Breaking News
Home / मनोरंजन / ह्या माणसाचा महिला पुतळ्यासोबतचा डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा हा व्हिडीओ

ह्या माणसाचा महिला पुतळ्यासोबतचा डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा हा व्हिडीओ

लग्नाच्या व्हिडियोज बद्दल लिहून लिहून आपल्या टीमला त्यातील बऱ्याच समान गोष्टींची सवय झाली आहे. किंबहुना त्या अपेक्षितच असतात म्हणा ना. अगदी म्हणजे नवरा नवरीचा डान्स, त्यासाठी वाजणारं तेनु ले के मैं जावांगा हे गाणं, सोबतीला मित्रपरिवराने अगदी धुमशान घालणं आणि बरंच काही. तुम्हाला ही यांची सवय झाली असेल. पण काही तरी वेगळ्या विषयावर लिहुया, आपल्याला आणि वाचकांना ही बरं वाटेलं असं वाटत असतानाच एक नवीन व्हिडियो समोर आला. आता याच्याबद्दल लिहिलंच पाहिजे असं आम्हाला वाटलं आणि हा आजचा लेख आपल्या समोर येतो आहे. बरं हा व्हिडियो आहे एका लग्नसोहळ्यातला. पण तो नवरा नवरी विषयी नाही, तो त्यांच्या मित्रपरिवार आणि कुटुंबाविषयी सुदधा नाही. पण धमाल व्हिडियो आहे हे नक्की. जाणून घ्या तर मग नक्की आहे तरी काय या व्हिडियो मध्ये.

हा व्हिडियो आहे एका अशा माणसाचा जो जरररा ‘घेतली’ मध्ये आहे. बरं त्याने घेतली तर घेतली, पण एवढी घेतली आहे की समोर काय आहे, काय चाललंय याचं त्याला अजिबात भान नाही. कळतंय ते फक्त एवढंच की गाणं वाजतंय आणि आपल्याला डुलायचं आहे. म्हणजे त्याला डान्स केल्याचा भास होत असेलही पण आपल्याला हा झुलता मनोराच दिसतो ना. व्हिडियो सुरू होतो तेव्हा गाणं सुरू असतं ‘लकडी की काठी, काठी पे घोडा, घोडे के दुम पे जो मारा हतोडा.’ आपल्या पैकी अनेकांनी ऐकलेलं आणि आपल्याला आवडलेलं. पण इथे या गाण्यावर हा माणूस जो काही डान्स करत असतो की काय विचारू नका. बरं सोलो डान्स असेल तर बात वेगळी आहे. पण इथे साहेब ड्युएट सादर करण्याचा प्रयत्न करत असतात आणि जोडीदार असतो एक स्त्री पुतळा. ते नाही का लग्नमंडपात अगदी सुरुवातीला शोभा वाढावी म्हणून ठेवतात तो पुतळा. काय म्हणावं आता. पण भाऊ तर जोशात असतो. एक क्षण असा ही येतो की थेट ब्रेक डान्सचं सूरु होतो. सुदैवाने तेवढ्यात नवरदेवाचं लक्ष जातं म्हणून ठीक आहे.

मग जवळच उभी असलेली दुसरा एक माणूस आणि एक स्त्री त्याला हटकते आणि दूर पिटाळतात. पण एव्हाना हा व्हिडियो रेकॉर्ड करणारा मुलगा कॅमेऱ्यासमोर आलेला असतो. त्याला त्याचं हसणं आवरता येत नसतं. त्या घेतली वाल्याला हटकणारा माणूसही या हसण्यात सामील होतो आणि व्हिडियो संपतो.

एव्हाना आपणही यात सामील झालेले असतो. काय बोलणार यार या माणसांना अशी आपली प्रतिक्रिया असते. असो. याचसोबत हे ही सांगावेसे वाटते की मराठी गप्पाची संपूर्ण टीम कुठच्या ही प्रकारे दा’रू पिणे, धिं’गाणा घालणे अथवा न’शेत इतरांना काही त्रा’स होईल असे वागणे याला प्रोत्साहन देऊ इच्छित नाही. पाठींबा तर मुळीच नाही. केवळ चार क्षण मनोरंजन हाच या लेखामागाचा उद्देश आहे. बाकी तुम्ही सुज्ञ आहातच. तेव्हा नेहमी जबाबदारीने वागा, खासकरून सार्वजनिक ठिकाणी. आणि आपल्या मुळे इतरांना आणि पर्यायाने आपल्यालाही त्रा’स होणार नाही, याची काळजी घ्या. स्वतःला जपा. आपल्याला हा लेख आवडला असेल, अशी आशा आहे. आपला मराठी गप्पा प्रति असलेला स्नेह वृद्धिंगत होतो आहे. तो तसाच वाढता राहू दे. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.