळीगीतं आणि नृत्य हा आमच्या टीमचा आवडीचा विषय आहे. त्यामुळे युट्युबवर या दोहींविषयी व्हिडियोज सर्च करत होतो. टाईमपास म्हणून. पण तेव्हाच एक नवीन व्हिडियो बघण्यात आला. त्यातली कोरिओग्राफी ही मस्त अशा स्टेप्सचा अंतर्भाव केलेली आहे. म्हंटलं हे तर झकास झालं. पण मग मनात विचार आला की आपण एकट्यानेच का याची मजा घ्यायची. आपल्या वाचकांना ही मजा घेऊ देत की. म्हणून मग हा लेख लिहायला घेतला आहे. तर मंडळी आपल्या बालपणीच्या आठवणी जागवणारा हा व्हिडियो मयूर अहिरराव यांच्या सोशल मीडिया चॅनेल वरून बघायला मिळतो. मयूर अहिरराव हे स्वतः उत्तम डान्सर असून कोरिओग्राफर म्हणून कार्यरत आहेत. गेली बरीच वर्षे ते या क्षेत्रात असून मुख्यतः मराठी आणि हिंदी गाण्यांची कोरिओग्राफी करताना दिसून येतात. ते स्वतः 2MAD म्हणजे अस्सल डान्सर च्या एका पर्वात, इंडियाज गॉट टॅलेंट स्पर्धेच्या दोन सिजन्स मध्ये दिसून आले होते. सोबतच डील या नो डील या कार्यक्रमात ही पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती होती. मयूर यांची कोरिओग्राफी लाभलेला हा व्हिडियो त्यांच्या चॅनेल वरील टॉप व्हिडियोज पैकी एक आहे.

या व्हिडियोत आपल्याला चार मुली या, ‘मी हाय कोली’ गाण्यावर डान्स करताना दिसतात. राशी पवार, ऊर्जा पवार, रिद्धी सोनवणे, प्रज्ञा तायडे अशी त्यांची नावे. या चारही जणी पारंपरिक कोळी पेहरावात दिसून येतात. तसेच नवीन डान्स स्टेप्स सोबतच पारंपरिक डान्स स्टेप्स ही करताना दिसून येतात. या दोन्ही गोष्टींचं कौतूक वाटतं. तसेच त्यांचा उत्साह हा वाखाणण्याजोगा असतो. त्यामुळे जसं आपण हे गाणं ऐकताना आठवणींमध्ये रमतो तसेच या कोळीनृत्याने त्या आनंदात भर पडते. आपण ही हा व्हिडियो पाहिला असल्यास आपल्याला ही आवडला असेलच. जर आतापर्यंत नसेल पाहिला तर आवर्जून बघा. आपल्या टीमने जसा आठवणींमध्ये रमण्याचा आनंद घेतला तसा आपणही घ्या.

त्यापूर्वी मंडळी एक मात्र जरूर करा. आपल्या टीमने लिहिलेला लेख आपल्या आप्तजनांसोबत शेअर नक्की करा. आपल्याला झालेला आनंद त्यांनाही होऊ द्या. आपली टीम नेहमीप्रमाणे येत्या काळातही आपल्या वाचकांसाठी नवनवीन विषयांवर लेख लिहिणार आहेच. आपणही नेहमीप्रमाणे आम्हाला प्रोत्साहन देत राहा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे सगळे लेख वाचा, आठवणीने शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.