Breaking News
Home / मराठी तडका / ह्या मराठी सुपरस्टारला आली अंडरवर्ल्डकडून ३५ कोटींची जीवे मारण्या ची धमकी, दादर पोलिसांकडे केली तक्रार

ह्या मराठी सुपरस्टारला आली अंडरवर्ल्डकडून ३५ कोटींची जीवे मारण्या ची धमकी, दादर पोलिसांकडे केली तक्रार

लोकप्रिय अभिनेते महेश मांजरेकर ह्यांनी दादर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार केली आहे. महेश मांजरेकर ह्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना फोनवर कोणी अज्ञात व्यक्तीने हि धमकी दिली आहे आहे, आणि सोबतच ३५ कोटी रुपयांची मागणी सुद्धा केली आहे. धमकी मिळाल्यानंतर महेश मांजरेकर ह्यांनी दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. महेश मांजेरकर ह्यांनी पोलिसांना सांगितले कि त्यांना ज्या व्यक्तीचा मॅसेज आला होता, त्याने स्वतःचे नाव अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम ह्याचा खास माणूस असल्याचे सांगितले आहे.

पोलिसांनी गंभीरतेने घेतली दखल
महेश मांजरेकर ह्यांच्या तक्रारीला पोलिसांनी गंभीरतेने घेतले आहे आणि ह्या घटनेच्या तपासाची कामगिरी मुंबई पोलिसांची क्राईम ब्रांच आणि एसटीएफ ह्यांच्याकडे सोपवली आहे. तर ज्या व्यक्तीचा मेसेज आला होता, त्याला सुद्धा पोलिसांनी पकडले आहे आणि पोलीस त्या व्यक्तीची कसून चौकशी करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार महेश मांजरेकर जेव्हा पोलिस स्थानकात गेले होते तेव्हा खूपच घाबरले होते. परंतु जेव्हा धमकी देणाऱ्या व्यक्तीला पकडले तेव्हा महेश मांजरेकर ह्यांचा तणाव कमी झाला.

महेश मांजरेकर ह्यांनी ह्या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले कि ते आता सुरक्षित आहेत आणि पोलीस सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. खंडणी मागणारा मॅसेज सामान्य एसएमएस द्वारा आला होता. महेश मांजरेकर ह्यांच्या म्हणण्यानुसार फोन करणारा माणूस कदाचित बेरोजगार आणि गरीब होता. त्यामुळे त्याने मेसेज केला होता. तर दुसरीकडे ह्या व्यक्तीला पकडल्यानंतर क्राईम ब्रांच कडून ह्या घटनेचा अजून कसून तपास चालू आहे. महेश मांजरेकर ह्यांनी अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांत काम केलेले आहे. त्याच बरोबर त्यांनी अनेक चित्रपट बनवले आहेत. ते बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय कलाकार आहेत.

About IrK0sFrKWQ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *