Breaking News
Home / मनोरंजन / ह्या महिला सीईओ ने ऑफिसमध्ये केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहून बोलले ‘हि तर..’

ह्या महिला सीईओ ने ऑफिसमध्ये केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहून बोलले ‘हि तर..’

ऑफिसमध्ये दबावात काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपण त्रस्त होताना पाहिले असेल. ऑफिसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तणावामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपण ओळखत सुद्धा असतील किंवा स्वतः सुद्धा कोणत्या ऑफिसमध्ये काम करत असतील. परंतु आज आम्ही तुम्हाला एक असा व्हिडीओ दाखवणार आहोत, जे पाहिल्यावर तुम्ही हैराण होऊन जाल. ह्या व्हिडीओमध्ये एक मोठ्या कंपनीच्या सीईओ डान्स करताना दिसून येत आहेत. कारण त्यांच्या ऑफिसमधील वातावरण तणावमुक्त राहील. ह्या सीईओबरोबर ऑफिसमधील इतर कर्मचारी सुद्धा ह्या व्हिडीओमध्ये डान्स करताना दिसत आहेत. तर चला जाणून घेऊया ह्या व्हिडीओबद्दल. सध्या सोशिअल मीडियावर एक व्हिडीओ खूप जोरात वायरल होत आहे. वेलस्पन इंडिया लिमिटेडच्या सीईओ आपल्या ऑफिसमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांसोबत डान्स करताना दिसत आहे. वेलस्पन इंडिया लिमिटेड च्या ह्या सीईओ दीपाली गोएंका आहेत. ह्या व्हिडीओ मध्ये दीपाली गोएंका काही लोकांसोबत आपल्या ऑफिसमध्ये डान्स करताना दिसून येत आहे. दीपाली गोएंका सध्या वेलस्पन इंडिया लिमिटेडच्या चीफ एग्जीक्यूटीव ऑफिसर म्हणजेच सीईओ आणि जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर एमडी आहेत.

दीपाली आपल्या ऑफिसमध्ये इतर साथीदारांसोबत डान्स करत आहे. हा व्हिडीओ हर्ष गोएंका ह्यांनी शेअर केला आहे. जे आरपीजी इंटरप्राईज चे सीईओ आहेत. व्हिडिओला हर्ष गोएंका ह्यांनी आपल्या ऑफिशिअल ट्विटर हॅण्डल वर शेअर केले आहे. व्हिडीओ शेअर करताना हर्ष गोएंका ह्यांनी कॅप्शन मध्ये लिहिले आहे कि, ऑफिसमध्ये एखाद्या सीईओला डान्स करताना पाहणे, हि गोष्ट खूपच दुर्मिळ आहे. ह्याचसोबत हर्ष गोएंका ह्यांनी लिहिलंत आहे कि, हाच मार्ग आहे, योग्य वातावरण बनवायचा. हा व्हिडीओ सोशिअल मीडियामध्ये आल्यानंतर लोकांच्या खूप प्रतिक्रिया येत आहेत. सोशिअल मीडिया यूजर्सचे म्हणणे आहे कि, ऑफिसचे वातावरण अश्याच प्रकारचे असले पाहिजे. ज्यामुळे कर्मचारी कोणत्याही दबावाखाली काम करणार नाहीत. आणि जास्तीत जास्त आउटपुट देऊ शकतील. लोकांच्या ह्या व्हिडीओवर सकारात्मक कमेंट जास्त येत आहेत. लोकांचे म्हणणे आहे कि ह्यामुळे ऑफिसमध्ये आनंदाचे वातावरण बनून राहील. दीपाली गोएंका ह्यांची लोकं खूप स्तुती करत आहेत. लोकांचे म्हणणे आहे कि, अश्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी ऑफिसचे वातावरण हलकं ठेवते आणि लोकं चांगल्या प्रकारे काम करू शकतील.

ह्या व्हिडिओला दीपाली गोएंका ह्यांनी सुद्धा आपल्या ट्विटर हॅन्डलवर शेअर केला आहे. व्हिडीओ सोबत कॅप्शनमध्ये त्यांनी महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा, अडाणी चे संस्थापक गौतम अडाणी आणि बायोकॉनचे चेअरपर्सन किरण मजुमदार ह्यांना विचारले कि, ‘माझ्या ऑफिसचे वातावरण असे आहे. आणि तुमच्या ऑफिसचे?’ सर्वात खास गोष्ट अशी कि वेलस्पन इंडिया लिमिटेड च्या सीईओ दीपाली गोएंका मुकाबला गाण्यावर आपल्या कर्मचाऱ्यांसोबत डान्स करत आहेत. ह्या गाण्यावर त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार पूर्ण मस्ती सोबत डान्स करत आहेत. मानलं जात आहे कि, ह्या डान्सचा उद्देश ऑफिसच्या तणावपूर्ण वातावरणातून बाहेर येणे आहे. आणि चांगल्याप्रकारे काम करणे, ज्यामुळे काम सुद्धा ठीक होईल आणि तणाव सुद्धा नाही राहणार. सोशल साईट्सवर ह्या व्हिडिओची खुप चर्चा आणि स्तुती होत आहे. आणि लोकंही खूप जास्त लाईक आणि शेअर करत आहेत.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *