Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मराठमोळ्या मुलीने हळदीमध्ये केला मनसोक्त डान्स, स्टेप्स पाहून तुम्हीही कौतुक कराल

ह्या मराठमोळ्या मुलीने हळदीमध्ये केला मनसोक्त डान्स, स्टेप्स पाहून तुम्हीही कौतुक कराल

गेले काही दिवस आपली टीम लहान मुलांचे वायरल व्हिडियोज बद्दल जास्त लिहीत होती. तसे व्हिडियोज ही आपण बघत होतो. पण असं असलं तरी लग्नातील वायरल व्हिडियोज वरील आपलं प्रेम थोडी कमी होणार आहे ? त्यातूनच मग काल आपल्या टीमने काही अप्रतिम वायरल व्हिडियोज बघितले आहेत. त्यातील एका धमाल व्हिडियोवर आजचा हा लेख आहे. चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडियो विषयी.

हा व्हिडियो आहे एका हळदीच्या समारंभातला. हळद म्हंटली की सुरापान आलंच आणि डीजे पण आलाच की. त्यात व्हिडियो काढणारे असतातच. त्यामुळे धमाल डान्स बघायला मिळतो. पण काही जण अजून कलात्मकता दाखवतात. अशीच कालात्मकता या व्हिडियोतून बघता येते. एरवीच्या गतीने व्हिडियो बघण्याऐवजी हा व्हिडियो आपण स्लो मोशन मध्ये बघतो. पण त्यात अख्खा डान्स दिसत नाही. तर केवळ छोट्या स्टेप्स दिसतात. त्यात या व्हिडियोत जी कुरळ्या केसांची मुलगी नाचते ती तर बेमिसालच म्हणायला हवी. तिचा डान्स बघूनच कळतं की हिला डान्स ची प्रचंड आवड असणार आणि सवय सुदधा असणार. मस्त नाचते. स्लो मोशन असल्यामुळे तिचे हावभाव अजून छान पद्धतीने दिसतात.

तिचा डान्स पाहिल्यावर नकळतपणे तिच्या विषयी जाणून घ्यावं वाटतं. त्यातून जी माहिती समोर येते त्यानुसार आपला अंदाज खरा ठरतो. ती एक उत्तम नृत्यांगना आहे हे सिद्ध होतं. या मुलीचं नाव आहे कांची शिंदे. मूळची मुंबईची असलेली कांची ही उत्तम नृत्यांगना म्हणून प्रसिद्ध आहे. वय लहान असलं तरी प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असण्याच कारण लहान वयातच तिने नृत्याची साधना सुरू केली होती. पूर्वाश्रमीच्या ई टीव्ही मराठीवरील एका डान्स रियालिटी शो मध्ये तिने भाग घेतला होता. त्यावेळी सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव आणि सुप्रसिद्ध कोरिओग्राफर धर्मेश सर हे परीक्षक होते. त्यांनी तिचं कौतुकही केलं होतं. तसेच सोनी वरील बुगी वुगी या लोकप्रिय रियालिटी शो मध्येही तिचा सहभाग होता. या काळात तिने नृत्यावर पकड बसवली. स्वतःतील कलाकाराला पैलू पाडले. त्यामुळे आज ती अनेकांना लावणी आणि इतर डान्स प्रकार शिकवत असते. ती जशी उत्तम डान्सर आहे, तशीच उत्तम अभिनेत्री सुद्धा आहे. सध्या ललित कलाकेंद्रातून ती अभिनयाचं आणि नाट्यकलेच प्रशिक्षण घेत असते. तिथे तिने काही उत्तम नाट्यकृतींमधून भाग घेतला आहे.

व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिलेल्या कुणाचा कुणाला मेळ नाही’ या वगनाट्यात तिने भाग घेतला होता. तसेच ‘स्लॅमबुक’ या मराठी चित्रपटातही ती दिसली होती. तसेच ती उत्तम चित्रकार ही आहे.एकूणच काय तर कांची ही एक उदयोन्मुख अष्टपैलू कलाकार आहे. सध्या तरी तिच्या डान्सचे व्हिडियोज वायरल होत आहेत. येत्या काळात तिच्या अभिनयाने नटलेल्या कलाकृती सुद्धा आपल्या भेटीस येतील हे नक्की. आपल्या टीमकडून तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!

हा व्हिडियो तसा छोटाच होता. पण त्यामुळे एका उत्तम कलाकाराची ओळख झाली आणि हा लेखप्रपंच घडून आला. आज वायरल व्हिडियो आणि उदयोन्मुख कलाकार असे दोन्ही विषय आमच्या कडून हाताळले गेले आहेत. आमच्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा. कारण आपल्या प्रतिक्रियांतून आम्हाला नवनवीन गोष्टी शिकायला ही मिळतात आणि प्रोत्साहन तर मिळत असतंच. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. आपला आमच्या वेबसाईटवरील वेळ उत्तम जावो ही सदिच्छा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.