Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मराठी जोडप्याने स्वतःच्या लग्नामध्ये ‘झिंगाट’ गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

ह्या मराठी जोडप्याने स्वतःच्या लग्नामध्ये ‘झिंगाट’ गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

गेल्या काही महिन्यांत आपल्या टीमने वायरल व्हिडियोज या विषयाला केंद्रस्थानी धरून विपुल लेखन केललं आहे. आपल्या वाचकांना कोणत्या विषयावर वाचन करायला आवडतं हा मुद्दा लक्षात घेऊन हा लेखन प्रवास सुरु झाला आणि म्हणता म्हणता एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याची व्याप्ती वाढली. यातही लग्नातील वायरल व्हिडियोज ना तर जो अफलातून प्रतिसाद आपण दिला आहे त्यास तोड नाही. यामुळे आपल्याला लग्नातील जास्तीत जास्त वायरल व्हिडियोज विषयी लेख वाचायला मिळावेत याकडे आपल्या टीमचं विशेष लक्ष असतं. आजचा हा लेख त्याच मंदियाळीतला लेख आहे. चला तर मग जास्त वेळ न दवडता जाणून घेऊयात की हा व्हिडियो वायरल का झाला असेल बरं ? हा व्हिडियो आहे एका मराठी जोडीचा. अक्षय आणि दीक्षा असं या जोडीचं नाव. त्यांच्या लग्नाच्या वेळेस या दोघांनी एका अतिशय सुप्रसिद्ध गाण्यावर जो अप्रतिम डान्स केला होता त्यास तोड नाही….लाजवाब. हे गाणं होतं, ‘झिंगाट’ आणि या दोघांनी अगदी चित्रपटातील विविध स्टेप्स करत या डान्समध्ये रंगत आणली.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा खरं तर सगळं लक्ष वधू वरांच्या मित्रपरिवाराकडे लागून राहिलेलं असतं. धमाल मस्ती करत त्यांचा डान्स चालू असतो. तेवढ्यात कॅमेरा फिरतो आणि या वधु वरावर स्थिरावतो. मुंडावळ्या बांधलेले दोघेही एकमेकांना अनुरूप आणि सुंदर दिसत असतात. तेवढ्यात झिंगाट वाजायला सुरुवात होते. मग अक्षय आणि दीक्षा हळूहळू या गाण्यावर डान्स करायला सुरुवात करतात. पुढच्या काहीच सेकंदानंतर त्यांनी या गाण्यासोबत वेग पकडलेला असतो. मग काय धमाल. आत्तापर्यंत मित्रपरिवाराच्या डान्सकडे असलेलं सगळ्यांचं लक्ष या जोडप्याकडे लागून राहिलेलं असतं. त्यात त्यांच्या भोवती गर्दी जमू लागते. त्यांचा डान्सही फुलत जातो. त्यांचा डान्स आवडून एक काका त्यांच्या वरून काही पैसे ओवाळून टाकतात. पण या पैशांपेक्षा त्यावेळी या गाण्यावर डान्स करण्याकडे या जोडीचा कल असतो. कारण नंतर एक आजी येऊन सुदधा असंच काहीसं करतात. दोन्ही वेळेस हे पैसे नवरा नवरी इतरांकडे देऊन टाकतात. वर उल्लेख केल्याप्रमाणे मूळ गाण्यावरही डान्सप्रमाणे काही स्टेप्स करण्याकडे या दोघांचा कल असतो.

त्यात अजून एका मित्राची भर पडते. तो तर अगदी बसून नाचत असतो आणि यांच्या या आनंदात सहभागी होण्याचा प्रयत्न करतो. पण आपलं लक्ष मात्र या दोघांवर खिळून असतं. कारण एकमेकांसोबत नाचण्याचा आनंद घेण्यात ते व्यस्त असतात. या व्हिडियोची हीच खासियत वाटते आम्हाला. या दोघांच्या डान्समधून त्यांचा आनंद व्यक्त होत असतो. जी व्यक्ती डान्स करत असते ती व्यक्ती स्वतः आनंदी असेल तर बघणारे ही आनंदी होतातच. याचा प्रत्यय या व्हिडियोतही येतो. कारण प्रत्येक क्षणागाणिक या जोडीच्या भोवती गर्दी वाढत जाते. तसेच आपणही हा व्हिडियो ऑनलाईन बघत असतो आणि ते ही चार वर्षांनंतर तरीही आपण त्यांच्या या डान्सचा आंनद घेतो. आपल्या टीमला तर हा व्हिडियो प्रचंड आवडला. आपल्यालाही हा व्हिडियो पाहिला असल्यास आवडला असणार हे नक्की.

या व्हिडियो सोबतच आपल्या टीमने यावर लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे आपल्याला वाचक म्हणून जे आवडतं, त्यावर आपली टीम वेळोवेळी लिहीत असते. आपणही त्यास उदंड प्रतिसाद देत असता. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. आपण आमचे हे लेख मोठ्याप्रमाणात शेअर करता, त्यातून आम्हाला प्रोत्साहन मिळतं. ती ऊर्जा आम्हाला नवनवीन वायरल व्हिडियोज विषयी लिहिण्यास मदतशीर ठरते. तेव्हा आपला हा पाठिंबा यापुढील काळातही सातत्याने मिळत राहू दे हीच सदिच्छा !!आमच्या टीमवर कायम लोभ असावा. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *