आईचे प्रेम हे जगातील सर्वात श्रेष्ठ प्रेम असते. एक आई ज्याप्रकारे आपल्या मुलाची काळजी घेते तशी काळजी दुसरे कुणी घेऊ शकत नाही. सामान्यतः तर असंच होत असते कि, वडील कामावर जातात आणि आई घरी राहून मुलांची काळजी घेत असते. जरी आई नोकरी करत असेल तरीसुद्धा मुलांची खूपवेळा देखभाल हि आईच बघत असते. ह्याच स्थितीशी मिळते जुळते एक दृश्य काही दिवसांपूर्वीच आपल्याला नोएडा मध्ये पाहायला मिळाले. खरंतर सध्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका महिला कॉन्स्टेबलचा फोटो खूप जास्त वायरल होत आहे. ह्या वायरल फोटोमध्ये महिलेच्या कुशीत दीड वर्षाचे बाळ सुद्धा दिसून येत आहे. असे सांगितले जात आहे कि, हा फोटो त्यावेळी कॅमेरामध्ये काढला गेला आहे जेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नोएडा च्या दौऱ्यावर आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार फोटोत दिसत असलेल्या महिला कॉन्स्टेबलचे नाव प्रीती राणी असे आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार प्रीती ड्युटीदरम्यान आपल्या बाळाला ह्यासाठी घेऊन आली होती, कारण घरी ह्या बाळाची देखभाल करण्यासाठी कोणीही नव्हते. बाळाचे वडील परीक्षा देण्यासाठी गेले होते. अश्यातच प्रीतीचे काम सुद्धा महत्वाचे होते. त्यामुळेच तिने ड्युटीवर आपल्या बाळाला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. प्रितीने अश्याप्रकारे एक आई होण्याचे कर्तव्य आणि कॉन्स्टेबल असल्याने ड्युटी करणे हि दोन्ही कर्तव्य मनापासून निभावले. माहितीनुसार प्रीती ग्रेटर नोएडाच्या दादरी पोलीस स्टेशनसोबत जोडलेली आहे. सोमवारी तिची ड्युटी वीवीआयपी क्षेत्रात सकाळी ६ वाजल्यापासून होती. आई मुलाचा हा फोटो सोशिअल मीडियावर खूप जास्त पसंत केला जातोय. लोकं महिला कॉन्स्टेबलच्या मातृत्व आणि कर्तव्यनिष्ठेला सलाम करत आहे. काहींनी प्रीतीला प्रेमळ आई म्हटले तर काही तिला एक चांगली ऑफिसर म्हणत आहेत.
एकाने कमेंट केले कि, ह्या महिलेची कामाच्या प्रति भावना पाहून आपल्याला सुद्धा त्यांना सलाम करण्याचे मन करत आहेत. तर एकाने कमेंट केले कि ‘खरंतर मदर इंडियाचे टॅग त्यांच्यासाठी बरोबर वाटतंय.’ तुमच्या माहितीसाठी, यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ हे गौतम बुद्ध नगरला दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. ते रविवारी आणि सोमवारी आले होते. सोमवारच्या दिवशी नोएडा शहरात आले होते जिथे त्यांनी १४५२ कोटी रुपयांचे डेव्हलोपमेंट प्रोजेक्टचे लोकार्पण केले. ह्याशिवाय ते १३६९ कोटी रुपयांचे परियोजनांची पायाभरणी करताना सुद्धा दिसले. तसे तुम्हालाही ह्या आई आणि बाळाचा ड्युटीवरचा फोटो पाहून कसे वाटले, नक्की कमेंट करा.