Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मराठमोळ्या मुलीने डीजेच्या गाण्यावर केलेला हा भन्नाट डान्स पाहून तुम्हीदेखील फॅन्स व्हाल, बघा व्हिडीओ

ह्या मराठमोळ्या मुलीने डीजेच्या गाण्यावर केलेला हा भन्नाट डान्स पाहून तुम्हीदेखील फॅन्स व्हाल, बघा व्हिडीओ

नुकताच झुंड सिनेमा प्रसिद्ध झाला. नागराज मंजुळे यांचा सिनेमा म्हंटला की चर्चा तर होणारच ना ! तशीच ती झाली आणि काही ठिकाणी तर अजूनही चालू आहे. हा सिनेमा सुद्धा दणक्यात चालू आहे. बरं यातील प्रेक्षकांना आवडेल अशी अजून एक बाजू म्हणजे यातील कलाकार मंडळी ! या सिनेमासाठी नवीन कलाकारांची भरती झाली असली तरी नागराज यांच्या आधीच्या चित्रपटातील बहुतेक सगळे कलाकार आपल्याला यात पुन्हा एकदा भेटून जातात. त्यामुळे हा सिनेमा पाहणं म्हणजे आनंद द्विगुणित करण्यासारखं आहे.

त्यात आर्ची आणि परशा यांच्या भूमिका असल्यावर सैराटच्या आठवणी ताज्या न झाल्या तरच नवल ! आधीच तो सिनेमा आणि त्यातील गाणी किती गाजली आहेत हे काही वेगळं सांगायला नको. अजय अतुल यांच्या जोडीने त्या सिनेमात अन, झुंड सिनेमातही बहारदार कामगिरी केली आहे यात शंकाच नाही. त्यामुळेच आजही झुंड सिनेमा बघून बाहेर पडल्यावर त्यातील कथानक जसं लक्षात राहतं तसच, त्यातील गाणी ही नकळतपणे ओठांवर रुळतात आणि लक्षात ही राहतात. पण अजय अतुल यांची गाणी ओठांवर रुळण हे काही नवीन नाही.

आता सैराट मधील ‘झिंगाट’ गाण्याचं उदाहरण घ्या ! आजही या गाण्यावर डान्स करावासा वाटलेला नाही असा कोणी अरसिक शोधून सापडणार नाही. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळयांना या गाण्याने वेड लावलं. इतकं की आजही अनेक समारंभात या गाण्याची झलक ऐकायला मिळते. काही वर्षांपूर्वी तर प्रत्येक समारंभात हे गाणं वाजत असे. याचं अगदी उत्तम आणि प्रातिनिधिक उदाहरण घ्यायचं झालं तर आमच्या टीमने बघितलेला व्हिडियोच घेता येईल. हा व्हिडियो साधारणतः तीन ते चार वर्षांपूर्वीचा आहे. या व्हिडियोत आपल्याला एक लहान मुलगी दिसून येते. ती बहुधा एखाद्या मिरवणुकीचा भाग असावी असं वाटतं. कारण तिच्या पुढे अनेक जण डान्स करत असतात आणि सोबत डिजे असतो. त्याने, ‘सैराट’ हे गाणं ही अगदी दणक्यात लावलेलं असतं. आता हे गाणं आहे म्हंटल्यावर पब्लिक नाचणारच ! पण यावेळी उपस्थित पब्लिक तशी नाचत कमी असते आणि या मुलीला प्रोत्साहन मात्र जोरकसपणे देत असते. का? कारण या मुलीचा या गाण्यावरचा अफलातून डान्स होय.

नऊवारी नेसलेली, डोईवर फेटा असलेली ही मराठमोळी पोर अगदी आत्मविश्वासाने गर्दीसमोर उभी असते. तिच्या या आत्मविश्वासासोबत तिचा प्रसंगावधान राखण्याचा गुणही पुढे लक्षात येतो. या आणि अशा अनेक कारणांमुळे या मुलीकडे आणि पर्यायाने या नवीन पिढीकडे पाहिलं की कौतुक वाटतं. कारण नसताना लाजत बीजत न बसता ही पिढी आत्मविश्वासाने उभी राहते. ठामपणे आपली कला ही सादर करते. याच मुलीचं उदाहरण घ्यायचं झालं तर तिचा डान्स उत्तम आहेच. त्यासोबतच तिचा अभिनय ही अतिशय उत्तम आहे. याच कारण अस की वर उल्लेख केल्याप्रमाणे या व्हिडियोत आपल्याला झिंगाट च डीजे व्हर्जन ऐकायला मिळतं. आता डीजे म्हंटलं की ते मध्ये काही तरी बडबड करतातच. पण त्यामुळे डान्स करणाऱ्या व्यक्तीच लक्ष विचलित होऊ शकतं आणि मग भला चाललेला डान्स बिघडून जातो. पण इथे मात्र तसं झालं तरी या मुलीचा आत्मविश्वास कायम असतो. तसेच ऐनप्रसंगी आपल्या परफॉर्मन्स मध्ये कसे बदल करावेत हे तिला बरोबर कळतं. वर उल्लेख केलेलं प्रसंगावधान ते इथे कळून येतं. त्यामुळे काहीही होवो तिची हसतमुख मुद्रा सतत आपलं मनोरंजन करत राहते.

या एकंदर तिच्या वागण्यामुळे हा संपूर्ण परफॉर्मन्स पाहणं हा आनंदाचा अनुभव असतो. आपल्या घरात असणाऱ्या चिल्ल्या पिल्ल्यांची आठवण यानिमित्ताने होते. त्यांचाही उत्साह आपल्याला असाच ऊर्जा देऊन जातो. आज आपल्या टीमला हा व्हिडियो अगदी अनावधानाने मिळाला. सहसा अचानकपणे बघितलेला व्हिडियो उत्तम असेल तरच आम्ही त्यावर लिहितो. हा व्हिडियो उत्तम आहेच. म्हंटलं यावर एक तरी लेख लिहायला पाहिजे. यानिमित्ताने या गुणी मुलीचा डान्स आणि अभिनय आपल्या वाचकांना अनुभवता येईल. त्यासाठी आपल्या टीमने हा व्हिडियो लेखाच्या खाली शेअर केला आहे याची नोंद घ्यावी.

असो. तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *