Breaking News
Home / मराठी तडका / ह्या मराठी अभिनेत्रींनीं केले बॉलिवूड सेलिब्रेटींशी लग्न, नंबर ५ जोडी खूप लोकप्रिय आहे

ह्या मराठी अभिनेत्रींनीं केले बॉलिवूड सेलिब्रेटींशी लग्न, नंबर ५ जोडी खूप लोकप्रिय आहे

आपण गेल्या काही काळात असंख्य कलाकारांची लग्न, साखरपुडे होताना पाहिले आहेत. त्यांच्याविषयी मराठी गप्पावरून वाचलं आहे. त्यातील काहींचं प्रेम विवाह आहे तर काहींनी ठरवून लग्न केलेलं आहे. बहुतांश कलाकारांचे जोडीदार हे मनोरंजन या क्षेत्राशी निगडीत नाहीत. पण काही कलाकार असेही असतात जे मनोरंजन क्षेत्रातील एक व्यक्ती जोडीदार म्हणून निवडतात. आजच्या या लेखातून आपण अशाच काही सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि त्यांच्या जोडीदारांविषयी वाचणार आहोत.

पल्लवी जोशी :


मराठी गप्पावर नुकतंच कार्तिकी गायकवाड हिच्या लग्नाची बातमी आपण वाचली असेल. कार्तिकी आणि बाकीचे लिटिल चॅम्प्स ज्या कार्यक्रमातून पुढे आले तो म्हणजे सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स. या शोच्या कर्त्या धर्त्या म्हणजे पल्लवी जोशी. त्यांनी या कार्यक्रमाची धुरा अतिशय सहजतेने सांभाळली होती. त्यांचं लग्न झालं ते विवेक अग्निहोत्री यांच्याशी. विवेक हे ही कालासृष्टीशी निगडित आहेत. त्यांनी हिंदी चित्रपट, शॉर्ट फिल्म्स, टेली फिल्म्स दिग्दर्शित केलेल्या आहेत.

रेणुका शहाणे :


हास्य सम्राज्ञी असं ज्यांना पाहून वाटतं, त्या म्हणजे रेणुका शहाणे. एक सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली आहे. तसेच सुरभी या कार्यक्रमांतून त्यांच्या उत्तम सुत्रसंचालनामुळे त्यांना देशभरातून लोकप्रियता मिळाली. या काळात, त्यांची आणि लोकप्रिय अभिनेते, कवी आशुतोष राणा यांच्या सोबत भेट झाली. प्रथमतः फोन वरून आणि मग प्रत्यक्ष भेटून. यातून मैत्री आणि मग प्रेम भावना वाढीस लागली होती. काही काळाने दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांना दोन मुले असून त्यांचा संसार उत्तमरीतीने चालू आहे. या दोघांच्या एकत्र अशा अनेक मुलाखतींतून त्यांची नैसर्गिक केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळते. त्यातही आशुतोष जी यांच्या अस्खलित हिंदी भाषेमुळे या मुलाखतींना चार चाँद लागतात.

गौतमी गाडगीळ :


गौतमी यांना आपण हिंदी मालिकांतून त्यांनी केलेल्या सहज सुंदर अभिनयासाठी ओळखतो. तसेच त्यांनी काही वर्षांपूर्वी आलेल्या बिनधास्त या चित्रपटात अभिनय केलेला होता. या गाजलेल्या चित्रपटा तील गौतमी यांची व्यक्तिरेखा त्यांच्या अभिनयामुळे गाजली होती. गौतमी यांनी प्रसिद्ध अभिनेते राम कपूर यांच्या सोबत लग्न केलेलं आहे. राम यांना आपण एक उत्तम अभिनेते म्हणून ओळखतो. त्यांच्या मालिका आणि सिनेमे प्रचंड गाजले आहेत. बडे अच्छे लगते है हे त्याचं एक उदाहरण. आज या जोडप्याला दोन मुलं आहेत.

अमृता खानविलकर :


मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. उत्तम अभिनेत्रीसोबतच ती कुशल नृत्यांगना आहे हे वेगळे सांगणे न लगे. मराठी सोबतच हिंदीतही उत्तम काम केलेल्या अभिनेत्रींपैकी एक. हिंदीत काम करत असताना, एका टॅलेंट शो च्या निमित्ताने तिची भेट हिमांशू मल्होत्रा या गुणी अभिनेत्यासोबत झाली. पुढे दशकभर ते रिलेशनशिप मध्ये होते. पुढे यथावकाश त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर त्यांनी नच बलीये चे दुसरे पर्व एकत्र जोडी म्हणून केले होते.

अश्विनी काळसेकर :


अश्विनी काळसेकर म्हणजे उत्तम अभिनयासोबत विनोदाचं उत्तम टायमिंग. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत वैविध्यपूर्ण भूमिका साकार केल्या आहेत. तसेच फु बाई फु या कार्यक्रमाच्या त्या परीक्षिकाही होत्या. मराठी तसेच हिंदीत विपुल काम केलेल्या अश्विनीजींनी मुरली शर्मा यांच्या सोबत लग्न गाठ बांधली आहे. मुरली शर्मा हे ही उत्तम अभिनेते म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांच्या अनेक हिंदी चित्रपटातील राजकारणी व्यक्तिरेखा गाजल्या आहेत. तसेच त्यांच्या विनोदाचं टायमिंग ही अश्विनीजी यांच्या प्रमाणे अफलातून आहे. दोघांनीही अनेक चित्रपटात एकत्र काम केलेले आहे.

किशोरी शहाणे वीज :


मराठी हिंदी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून किशोरीजींना आपण ओळखतो. त्यांनी कारकिर्दीची सुरुवात फार लवकर केली. त्यांचं व्यक्तिमत्व जितकं सुंदर तेवढाच त्यांचा अभिनयसुद्धा. त्यामुळे त्यांनी नायिका म्हणून अगणित चित्रपटांतून अभिनय केला. पुढे चित्रपट निर्माते दीपक वीज यांच्याशी त्यांची ओळख झाली. या ओळखीचं रूपांतर पुढे प्रेमात अनं मग लग्नात झालं. मागील वर्षी झालेल्या मराठी बिग बॉस च्या त्या एक महत्वपूर्ण सहभागी सदस्या होत्या.

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *