Breaking News
Home / मराठी तडका / ह्या मराठी सेलिब्रेटींनी केलंय अरेंजमॅरेज, ४ आणि ८ नंबरची जोडी नक्की पहा

ह्या मराठी सेलिब्रेटींनी केलंय अरेंजमॅरेज, ४ आणि ८ नंबरची जोडी नक्की पहा

मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकारांची लग्न दुसऱ्या एखाद्या कलाकार किंवा मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तीशी होतं. आणि त्यांची चर्चाही होते. पण अनेक वेळेस कलाकारांची लग्न अगदी कांदे पोह्याचे कार्यक्रम करूनसुद्धा होतात आणि त्यांच्याबद्दल तेवढं माहिती असतं असही नाही. पण काही जोड्या अशा असतात ज्या अरेंज्ड मॅरेज करूनसुद्धा त्यांचा प्रेमविवाह आहे असंच वाटत राहत. आज काही अशाच जोड्यांसाठी.

मृणाल दुसानीस :
मराठी मालिका आवडणाऱ्या प्रत्येकाला “माझिया प्रियाला प्रीत कळेना” हि मालिका आजही नक्कीच लक्षात असेल. तसच, तू तिथे मी, मन हे बावरे या मालिका सुद्धा मनात अगदी ताज्या असतील. या सगळ्यात एक समान दुवा कोणता. तर मृणाल दुसानीस आणि दुसरा समान दुवा म्हणजे या सगळ्या प्रेम कथा आहेत. तीनही मालिकांमध्ये मृणाल यांनी आपल्या तरल आणि सकस अभिनयाने त्या प्रेमकथांमधील आपल्या व्यक्तिरेखा खुलवल्या आहेत.

त्यांच्या विवाह झाला तो अगदी रीतसर बघण्याचा कार्यक्रम होऊन. त्यांच्या अहोंच नाव आहे नीरज मोरे. मुळचे पुण्याचे असलेले नीरज कामानिमित्त अमेरिकेत असतात. १४ मे ला त्यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने मृणाल यांनी गंमतशीरपणे पोस्ट टाकून त्यांना विश केलं होतं. कामानिमित्त दूर असले तरीही कायम एकमेकांसाठी वेळ काढताना ते आवर्जून दिसतात. २०१६ पासून ते आजपर्यंत एकमेकांना मनापासून साथ देणाऱ्या या जोडीला पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

प्रार्थना बेहरे :
उत्साही व्यक्तिमत्व आणि खळाळतं असं हास्य म्हणजे प्रार्थना बेहरे. हिंदी असो वा मराठी, सिनेमा असो वा मालिका आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्वाने तिने आपली छाप नेहमीच सोडली आहे. प्रार्थना हिचं लग्न झालंय ते अभिषेक जावकर यांच्यासोबत. अभिषेक हे दिग्दर्शक आहेत. या दोघांची ओळख विवाह जुळवणार्यांमार्फत झाली. ते भेटले २०१७ मध्ये आणि दोघांनी पुढे लग्न करण्याचा निर्णय घेतला. गोवा येथे त्यांचा विवाह संपन्न झाला. या उत्साही आणि तरूण जोडीला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा !

मृण्मयी देशपांडे :
अभिनेत्री, नृत्यांगना, निवेदिका, दिग्दर्शिका असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे मृण्मयी देशपांडे. आपल्या खळाळत्या हास्याने वातावरण प्रसन्न करणारी अभिनेत्री. तिचं स्वप्नील राव यांच्याशी २०१६ साली लग्न झालं. एका लग्न जुळवणाऱ्या वेबसाईट वरून त्यांची ओळख झाली आणि मग लग्न. स्वप्नील हे व्यावसायिक आहेत. आपला व्यवसायाचा व्याप सांभाळून ते मृण्मयी हिला तिच्या प्रोजेक्ट्स मध्ये सपोर्ट करताना दिसले आहेत. एकमेकांना सांभाळत आणि प्रोत्साहन देत घोडदौड करणाऱ्या या जोडीला मराठी गप्पा टीम कडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

भरत जाधव :
सही रे सही म्हणत अख्ख्या महाराष्ट्राने ज्यांना डोक्यावर घेतलं ते अफलातून व्यक्तिमत्व म्हणजे भरत जाधव. त्यांचा निरागसपणा त्यांच्या व्यक्तिरेखांमधून नेहमीच झळकत आला आहे. म्हणूनच त्यांच्या सच्चेपणावर संपूर्ण महाराष्ट्राने प्रेम केलंय. तसच सरिता जाधव यांनी सुद्धा. त्यांच्यातली केमिस्ट्री इतकी सही आहे कि त्यांचा प्रेमविवाह झालाय असं वाटावं. पण त्याचं अरेंज्ड मॅरेज आहे. सरीताजी नेहमीच भरतजी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत आणि आयुष्यातील चढ उतरांमध्ये त्यांना साथ दिली आहे. तसच त्यांना एकत्र काम करायलाही आवडतं. नुकताच त्यांच्या सोशल मिडिया पेज वर त्यांनी एक विडीयो शेयर केला होता ज्यात भरतजी आणि सरिताजी शेती आणि वृक्षारोपण करताना दिसत आहेत. अशा या सच्चा जोडीला येत्या काळासाठी भरपूर शुभेच्छा !

माधुरी दीक्षित नेने :
लाखो दिलो कि धडकन म्हणजे माधुरीजी दीक्षित. आपल्या नृत्याने अनेकांना भुरळ पडणाऱ्या माधुरीजींचं लग्न झालं ते डॉ. श्रीराम नेने यांच्याशी. पूर्वी अमेरिकेत स्थायिक असणारे श्रीरामजी आणि माधुरीजी आता मुंबई मध्ये स्थायिक झाले आहेत.

स्वप्नील जोशी :
स्वप्नील यांना आपण ओळखतो ते त्यांच्या श्रीकृष्ण या भूमिकेपासून ते आजपर्यंत त्यांनी केलेल्या विविध अर्थपूर्ण भूमिकांसाठी. स्वप्नील यांनी आपल्या करियर मध्ये अनेक कामे केली, अनेक चढउतार पहिले. आणि यात त्यांना खंबीर साथ दिली आहे ती त्यांच्या पत्नी लीना यांनी. या दोघांचं अरेंज्ड मॅरेज आहे. २०११ मध्ये त्यांनी लग्न केलं. लीना या पेशाने दंतचिकित्सक असून या दाम्पत्याला मायरा नावाची एक गोंडस मुलगी सुद्धा आहे. स्वप्नील आणि त्यांच्या परिवाराला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

कार्तिकी गायकवाड :
सारेगमप लिटील चॅप्म्स ची विजेती म्हणजे कार्तिकी गायकवाड. वडिलांच्या हाताखाली गाण्याचं शिक्षण घेता घेता स्पर्धेत तिने भाग घेतला आणि म्हणता म्हणता एक पर्व जिंकलं सुद्धा. पुढे म्हणता म्हणता तिचा गायन प्रवास प्रवास सुरु राहिला तो आजतागायत. आणि नुकतीच तिच्या साखरपुड्याची बातमी आली. तिचं लग्न ठरलंय ते रोनित पिसे याच्याशी. रोनित राहणारा मुळचा पुण्याचा आहे. पेशाने मेकनिकल इंजिनियर असलेल्या रोनितचा स्वतःचा व्यवसाय सुद्धा असल्याचं कळतंय. यंदा करोना काळात साखरपुडा झाला असला तरी येत्या काळात यंदा कर्तव्य आहेच. त्यांच्या साखरपुड्याचे फोटोज कार्तिकीने तिच्या सोशल मिडिया अकाउंट वर शेयर केले आहेत. त्यात सैराट गाण्याच्या साथीने एक सुंदर विडीयो सुद्धा आहे तो नक्की पहा. रोनित आणि कार्तिकी या दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

महेश कोठारे आणि नीलिमा कोठारे :
मराठी मनोरंजन क्षेत्रातलं प्रयोगशील, यशस्वी आणि चिरतरुण व्यक्तिमत्व कोणतं असा विचार आला कि हमखास एक नाव समोर येतं. धडाकेबाज महेशजी कोठारे. “डॅम इट !” म्हणत खलनायकांची धुलाई असो, सिनेमातले नाजूक प्रसंग, नाचगाणी असो कि खुद्द सिनेमाचं निर्माता दिग्दर्शक होणं असो. महेशजींनी प्रत्येक भूमिका समरसून आणि अंगभूत सळसळत्या उत्साहाने केल्या. आणि त्यांच्या या कारकिर्दीत त्यांना मोलाची साथ दिली ती नीलिमा कोठारे यांनी. अनेकांना त्याचा प्रेमविवाह असावा असं वाटतं, पण तसं नसून त्याचं अरेंज्ड मॅरेज आहे. तो काळ होता महेशजींच्या स्ट्रगलचा. बालकलाकार म्हणून त्यांनी सुरुवात केली असली तरी पदार्पणात त्यांना अडचणींना तोंड द्यावं लागलं. मराठी सोबतच ते त्यावेळी अन्य भाषांमध्येही काम करत होते. काम वाढत असलं तरीही म्हणावं तसं यश येत न्हवतं. त्याचवेळी निलीमाजी त्यांच्या आयुष्यात आल्या पत्नी म्हणून. आयुष्याला स्थिरता आली. अभिनयाबरोबरच दिग्दर्शक म्हणूनही काम सुरु केलं ते आजतागायत आणि जो घडत गेला तो इतिहास आहे. त्यांची कारकीर्द म्हणजे मराठी चित्रपटातलं मानाचं पान.

आधी निलीमाजी मनोरंजन क्षेत्राशी निगडीत न्हवत्या. पण “पछाडलेला” हा सिनेमा त्यांनी वेशभूषाकार म्हणून केला. त्यांना हुरूप आला आणि त्यांनी पूर्ण वेळ यात काम सुरु केलं. कोठारे विजन च्या गाजलेल्या “जय मल्हार” मालिकेतील व्यक्तिरेखांच्या वेषभूशेमागे त्यांचाच हाथ आहे. पुढे त्यांनी आपल्या मैत्रिणीस सोबत घेऊन या क्षेत्रात एक कंपनीही स्थापन केली.

नुकताच महेशजींनी एक विडीयो शेयर केला. ज्यात त्यांच्या आगामी मालिका, “ज्योतिबाच्या नावानं चांगभलं”च्या सेटसाठी भूमिपूजन झालं. त्यात निलीमाजी त्यांच्या सोबत दिसतात. तसेच आदिनाथ, उर्मिला आणि छोटी जिजा हे कोठारे कुटुंबीयही आपल्याला त्यात दिसतात. महेशजी जेवढे गप्पिष्ट तेवढ्याच निलीमाजी शांत वाटतात. पण तरीही त्यांची जोडी एकमेकांना सदैव पूरक वाटत आणि ठरत आली आहे. अशा या चिरतरुण जोडीला पुढील वाटचालीसाठी मराठीगप्पा कडून खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.