Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मराठी महिला किती भारी बँजो वाजवतात पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा व्हिडीओ

ह्या मराठी महिला किती भारी बँजो वाजवतात पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा व्हिडीओ

काही वर्षांपूर्वी एका दुचाकीची जाहिरात येत असे. त्यात ‘व्हाय शुड बॉयझ हॅव ऑल द फन’ अस एक वाक्य होत जे लोकप्रिय झालं होतं. म्हणजेच जर आयुष्याची मजा घ्यायची आहे (जसे बाईक चालवणं वगैरे) तर ती केवळ मुलांनीच का घ्यावी, मुलींनी ही आयुष्याचा आस्वाद घ्यायला हवं, असा त्याचा मतितार्थ होता. आज कदाचित हे थोडं जुनं वाटेल कारण बहुतेक सगळ्याच क्षेत्रात स्त्रिया या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वोत्तम काम करताना दिसतात. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडियो आपल्या टीमने आज बघितला. आपल्या टीमला तर व्हिडियो आवडला आणि आपल्या वाचकांना तो आवडेल अस वाटलं म्हणून आज हा लेख लिहितो आहोत. हा व्हिडियो आहे एका महिला बेंजो पथकाचा. खरं तर मुली किंवा स्त्रिया या ढोल पथकात, सामील झालेल्या आपण पहिल्या असतील. पण पूर्णपणे बेंजो पथक महिलांनी चालवणं हे बघणं आमच्या टीमसाठी तरी नवीनच होतं. जसं आम्हाला याचं आश्चर्य वाटलं तसाच अभिमान सुदधा वाटला.

महिलांनी अजून एका क्षेत्रात पाऊल पुढे टाकल्याचा हा अभिमान होता आणि आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा असं लक्षात येतं या पथकाने बेंजो वादनाची सगळी तयारी केलेली असते. त्यात पूर्ण ड्रमसेट दिसून येतो. दोन ताई या सगळ्या सेटला सांभाळत असतात. समोरचचं कोणतं वाद्य कधी वाजवायचं त्याकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. पाठी ताशा हातात घेतलेल्या ताई सुद्धा दिसत असतात. मागे अजून काही वाद्य असतात. ढोल ही असतोच. मिळून सगळ्या जणी अगदी जोशात, उत्साहात बेंजोवादन करत असतात. या बेंजो वादानासाठी त्यांना अगदी पैकीच्या पैकी मार्क्स दयायला हवेत. कारण या सगळ्या ताया अगदी मस्त बेंजो वाजवत असतात. त्यांचं वादन ऐकताना बरं वाटत असतं. तसेच त्यांचा उत्साह सुदधा बघण्यासारखा असतो. नव्हे तो वाखाणण्याजोगा असतो. बेंजो असो वा इतर कोणतंही वाद्य असो. ते वाजवण्यासाठी जबरदस्त ऊर्जा लागते. ती या सगळ्या जणींमध्ये अगदी पुरेपूर दिसून येते. हे वादन चालू असताना त्या एकमेकिंकडे बघत वादन करत असतात. तेव्हा त्यांच्यात हे वादन पूर्णपणे भिनलंय याचा प्रत्यय येत असतो.

वादन करणारा मस्त उत्साहात आणि जोशात वादन करत असेल तर आपल्याला ही मजा येते. हाच अनुभव आपल्याला हा छोटासा व्हिडियो मिळवून देतो. कमी वेळेचा असला तरीही आपण जो काही वेळ आपण हा व्हिडियो बघतो त्यातूनही उत्तमरित्या आनंद घेता येतो. यातूनच मग या बेंजो पथकाची माहिती मिळते का ते बघण्याचा प्रयत्न केला. पण हे पथक अलिबाग मधील आहे हे कळलं. तसेच त्यांचे नाव चिंतामणी म्युझिकल ग्रुप असावे असे कळते. हे पथक अलिबाग चे नक्की असावे पण त्यांच्या नावाविषयी मात्र खात्री नाही. असो. हरकत नाही. त्यांच्या पथकाविषयी येत्या काळात माहिती मिळेल अशी आशा बाळूगुया. तसेच आपल्या टीमकडून या संपूर्ण पथकाला मानाचा मुजरा. आपल्या पथकाची यशस्वी वाटचाल होवो ही सदिच्छा.

आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच विविध विषयांवर लेखन करत असते. वाचकांना हटके असं काही तरी वाचायला मिळावं ही आमची इच्छा असते. त्यातुनच मग असे उत्तम विषय पुढे येतात. तेव्हा आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नेहमीच प्रोत्साहनपर आणि मार्गदर्शक ठरत आल्या आहेत. यापुढेही आपला आणि आमच्या टीमचा स्नेह असाच वाढत राहू दे ही सदिच्छा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.