Breaking News
Home / मनोरंजन / ह्या माकडाने भर रस्त्यात केलेली करामत पाहुन तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा अतरंगी व्हिडिओ

ह्या माकडाने भर रस्त्यात केलेली करामत पाहुन तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा अतरंगी व्हिडिओ

सोशल मीडियावर अतिशय मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ तर असे असतात जे पाहून हसू आवरणं कठीण होतं. आपल्या सर्वांना प्राण्यांचेही अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ अतिशय भीतीदायक तर काही मजेशीर असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काही व्हिडीओ प्रेरणा देणारेही असतात. तर काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. फक्त माणसांचेच नाही तर प्राण्यांचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत असतात. कधी जंगलातले प्राणी असतात तर कधी घरचे पाळीव. या सगळ्यातुन एकच निष्कर्ष निघतो, ते म्हणजे सोशल मीडियावर कधीही काहीही व्हायरल होऊ शकतं. प्राण्यांचे व्हिडीओ आवर्जून बघणारे अनेक लोक आहेत. या प्राण्यांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये काहीवेळा दोन प्राण्यांची हाणामारी असते. तर काही व्हिडीओमध्ये एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करत असल्याचं आपण पाहिलं असेल. प्राण्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला तर त्यां व्हिडीओमध्ये काय आहे, हे त्या प्राण्यावर ठरते. म्हणजे वाघ, सिंह असेल तर नक्कीच शिकारीची व्हिडीओ असतो. कुत्र्याचा असेल तर कधी गमतीदार तर कधी प्रामाणिकपणा दाखवणारा व्हिडीओ असतो. आणि माकड असेल तर 100 नाही 101% धमाल उडवणारा व्हिडीओ असतो. कारण माकड आपले पूर्वजच होते ना…

तर माकडाचे सध्या अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. आज आमच्या टीमकडे आलेला व्हिडीओ जुना आहे, मात्र तो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. आजच्या या व्हायरल व्हिडीओत एक अतरंगी माकड आहे, ज्याचे सगळे चाळे एखाद्या चुणचुणीत हुशार विद्यार्थ्याप्रमाणे आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे तर शाळकरी मुले हा व्हिडिओ पाहून पोट दुःखेपर्यंत हसलेली आहेत. या व्हिडिओत एक माकडाचे पिल्लू चक्क सायकल चालवत आहे. बर सायकल चालवत आहे, हे एव्हढ्यावरच माकडाचं पिल्लू थांबलेले नाही. त्याने मस्तपैकी हुडी घातलेली आहे, जी खूप स्टायलिश आहे आणि त्या माकडाला सूट पण होत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल स्टायलिश हुडी घालून, सायकल चालवत हे माकड नेमकं निघालंय कुठं?… तर हे माकड शाळेत चाललेलं आहे. या माकडाच्या पाठीवर एकदम ब्रॅण्ड कंपनीची सॅक पण आहे. त्यावरून हे माकड एकदम सज धज के शाळेत निघालेले आहे, हे दिसून येते. खरी मजा तर पुढे आहे.

जे जे लोक या माकडाचा एकदम हुशार अवतार बघून त्याचा व्हिडीओ काढत आहेत. त्यांना हे माकड एकदम स्टाईलमध्ये पोज देत आहे. या माकडाच्या एकूण अंदाजावरून आपले पूर्वज माकडच असल्याचा आपल्याला तर पटलं आहे. आजवर आपण लहान मुलांना क्युट म्हटलेलं आहे पण माकडाला क्युट म्हणत लोकांनी हा व्हिडीओ खूपच व्हायरल केला आहे. या माकडाचे हे नखरे बघून तुम्हालाही हसू येईल व लहान मुले तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघतील, असा आहे. अवघ्या काही सेकंदाचा हा व्हिडिओ लोकांचे पुरेपुर मनोरंजन करत आहे. माकडाचा असा अंदाज यापूर्वी तुम्ही कधीच बघितला नसेल. आता जेव्हा जेव्हा तुमच्या घरातील लहान मुले रडतील, तेव्हा त्यांना हा व्हिडिओ दाखवा… हा व्हिडिओ पाहून ते नक्कीच हसतील. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *