Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मराठी शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत केलेला हा अप्रतिम डान्स होतोय वायरल, बघा व्हिडीओ

ह्या मराठी शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत केलेला हा अप्रतिम डान्स होतोय वायरल, बघा व्हिडीओ

मराठी गप्पाच्या वेबसाईटवर आपण अनेक लेख वाचत आलेले आहात. मराठी मालिका, सिनेमे, नाटकं, त्यातील कलाकार, त्यांची आयुष्ये-कारकीर्द, वायरल व्हिडियोज आणि बरंच काही असा भरगच्च माहितीचा खजिना घेऊन आमची टीम आपल्या भेटीस येत असते. याच खजिन्यात भर पडणार आहे एका वायरल व्हिडियो वरील लेखाची. हा व्हिडियो आहे महाराष्ट्रातील एका शाळेचा. या व्हिडियोत आपल्याला दिसते ती एक वर्गशिक्षिका आणि तिचे आज्ञाधारक विद्यार्थी. जिल्हा परिषदेची शाळा म्हंटली म्हणजे आपल्या समोर येते ती जुन्या बांधणीची शाळा, त्यात असलेले आपले छोटे विद्यार्थी मित्र आणि त्यांच्याकडून अभ्यास करून घेणारे गुरुजन. असंच काहीसं चित्र हमखास उभं राहतं. पण या अभ्यासापालिकडे अनेक उपक्रम या शाळांतून होत असतात.

असाच काहीसा उपक्रम या वर्गशिक्षिकीने हाती घेतलेला दिसतो. आपल्या विद्यार्थ्यांना नृत्य शिकवण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केल्याचे या व्हिडियोतुन दिसून येतं. व्हिडियो ची सुरुवात होते ती एका सुप्रसिद्ध हिंदी गाण्याच्या सुरावटींनी. या सुरावटींना साजेसे असे नृत्य ही वर्गशिक्षिका करत असते. पाठी दोन ओळीत उभी असलेली ही मुलं आपल्या वर्गशिक्षिकेप्रमाणे अगदी जसेच्या तसे नृत्य करण्याचा प्रयत्न करत असतात. बरेचसे त्यात यशस्वी होत असतात तर काही थोडंस चुकत पण प्रयत्न करत असतात. पण त्यांचा हा समूह नृत्यप्रकार असल्याने त्यांच्यातील एकसंधपणा आपल्याला व्हिडियोच्या अथपासून ते इतिपर्यंत भावतो. सुरावटींना शब्दांची साथ मिळते आणि या नृत्यात अजून रंग भरण्यास सुरुवात होते. यात नृत्यनिपुण वर्गशिक्षिका आघाडीवर असतात. त्यांची देहबोली, त्यांचे चेहऱ्यावरचे गाण्याला अनुसरून बदलणारे भाव एकदम योग्य वाटतात. त्यांच्या उत्साही स्वभावामुळे त्यांचे विद्यार्थीही उत्साहात नाचत असतात. काही विद्यार्थी प्रेक्षकांच्या भूमिकेत बाजूला बसून हे नृत्य पाहत असतात.

तर काही विद्यार्थी या दोन ओळींच्या पाठी गुपचूप गुपचूप आपापला डान्स करत असतात. एकूणच संपूर्ण वातावरण हा व्हिडीओ बघणाऱ्याला गुंतवून टाकतो. त्या वर्गशिक्षिकेचं नृत्यावर असलेलं प्रेम आणि त्यामुळे या नृत्यात येणारी सहजता आपल्या लक्षात आल्यावाचून राहत नाही. तसेच त्यांना तेवढीच सातत्यपूर्ण साथ देणाऱ्या विद्यार्थ्यांचंही कौतुक. आपल्या वर्गशिक्षिकेच्या सांगण्याबरहुकूम त्यांनी केलेले नृत्य अगदी अप्रतिम. समूह भावना आणि एकोपा वाढीस लागण्यासाठी अनेक कॉर्पोरेट्स कंपन्यांमध्ये होणाऱ्या एच. आर. ऍक्टिव्हिटीजची आठवण या प्रसंगी होते. अतिशय शिस्तीने आणि निरागसपणे हे नृत्य सादर करणाऱ्या या मुलांचं मनापासून कौतुक आणि मुलांना अभ्यासासोबतच इतर कलांमध्ये ही प्रोत्साहन देणाऱ्या या शिक्षिकेचे धन्यवाद आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *