Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मराठमोळ्या मुलींनी केला हटके डान्स, स्टेप्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या मराठमोळ्या मुलींनी केला हटके डान्स, स्टेप्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

डान्स हा कलाप्रकार म्हंटला की त्यात विविध प्रकार असतात हे आपण जाणतोच. तसेच अनेक वेळेस एकाहून अधिक डान्स प्रकारांची मिसळ करून फ्युजन डान्स ही केला जातो. तर काही वेळेस अन्य काही प्रयोग केले जातात. एकूणच काय तर डान्स म्हंटलं म्हणजे नवनव्या प्रयोगांची आणि आनंदाची मेजवानीच. असाच एक भन्नाट प्रयोग एका डान्स अकादमीने केला आणि तो वायरल ही झाला. आज आपल्या टीमने या डान्सचा व्हिडियो पाहिला आणि आम्ही तर याचा खूप आनंद घेतला. म्हंटलं आपल्या वाचकांना ही या विषयी कळू देणं उत्तम राहील म्हणून आता हा लेखप्रपंच मांडला आहे.

हा वायरल डान्स केला आहे रायझिंग स्टार डान्स अकादमी, पुणे मधील गुणी नृत्यांगना आणि कोरिओग्राफर यांनी. काही महिन्यांपूर्वी त्यांनी एकत्र येत हा डान्स सादर केला होता. यातील कोरिओग्राफर आहेत अनिकेत अविनाश गायकवाड. तसेच ज्या मुलींनी हा परफॉर्मन्स सादर केल्या त्या म्हणजे रोशनी काकडे, वैष्णवी उंबरे, अंकिता गायकवाड, आरती येलने आणि ऐश्वर्या मोरे. या सहा जणांनी साडे तीन मिनिटाच्या या डान्स परफॉर्मन्स मध्ये अक्षरशः धमाल केली आहे.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला चंदेरी पदर दिसत राहतो. मग पुढच्या काही सेकंदात व्हिडियो एडिटिंग ची कमाल दिसते. पण हा तर फक्त ट्रेलर असतो. अजून तर पिक्चर बाकी असतो. एव्हाना आपल्या कानावर गाण्याचं म्युझिक पडायला लागलेलं असतं. तसेच आता कॅमेरा ही स्थिरावलेला असतो आणि मग आपल्या समोर पाच मुली उभ्या असलेल्या दिसून येतात. पाचही जणींनी साडीचा कलात्मक वापर करत तयार केलेला पोशाख घातलेला असतो. रंग ही एकदम चमकदार असतात त्यामुळे त्या सगळ्या जणींची व्यक्तिमत्वं उठून दिसत असतात. गाणं पुढे सरकत आणि डान्स सुद्धा. सगळ्या जणी अगदी हसऱ्या चेहऱ्याने हा डान्स परफॉर्मन्स करत असतात. अगदी पूर्ण व्हिडियो भर त्या प्रसन्नतेने वावरतात. त्यामुळे आपसूक तो व्हिडियो पहिल्यापासून आपल्या आवडीचा होत जातो. त्यात त्यांच्या स्टेप्स ही मस्त अशा असतात. या डान्सची अजून एक गोष्ट आवडते ती म्हणजे प्रत्येक मुलीला केंद्रस्थानी येत डान्स करण्याची संधी मिळते.

यासाठी कोरिओग्राफरला पैकीच्या पैकी मार्क्स मिळायला हवेत. कारण केवळ एकाच मुलीभोवती हा परफॉर्मन्स फिरत नाही. तसेच त्या प्रत्येकीचा डान्स करताना केंद्रस्थानी येण्याच्या आणि परत जाण्याच्या स्टेप्स ही विशेष लक्ष वेधून घेतात. यात या मुलींचं कौतुक असं की त्या अगदी सहजगतीने हा सगळा परफॉर्मन्स पार पाडतात. ‘अर्जुन’ या चित्रपटातलं ‘डोळ्यांना काजळ’ हे गाणं इथे वाजत असतं. या गाण्यात अनेक बिट्स असे येतात जे या मुलींकडुन अगदी वेळेत पकडले जातात. त्यामुळे डान्स बघताना छान वाटतो. तसेच प्रत्येकीने यात अगदी ऊर्जा ओतून डान्स केल्याने हा पूर्ण व्हिडियो आनंददायी वाटतो. त्यात मरगळ येत नाही. तसेच यातील सुखद आश्चर्याचा धक्का म्हणजे खुद्द कोरिओग्राफर अनिकेत गायकवाड या परफॉर्मन्सच्या शेवटी डान्स करताना दिसतात. खरं तर एखाद्या फॅशन डिझायनरने फॅशन शो नंतर मॉडेल्स सोबत रॅम्प वॉक करणं आपण बघितलं असेल. पण कोरिओग्राफर डान्सर्स सोबत नंतर येऊन डान्स करणं तसं विरळ म्हणायला हवं. पण खरं तर ते व्हायला हवं. कारण प्रत्येक डान्स परफॉर्मन्स मध्ये अथ पासून ते इतिपर्यंत गोष्टी बघणारे हे कोरिओग्राफर असतात आणि ते पडद्याआड न राहता प्रेक्षकांसमोर येणं महत्वाचं वाटतं.

बरं यात अजून छान भाग असा की या मुलींनी केलेल्या डान्स मधील काही अप्रतिम स्टेप्स पुन्हा बघायला मिळतात. खासकरून डान्सर्सनी बसकण मारत आणि पाय स्लो मो मध्ये फिरवत केलेली स्टेप एकदम मस्त वाटते. ती पुन्हा बघायला मिळते. एकंदर काय तर हा व्हिडियो बघताना एकापेक्षा एक सुंदर स्टेप्स, उत्तम कोरिओग्राफी आणि नृत्यांगना, साजेसं गाणं असं हे सगळं धमाल समीकरण अगदी जुळून आलंय असा अनुभव घेता येतो.

आपल्या टीमने तर हा अनुभव घेतला. आम्हाला हा अनुभव आवडला सुदधा. आपणही कदाचित हा व्हिडियो बघितला असेल. कारण आतापर्यंत कित्येक लाख लोकांनी हा व्हिडियो पाहिला आहे. पण जर तुम्ही पाहिला नसेल तर आता वेळ मिळाला की हा व्हिडियो नक्की पहा. तुमचा वेळ नक्कीच आनंदात जाईल. तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी सार्थ अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच विविध विषयांवर लेखन करत असते. आपणही आम्हाला सदैव प्रोत्साहन देत असतात. त्यातूनच मग उत्तमोत्तम लेख लिहिले जात असतात. तेव्हा आपलं हे प्रोत्साहन आम्हाला सदैव मिळत राहू दे ही सदिच्छा. नेहमीप्रमाणे लेख शेअर ही करा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *