Breaking News
Home / मराठी तडका / ह्या मराठी अभिनेत्री यु ट्यु ब वर होत आहेत खूप लोकप्रिय, स्वतःचे आहे वेगळे चॅ ने ल

ह्या मराठी अभिनेत्री यु ट्यु ब वर होत आहेत खूप लोकप्रिय, स्वतःचे आहे वेगळे चॅ ने ल

आपण मराठी कलाकारांना युट्युब वेबसिरीजच्या माध्यमातून नेहमीच भेटत असतो. अनेक कलाकार या लॉकडाऊन मध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम लाइव चा वापर करताना दिसले. पण स्वतःच युट्युब चॅनेल असलेले कलाकार तसे कमीच. पण आता हा ट्रेंड बदलू पाहतोय. मराठी कलाकार आता युट्युब वर स्वतःच चॅनेल सुरु करताना दिसताहेत. तर चला बघूया कोण कोण आहेत ते मराठी कलाकार, ज्याचं स्वतःच युट्युब चॅनेल आहे ते.

स्पृहा जोशी :
अभिनेत्री, कवयत्री, निवेदिका. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. तिच्या अभ्यासपूर्ण निवेदनाने जसं आपल्याला नकळत मंत्रमुग्ध केलं तसचं तिच्या कवितांनी आपल्याला विचार करायला लावलं. आणि अभिनयाच्या क्षेत्रात तिची मुशाफिरी चालूच आहे. अशी स्पृहा युट्युबवर गेली दोन वर्ष आहे. तिच्या केवळ ७१ विडीयोज नंतर जवळपास ३६ हजाराहून अधिक असे सबस्क्रायबर्स “स्पृहा जोशी” या चॅनेलला लाभले आहेत. आणि का नसावेत. स्पृहाच्या कविता, तिचं कविता-पुस्तक वाचन, इतर कलाकारांशी गप्पा आणि आजूबाजूला चाललेल्या गोष्टी यांच्याबद्दल मीमांसा अशी मेजवानी तिच्या प्रेक्षकांसाठी आहे. तिने नुकतंच एक कोलॅबोरेशनसुद्धा केलंय. त्यामुळे तिच्या या चॅनेलकडून येत्या काळात विविध विषयांवर विडीयोज बघायला मिळतील यात शंका नाही.
(चॅनेलचे नाव : Spruha Joshi, फॉलोअर्स : ३७,६००+)

 

मधुराणी गोखले प्रभुलकर :
सध्या लोकांच्या चर्चेचा विषय ठरलेल्या “आई कुठे काय करते” या मालिकेतलं मध्यवर्ती पात्र म्हणजे अनुराधा. हे पात्र निभावलं आहे मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी. या मालिकेव्यतिरिक्त इतरही गाजलेल्या मालिकांच्या त्या महत्वपूर्ण भाग होत्या. त्यांचे पती प्रमोद प्रभुलकर आणि त्या मिळून एक संस्था चालवतात ज्याचं नाव आहे मिरॅकल्स अकादमी. याच अकादमी तर्फे एक वेबसिरीज प्रस्तुत केली जाते “मिरॅकल्स सरस्वती” या नावाने. युट्युब चॅनेलसुद्धा त्याच नावाचं आहे. तिचं नाव “कवितेचं पान”. या वेबसिरीज अंतर्गत मान्यवर कवींच्या कवितांचं वाचन केलं जातं. अनेक मान्यवरांनीसुद्धा या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. श्रीराम लागू, ना.धो. महानोर, वंदना गुप्ते, नीना कुलकर्णी, मंदार देवस्थळी. मृणाल कुलकर्णी, सावनी शेंडे आणि कित्येक मान्यवर.

२०१७ साली सुरु झालेल्या “मिरॅकल्स सरस्वती” चे आता पर्यंत १९ लाखाहून अधिक व्युज आहेत आणि ३६ हजाराहून अधिक सबस्क्रायबर्स. येत्या काळातही मधुराणी यांच्या या संकल्पनेतून उत्तमोत्तम कविता आणि मान्यवर यांच्या भेटीगाठी प्रेक्षकांशी ऑनलाईन होतील आणि युट्युब चॅनेलचा चाहता वर्ग सुद्धा कैक पटीने वाढेल यात शंका नाही.
(चॅनेलचे नाव : Miracles Saraswati, फॉलोअर्स : ३७,१००+)

तितिक्षा आणि खुशबू तावडे, गौरी नलावडे :
तितिक्षा आणि खुशबू या दोन्ही अभिनेत्री बहिणींना आपण त्यांच्या मराठी आणि हिंदी मालिकांमधल्या व्यक्तीरेखांसाठी ओळखतो. तितिक्षा यांनी कन्यादान आणि सरस्वती या सुप्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं आहे. तसचं खुशबू यांनीही तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये काम केलं आहे. आणि गेले वर्षभर त्या त्यांच्या “Pocket Full of Stories” या युट्युब चॅनेलवरून भेटीस येत आहेत. आणि यात त्यांची मैत्रीण, अभिनेत्री गौरी नलावडे सुद्धा सहभागी आहेत. या चॅनेलवरून प्रेक्षकांना बुक रीव्युज, एक मिनी वेबसिरीज पाहता येतात. आणि गौरी नलावडे यांच्या आवाजातील श्री स्वामी समर्थ तारक मंत्र सुद्धा आहे. या विडीयोला सुमारे सव्वा लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तितिक्षा, खुशबू आणि गौरी यांच्याकडून येत्या काळात अजून उत्तमोत्तम विडीयोज बघायला मिळतील यात शंका नाही. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा !
(चॅनेलचे नाव : Pocketful Of Stories, फॉलोअर्स : ३,१७०+)

मधुरा वेलणकर-साटम :
मधुरा वेलणकर यांना आपण ओळखतो ते त्यांच्या सिनेमा आणि मालिकांमधील व्यक्तिरेखांसाठी. पण याचबरोबर त्या उत्तम लेखिका आहेत हे सुद्धा आपण जाणतो. त्यांचं मधुरव हे पुस्तक २०१९ साली प्रकाशित झालंय. आणि त्याच पुस्तकावरून प्रेरित होऊन त्यांनी एक युट्युब चॅनेल सुरु केलं सुमारे तीन महिन्यांपूर्वी. त्यात त्यांनी मधुरव सीजन १ पूर्ण केला व सध्या मधुरव सीजन २ चालू आहे. या सीजनमध्ये त्या फेसबुक आणि युट्युब वर ऑनलाईन येतात. स्वतःच्या आणि इतर लेखकांच्या लेखांचही वाचन करतात. सोबत समाजातील मान्यवर व्यक्तींची छोटेखानी मुलाखतही असते. येत्या काळात त्यांच्या या चॅनेलवर अजून उत्तमोत्तम गोष्टी बघायला नक्की मिळतील अशी आशा बाळगूया.
(चॅनेलचे नाव : Madhura Welankar – Satam, फॉलोअर्स : ५९३)

सुलेखा तळवलकर :
भूमिका कोणतीही असो त्यात एकरूप होऊन काम करणारे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. सुलेखा तळवलकर हे त्यातलंच एक नाव. सिनेमा, नाटक, मालिका. कोणतही माध्यम असू द्या, त्यांनी आपली छाप सगळ्यांवर सोडली आहे. आणि सध्या त्यांनी सुरु केलंय एक युट्युब चॅनेल. दिल के करीब असं म्हणत या युट्युब चॅनेलवर त्या इतर मराठी कलाकारांच्या मुलाखती घेताना दिसताहेत. आत्ता पर्यंत निर्मात्या दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, निवेदिता सराफ, रुपाली भोसले, तितिक्षा तावडे यांच्या मुलाखती आपल्याला पहायला मिळतात. चॅनेल तसं नवीन असलं तरी सुद्धा ५०,००० व्युज त्यांच्या युट्युब चॅनेलने कमावले आहेत. येत्या काळात व्युज आणि सबस्क्रायबर्स संख्या जोमाने नक्कीच वाढेल. सुलेखाजींच्या या नवीन उपक्रमाला मराठी गप्पा टीम कडून खुप खूप शुभेच्छा !
(चॅनेलचे नाव : Sulekha Talwalkar, फॉलोअर्स : २,२१०+)

रुपाली भोसले :
आई कुठे काय करते या मालिकेतली संजना म्हणजे रुपाली भोसले. याआधी आपण त्यांना अनेक मालिकांमधून पाहिलं आहेच. गेल्या वर्षी झालेल्या मराठी बिग बॉस मध्येहि त्या होत्या. सध्या त्या संजनाची भूमिका तर बजावत आहेतच, तसचं, स्वतःच एक युट्यूब चॅनेलसुद्धा सुरु केलं आहे. या चॅनेलद्वारे त्या आपल्या प्रेक्षकांना विविध चविष्ट रेसिपीज करून दाखवताना दिसतात. बिग बॉस मधली स्पेशल खिचडी सुद्धा त्यांनी या चॅनेलच्या एका विडीयोमध्ये दाखवली आहे. त्यांच्या या नवीन चविष्ट उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा !
(चॅनेलचे नाव : Rupali Bhosle, फॉलोअर्स : १,९९०+)

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.