Breaking News
Home / बॉलीवुड / ह्या मराठमोळ्या मुलीने दहा वर्षे केले हिंदी चित्रपटात साईड अभिनेत्रीचे रोल, आता करोडोंची मालकीण आहे

ह्या मराठमोळ्या मुलीने दहा वर्षे केले हिंदी चित्रपटात साईड अभिनेत्रीचे रोल, आता करोडोंची मालकीण आहे

हृतिक रोशन आणि करिश्मा कपूर सोबत ‘फिजा’ काम करणारी ईशा कोप्पीकर आता 43 वर्षांची झाली आहे. भलेही ती बॉलिवूडमधे जास्त लोकप्रिय झाली नसेल, परंतु तिने लिडिंग आणि सहअभिनेत्री म्हणून खूप काम केल आहे. ईशाचा जन्म एका कोंकणी परिवारात १९ सप्टेंबर १९७६ साली मुंबईमधील माहीम मध्ये झाला होता. ईशाने सायन्स मधून ग्रॅज्युएशन केले होते. परंतु तिचा मॉडेलिंगकडे जास्त कल होता. तिने आपल्या कामाची सुरुवात मॉडेलिंग पासून केली होती. ईशाने कॉलेज मधे शिकत असताना एक फोटोशूट केला होता. त्यानंतर तिला मॉडेलिंग आणि जाहिरातींची ऑफर मिळाली. तिने 1995 मधे मिस इंडिया साठी प्रवेश मिळवला. त्यात तिने मिस टॅलेंटचा क्राऊन मिळवला. ईशाने 1998 मधे तामिळ सिनेमा ‘चंद्रलेखा’ द्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ईशाने हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मराठी चित्रपटात काम केलेले असून, ईशाच्या चर्चेत असलेले चित्रपट ‘गर्लफ्रेंड’, ‘डी’, ‘डार्लिंग’ आणि ‘शबरी’ हे आहेत. ईशाचा ‘कयामत’ हा लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे.

‘फिजा’ चित्रपटात हृतिक रोशन सोबतच्या कामाबरोबर तिला बॉलिवूड मधे पहिला ब्रेक मिळाला. ‘फिजा’ चित्रपटात ह्रितिक रोशन सोबत करिश्मा कपूर होती. त्यानंतर ती ‘प्यार, इष्क और मोहब्बत’, ‘अमदनी अठन्नी और खर्चा रूपया’, ‘ कंपनी, ‘ ‘काटे’, ‘दिल का रिश्ता’, ‘हेल्लो’, ‘एक विवाह ऐसा भी’ सारख्या खूप चित्रपटांचा भाग राहिली. खूपच कमी जणांना माहिती आहे कि ती ताईक्वांडोत ब्लॅक बेल्ट आहे आणि तिने अनेकवेळा संधी मिळताच आपले टॅलेंट दाखवले आहे. न्यूमरॉलॉजीवर तिचा विश्वास आहे आणि त्याच्या आधारावर तिने दोन वेळा तिच्या नावाची स्पेलिंग बदलली. बॉलिवूडमध्ये ईशा खास काही कमाल दाखवू शकली नाही. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत तिला साईड हिरोईनच्याच भूमिका जास्त मिळाल्या. तिने बॉलिवूडमध्ये जवळजवळ १० वर्षे संघर्ष केला. बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाची जादू चालली नसल्यामुळे तिने साऊथ चित्रपटांत काम करणे चालू ठेवले. तिने ‘मात’ आणि ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’ ह्या मराठी चित्रपटांत काम केले.

रिलेशनशिप बद्दल विवादामध्ये राहिलेली ईशाने फॅशन डिझायनर अनिता डोंगरे आणि प्रिया कटारिया सोबत काम करताना खूप मॉडेलिंग केली. तिच्या पर्सनल लाईफ बद्दल जर बोलाल तर रिलेशनशिप मुळे ती खूपच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. लग्ना आधी तिचे नाव इंदरकुमार सोबत जोडले गेले. त्याचवेळी इंदरकुमारने काही खुलासे केले होते. असं बोललं जातं कि इंदर कुमारच्या दारूच्या व्यसनामुळे दोघांचे ब्रेकअप झाले. ईशा साल 2009 मध्ये हॉटेल व्यावसायिक रोहित नारंग जो टिम्मी नारंग नावाने खूप प्रसिद्ध आहे, त्याच्या सोबत विवाह बंधनात अडकली. टीम्मी नारंग अनेक हॉटेल्सचा मालक आहे. मुंबईतील ‘लश रेस्टारंट’ आणि ‘द पॅलॅडियम’ हे त्याच्या मालकीचे आहेत. या दोघांची ओळख अभिनेत्री प्रीती झिंटाने करून दिली होती. आज ईशा आपल्या कुटूंबा बरोबर खूप सुखी आहे. त्या दोघांना एक 3 वर्षाची मुलगी रायना आहे. भले ईशाची जादू चित्रपटात नसेल चालली, परंतु ती आता कितीतरी हॉटेल्सची मालकीण असून तिच्या जवळ करोडोची मालमत्ता आहे. रुपेरी पडद्यावर आपली कमाल दाखवल्यानंतर इशा ने राजनीतीमध्ये सुद्धा आपले नशीब आजमावलं आहे. ती राजनीती मध्ये सक्रिय आहे. तिच्याकडे महिला परिवहन विभागाचे कार्यकारी अध्यक्षपद सोपवले आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.