Breaking News
Home / मनोरंजन / ह्या महिलेने गावातील मिरवणुकीत केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या महिलेने गावातील मिरवणुकीत केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

आतापर्यंत आपल्या टीमने अनेक वायरल व्हिडियोज बघितले आहेत. त्यात डान्सच्या वायरल व्हिडियोजची संख्या नेहमीच जास्त राहिलेली आहे. अर्थात त्याच कारण म्हणजे आपल्या वाचकांना या प्रकारच्या व्हिडियोज वरील लेख वाचणं आवडतं. आम्हालाही हे लेख लिहिताना आनंद होतोच. पण आज आम्ही जो डान्स व्हिडियो पाहिला तो खरंच काहीसा वेगळा होता हे म्हणायला हवं. आणि आपल्याला तर माहिती आहेच की व्हिडियोत वेगळेपण असलं की आपली टीम त्यावर लेख लिहीत असतेच. चला तर मग या व्हिडियोविषयी जाणून घेऊयात.

हा व्हिडियो जवळपास तीन वर्षांपूर्वीचा आहे. आपल्याकडील एखाद्या गावातील मिरवणुकीचा हा व्हिडियो असावा असं वाटतं. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला थोडंसं लांब काही जण उभे असलेले दिसतात. नंतर लक्षात येतं की यातील एक गायिका आहेत. बाकीचे त्यांच्या सोबत असलेले काही सहकारी आणि आयोजक असावेत. तसेच त्यांच्या आजूबाजूला सगळे प्रेक्षक ही आलेले असतात. काही अगदी मांडी घालून खाली बसलेले असतात.

काहीच वेळेत त्यांच्या समोर नृत्याच एक सादरीकरण पेश होणार असतं. त्यासाठी एक ताई तयार होऊन मध्यभागी आलेली असते. व्हिडियो सुरू झाल्यावर काही क्षणात आपल्या कानावर गाण्याचे सूर पडू लागतात. एव्हाना मध्यभागी उभी असलेली ताई डान्स करण्यासाठी तयार झालेली असते. पण तेवढयात लक्षात येतं की चप्पल काढायची राहून गेली आहे. ती चप्पल काढते. तोपर्यंत सगळं कसं शांत असतं. आणि जशी ती नाचायला लागते की नाही अरारारा खतरनाक ! ताईला जणू बेली डान्स येत असतो की काय असं वाटायला लागतं. पहिले काही सेकंद ताईंचा हा डान्स चालू असतो. मग तिच्या काही स्टेप्स बदलतात. या सर्व काळात पाठीमागून ज्या ताई गाणं गात असतात त्यांच्या सोबत यांचा डान्स चालू असतो. अगदी गाण्याच्या गतीनुसार सुद्धा त्यांच्या स्टेप्स बदलत राहतात. याचा प्रत्यय येतो जेव्हा गाण्याचा वेग इतका वाढतो की आपल्याला ही नाचावंस वाटावं. इथे तर या ताई नाचत असतातच. त्यात त्या इतक्या वेगाने स्टेप्स करायला लागतात की धमाल येते.

तसेच त्यांचं कौतूक वाटतं. कारण ज्या वेगाने हे गाणं गतिमान होत त्याच वेगाने त्याची गती कमी होते. या कमी झालेल्या गतीप्रमाणे ताईसुद्धा आपल्या डान्सची गती कमी करतात. इतकी की चट्कन लक्षात यावी. त्यावर ठुमकत ठुमकत त्यांचा डान्स सुरू राहतो. मग पुन्हा वेगवेगळ्या स्टेप्स त्या करत राहतात. या सर्व वेळेत त्यांच्या उर्जेचं आपल्याला कौतुक वाटत राहतं. कारण हा व्हिडियो संपायला येताना ही गाण्याची गती पुन्हा वाढते. तेव्हाही त्यांचा डान्सचा वेग वाढलेला असतो. खरं तर ज्यांनी ज्यांनी डान्स केला आहे त्यांना कल्पना असेलच की एवढ्या जोरात नाचलं तर किती दम लागतो ते. पण या ताई मात्र अगदी जोमात असतात. त्यांच्या या उर्जेचं आणि डान्स कौशल्याचं खरंच कौतुक. आपल्या टीमला तर हा डान्स आवडला. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आवडला असेलच

आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच विविध विषयांवर लेख लिहीत असते. हा लेख सुद्धा त्यातलाच एक आहे. आमच्या टीमला हे सगळं शक्य होतं ते आपल्या प्रोत्साहनामुळे. यापुढेही आपलं हे प्रोत्साहन आम्हाला मिळत राहो ही सदिच्छा. आपल्या या प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.