86,500 ही एका गाडीच्या चलान ची रक्कम आहे. ही घटना आहे ओडिसाच्या सबलपूर जिल्ह्यातील. ट्रक चालक अशोक जाधव वर 1 सप्टेंबर रोजी मोटर वाहन कायद्याचे नवीन नियम लागू झाले. तेव्हापासूनच मोठं मोठ्याला चलन रकमेच्या वार्ता सर्वठिकाणी पसरत आहेत. त्यापैकी ही तब्बल 86 हजार रुपयांची चलन रक्कम सर्वात अधिक असून आतापर्यंतची सर्वात मोठी चलन रक्कम आहे.
कुठला होता ट्रक? कुठे जात होता? कोठून येत होता?
NL01 G1470 नंबर प्लेट असलेला हा ट्रक नागालँड मधील कंपनी ‘BLA इन्फ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड’ यांच्या मालकीचा होता. ओडिसामधील अंगुल जिल्ह्यात तालचर नावाचे एक शहर आहे. 3 सप्टेंबर रोजी इथूनच हा ट्रक छत्तीसगड कडे जात होता. अंगुल च्या पूढे देवगढ़ हा जिल्हा आहे आणि त्यापलीकडे संबलपुर हा जिल्हा येतो. येथेच हा ट्रक पकडला गेला. या ट्रकच्या आतमध्ये JCB मशीन धुतली जात होती. चलानचे छायाचित्रं हे सोशिअल मीडिया वर प्रसारित झाले आणि सर्वत्र चर्चेचा विषय बनले.
कोण कोणत्या गोष्टींचे चलन लावले गेले? कोणत्या गोष्टींमुळे ट्रक वर एवढ्या रकमेचा फाईन लावला गेला?
गैररित्या एका अन्य व्यक्तीला गाडी चालवायला दिल्यामुळे 5000 रुपये. बिना लाइसेंस गाडी चालवल्यामुळे 5000 रुपये. गाडीमध्ये ओवरलोडिंग केल्यामुळे 56,000 रुपये. आपल्या मर्यादेपेक्षा जास्त आकाराचे समान वाहिल्यामुळे 20,000 रुपये. तसेच जनरल ऑफ़ेन्समुळे 500 रुपये. चलनची एकूण रक्कम तब्बल 86,500 रुपये एवढी झाली. परंतु ट्रक चालकाने तब्बल 5 तास वाहतूक पोलिसांबरोबर वादविवाद केला. त्यांना विनवणी केली. त्याने खूप विनवण्या केल्यानंतर ८६ हजारावरून हा दंड ७० हजारापर्यंत आला. हा सर्व प्रकार ३ सप्टेंबरला घडला होता. पोलिसांनी ट्रक आपल्या ताब्यात घेतला. ह्या चालकाने तीन दिवसानंतर दंडाची रक्कम आरटीओ च्या कार्यालयात भरल्यानंतर त्याला त्याचा ट्रक देण्यात आला.
सर्वात जास्त चलनचे पैसे ओडिसा येथून येत आहेत. 1 सप्टेंबर रोजी नवीन वाहन कायदा लागू झाला. कायदा लागू होताच सुरुवातीच्या 4 दिवसातच ओडिसा राज्यात तब्बल 88 लाख रुपयांचे चलन जमा झाले आहे. बाकी राज्यांच्या तुलनेत हा आकडा अधिक आहे. आत्ताच गेल्या काही दिवसांपूर्वी भुवनेश्वर येथील एका रिक्षा चालकाची बातमी आली होती. त्याच्या जवळ ड्राइविंग लाइसेंस नव्हते. तसेच RC आणि इंश्योरेंस पेपर्सही नव्हते. त्यात भर म्हणजे तो मद्यपान करून रिक्षा चालवत होता. वाहतूक पोलिसांनी त्याला तब्बल 47,500 रुपायांचा दंड ठोठावला होता. ओडिसा च्या परिवहन विभागाने एक कॉल सेंटर सुद्धा सुरू केले आहे. त्याद्वारे मोटार वाहन कायद्याशी निगडित लोकांच्या समस्यांचे निराकरण केले जाईल.