Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मराठमोळ्या वधूने नवरदेवाच्या स्वागतासाठी लग्नमंडपातच केला डान्स, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

ह्या मराठमोळ्या वधूने नवरदेवाच्या स्वागतासाठी लग्नमंडपातच केला डान्स, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना वायरल होणं हे आपल्या सगळ्यांसाठी आता आयुष्याचा एक भाग बनलं आहे. या घटना सहसा वायरल होतात ते व्हिडियोज मार्फत आणि आपल्याला तर माहिती आहेच की वायरल व्हिडियोज म्हंटलं की आपल्या टीमचे कान टवकारले जातात. त्यातही लग्नातील डान्सचा वायरल व्हिडियो आहे म्हंटल्यावर तर आपल्या वाचकांनाही लेख वाचायला आवडतातच. आपल्या वाचकांची हीच आवड लक्षात घेऊन आपली टीम नेहमी लिखाण करत असते. आजही आपल्या टीमने एका लग्नातील व्हिडियो पाहिला. हा व्हिडियो नुकताच प्रचंड वायरल झाला होता. आपल्या वाचकांना याविषयी वाचायला आवडेल असं वाटलं आणि मग काय, त्याविषयी लिहावं असं ठरलं.

आजच्या या लेखाचा विषय असलेला व्हिडियो बहुतेक महाराष्ट्रातील एका लग्नात शूटिंग झालेला व्हिडियो आहे. कारण या व्हिडियोतुन आजूबाजूला दिसणारी मंडळी, खुद्द नवरा मुलगा आणि नवरी मुलगी असलेली आपली ताई यांचा पोशाख बघून तसं ठाम वाटतं. यांचे सगळ्यांचे पेहराव जसे उत्तम असतात तशीच लग्नातील व्यवस्था ही उत्तम असते.

सगळे वऱ्हाडी मंडळी बसलेली असतात. जवळच आत यायला जिथे जागा असते तिथे पायघड्या अंथरलेल्या असतात. याच पायघड्यांवरून या लग्नातील नवरा मुलगा येतो. अगदी रुबाबात हा दादा येत असतो. तेवढ्यात त्याला एक सुखद आश्चर्याचा धक्का बसतो. काय असतो हा धक्का ? त्याच्या स्वागतासाठी खुद्द ताई सामोरी आलेली असते. अर्थात ती काय केवळ औक्षण करण्यासाठी सामोरी आलेली नसते. यानिमित्ताने तिच्या होणाऱ्या पतीराजांचं जंगी स्वागत व्हावं असं तिच्या मनात असणार. कारण जसा आपला हा दादा समोर येतो तशी ती मस्त नाचायला लागते. गाणं पण धमाल निवडलेलं असतं. एक पहेली लिला या चित्रपटातलं ‘मेरे सैंय्यां सुपरस्टार’ हे ते धमाल गाणं. या गाण्याला आपण बऱ्याच लग्नांमध्ये वाजतात बघितलं असेलच. या मस्त गाण्यावर आपली ताईसुद्धा मस्त नाचते. तिच्यात जो उत्साह संचारलेला असतो त्याला तोड नाही. या डान्सद्वारे तिचं होणाऱ्या नवऱ्या विषयी असलेलं प्रेम ती व्यक्त करत असते. बरं यात केवळ डान्स करायचा म्हणून डान्स करत नसते ती. छान छान स्टेप्स करत ती हे क्षण सुंदर बनवते.

हे क्षण तिच्या आणि तिच्या पतीराजांच्या नेहमीच स्मरणात राहणार, हे नक्की. या सुखद क्षणांचे साक्षीदार होणारी बाकीची मंडळी ही या दोघांकडे आणि विशेषतः आपल्या ताईकडे कौतुकाने बघत असतात. या सगळयांना आनंद देणारा ताईंचा हा डान्स आपल्या टीमलाही आवडला. ती, तिच्या अहों साठी मनापासून नाचली हे आवडलं. आपणही हा व्हिडियो बघितला असल्यास आपल्याला ही आवडला असणारच.

तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असणार हे नक्की. आपण वाचक म्हणून आपल्या टीमला नेहमीच प्रोत्साहन देत असता. त्यातूनच नवनवीन विषयांवर लेखन करण्याची आमची उर्मी टिकून राहते. आपल्या या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !! यापुढेही आपला हा पाठिंबा आपल्या टीमच्या पाठीशी कायम असू द्यावा. लोभ असावा ही विनंती. तसेच लेख आठवणीने शेअर करा बरं का !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *