प्रत्येक कलाकाराची सुरुवात कुठून ना कुठून तरी झालेली असते. अनेक वेळेस एखाद्या कलाकृतीसाठी तर काही वेळेस वेगळ्या कामामुळे. आज आपण अशाच काही सुप्रसिद्ध मराठी कलाकारांची पहिली क माई किती होती, हे जाणून घेणार आहोत.
स्वप्निल जोशी :
स्वप्निल म्हणजे तरुणाईच्या गळ्यातला ताईत. ऐतिहासिक व्यक्तिरेखा, नायक, खलनायक, विनोदी, थरारपट अशा विविध माध्यमांतून स्वप्नील आपल्याला भेटतो. त्याचा अभिनय आणि सहज वावर यांमुळे तो आपल्यातलाच वाटतो. अभिनेता, परीक्षक अशा विविध भूमिकांतून तो आपल्याला सतत भेटत असतो. असा हा स्वप्नील जोशी आज किती मोठा स्टार आहे हे सांगायची गरज नाही. पण स्वप्नीलची पहिली क माई ऐकाल तर थक्क व्हाल. त्याची पहिली क माई होती केवळ ८० रुपये. एका नाटकात त्याने वठवलेल्या भूमिकेसाठी त्याला हे मानधन तेव्हा देण्यात आलं होतं. पुढे स्वप्निलने काही लोकप्रिय मालिका केल्या. पुढे सिनेमांमध्ये तो स्थिरावला.
दुनियादारी, फुगे, गोविंदा, मितवा, प्यार वाली लव स्टोरी, मुंबई-पुणे-मुंबई फिल्म सिरीज हि त्यातलीच काही निवडक नावे. सध्या अजून एका ऍनिमेटेड पटातून स्वप्निल आपल्या भेटीस येईल. ‘धीर’ असं या ऍनिमेटेड पटाचं नाव आहे आणि त्यातील मुख्य व्यक्तिरेखेला स्वप्निल याचा आवाज मिळाला आहे. तसेच स्वप्निल यांचं एक युट्युब चॅनेल असून या चॅनेलच्या माध्यमांतून स्वप्निल स्वतःचे अनुभव त्यांच्या चाहत्यांशी शेअर करत असतात आणि सोबतच इतरही मनोरंजक विडीयोज चाहत्यांना पाहायला मिळतात.
मुक्ता बर्वे :
स्वप्नील जोशी यांचा विषय निघाला कि हमखास आठवते ती ‘मुंबई-पुणे-मुंबई’ फिल्म सिरीज. या फिल्म सिरीज मध्ये स्वप्नील आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीने धम्माल उडवून दिली होती. यात मुक्ताने मुंबईच्या मुलीची भूमिका साकार केली होती. मुक्ताला आपण अनेक नाटके, मालिका, चित्रपट यांतील अभिनयासाठी ओळखतो. तिने नाट्य दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे.
तसेच सध्या तिच्या आवाजात उपलब्ध असलेले अनेक ऑडियो पुस्तकंहि आपल्याला ऑनलाईन ऐकता येतात. तिच्या या प्रवासाची तिने सुरुवात केली ती नाटकांतून. त्यातील एका नाटकातून तिला तिची पहिली क माई मिळाली होती, ती होती १५० रुपये. तिथपासून प्रवास करत, मजल दरमजल करत मुक्ता आज एक मोठी कलाकार म्हणून नावारूपास आली आहे. येत्या काळातही तिने अभिनित केलेल्या कलाकृती आपल्या भेटीस येतील हे नक्की.
आदेश बांदेकर :
महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणजे आदेश बांदेकर. आज कित्येक वर्ष आपण त्यांना होम मिनिस्टर या कार्यक्रमांतून पाहतो आहोत. कित्येक लाख किलोमीटर्स चा प्रवास त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने केला आहे. तसेच अनेकांना आठवत असेल तर ते दूरदर्शनवरील ‘ताक निधा धिन’ या कार्य्रमात सूत्रसंचालन करत आणि गाणीही गात. तसेच मधल्या काही वर्षांत त्यांनी मालिकांमध्येही काम केले होते. कलाक्षेत्रासोबतच ते सामाजिक कामांतही हिरीरीने सहभाग घेतात हे आपण पाहत आलो आहोतच.
त्यांची हि सामाजिक कार्याची आवड त्यांच्यात रुजली ती अभ्युदयनगर मधून जिथे ते राहत असत. किंबहुना याच अभ्युदय नगरमधून त्यांना पहिली क माई मिळवून दिली होती. त्यांच्या सुरुवातीच्या काळात ते सांस्कृतिक कार्यक्रमात अभिनय आणि इतर उपक्रमांमध्येही सहभागी होत असत. यातील एका कार्यकमात त्यांनी ढोल वादन केल्याबद्दल त्यांना १५ रुपये मानधन म्हणून मिळाले होते. याच सांस्कृतिक कार्यक्रमातून पुढे येत त्यांनी दूरदर्शनवर काम सुरु केले. पुढे होम मिनिस्टरची सुरुवात झाली आणि पुढे त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमांतून इतिहास घडवला.
अंकुश चौधरी :
आदेश बांदेकर यांची आठवण सांगताना अभ्युदय नगर चा उल्लेख झाला. मुंबईतील लालबाग, काळाचौकी , परळ या भागांनी अनेक उमदे कलाकार आपल्या मनोरंजन सृष्टीला दिले आहेत. या उमद्या कलाकारांमध्ये एक नाव प्रामुख्याने पुढे येतं ते म्हणजे अंकुश चौधरी. अंकुश, भरत जाधव आणि केदार शिंदे या कलाकार त्रिकुटाने आपल्याला अनेक आठवणी आपल्या नाटकांतून, मालिकांतून दिल्या. आजही हे तीन मित्र अनेक प्रोजेक्ट्समधून आपल्या समोर येत असतात. त्यांची सुरुवातही एकत्रच झाली होती.
केदार शिंदे यांचे आजोबा म्हणजे शाहीर साबळे. हे कलाकार त्रिकुट ऐन तारुण्यात असताना शाहीर एक कार्यक्रम करत असत. पुढे या कार्यक्रमाने इतिहास घडवला आणि आजही अनेक वेळेस या कार्यक्रमांच्या आठवणींना उजाळा मिळतो. या कार्यक्रमातून अंकुश यांनी काम केले होते आणि त्यासाठी त्यांना १५ रुपये एवढं मानधन त्याकाळी मिळालं होतं. पुढे यथावकाश सिनेमे, मालिका करत करत आज अंकुश अग्रगण्य कलाकारांच्या यादीत सदैव वरच्या स्थानावर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या द गडी चाळ, दुनियादारी या सिनेमांतील भूमिका नजीकच्या काळात विशेष गाजल्या आहेत. येत्या काळातही त्यांच्या कडून उत्तमोत्तम भूमिका साकारल्या जातील हे नक्की.
प्रसाद ओक :
अभिनेता, दिग्दर्शक, परीक्षक अशा प्रसाद याच्या कलाक्षेत्रातील विविध ओळखी. मुळचे पुण्याचे असलेले प्रसाद यांना पहिल्यापासून कलाक्षेत्राची आवड होती. हि आवड जोपासताना त्यांनी काम करण्यास सुरवात केली ती एका सांस्कृतिक कार्यक्रमातून. या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी त्यांना त्यावेळी २५ रुपये मिळाले होते. हि त्यांची पहिली क माई. ते या कार्यक्रमात कोरस म्हणून काम करत असत. पुढे पुण्यात त्यांनी अनेक नाटकांमधून कामे केली.
पुढे अनेक नावाजलेल्या मालिकांमध्ये नायक, खलनायक अशा विविध भूमिका त्यांनी रेखाटल्या. सिनेमातही काम केलं. नजीकच्या काळातल्या फ त्तेशिकस्त या गाजलेल्या सिनेमात त्यांनी अभिनय केला होता. तसेच कच्चा लिंबू, हिरकणी या सिनेमांचं दिग्दर्शनही त्यांनी केलेलं आहे. एका संगीत कार्यक्रमाचे ते विजेतेही राहिलेले आहेत. सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मध्ये ते परीक्षकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात.
नाना पाटेकर :
नाना असं नाव ऐकलं किंवा वाचलं तरीही मराठी मन आपोआप आदराने ज्यांना वंदन करतं असे नाना पाटेकर. अभिनेता म्हणून त्यांनी जे काम करून ठेवलंय त्याविषयी आपल्या मनात नेहमीच आदर असतो. तसेच सामाजिक कार्यातही त्यांनी जो सहभाग नोंदवला आणि योगदान केलं ते स्पृहणीयच. आपल्या आयुष्यात इतकं मोठ्ठं काम आणि प्रवास करणाऱ्या नानांची सुरुवात मात्र संघर्षमय होती. त्यांच्या मुलाखतीतून काही वेळेस त्यांचा या काळातील प्रवास डोकावतो. त्यांची पहिली क माई होती केवळ ३५ रुपये. एका ठिकाणी करत असलेल्या नोकरीमुळे त्यांना हा पगार मिळत असे. हा असा खडतर प्रवासा चालू असताना त्यांनी विजयाजी मेहता यांच्या कडे अभिनयाचे धडे गिरवले. नाटकांतून कामे केली. त्याकाळी त्यांचे पुरुष हे नाटक गाजले होते.
पुढे त्यांनी क्रां तिवीर सारखे लोकप्रिय सिनेमे केले. त्यातील अनेक संवाद आजही जसे नानांना मुखोद्गत आहेत तसेच त्यांच्या चाहत्यांनाही. नाटक, सिनेमा या माध्यमांतून काम करताना त्यांनी विविध विषय असलेले चित्रपट केले. त्यामुळे धीरगंभीर भूमिकांमधून दिसणारे नाना आपल्याला विनोदी भूमिकांमधूनहि हसवू शकले. त्यांची उदय शेट्टी हि भूमिका याची साक्ष देते. त्यांनी अनेक मराठी सिनेमांतही काम केले आहे. नटसम्राट हि तर त्यांची गाजलेली कलाकृती. येत्या काळात नानांची भूमिका असलेली एक कलाकृती आपल्या भेटीस येईल. इट्स माय लाईफ असं या सिनेमाचं नाव.