Breaking News
Home / मनोरंजन / ह्या माणसाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा देखील जगण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल, व्हिडिओचा शेवट नक्की पहा

ह्या माणसाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा देखील जगण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल, व्हिडिओचा शेवट नक्की पहा

आजच्या या धकाधकीच्या जीवनात कुठंतरी थांबून थोडा वेळ स्वताला देणं गरजेचं असतं, कारण जीवनभर आपली, आपल्या अस्तित्वाची आणि त्यातील लोकांच्या इच्छापूर्ती करण्यासाठी आपण धडपड करतच असतो. अशावेळी काय होतं की आपल्या नैसर्गिक जीवनमानाचं चक्र बिघडतं, मग अनेक प्रकारचे रोग मागे लागतात, आयुष्यात समस्यां उदभवायला लागतात आणि आपल्याला समजत नाही की आपलं कुठे चुकतंय…. आपल्याला अनेकदा अशी लोकं दिसून येत असतात की, ज्यांच्याकडे मुबलक पैसा असतो, कुटुंब असते, नोकर-चाकर असतात, लोकांमध्ये इज्जत असते. भौतिक अर्थाने त्याचयकडे सुख असते, आनंद असतो पण समाधान नसते. त्याच्या आयुष्याची हा शेवटचा काळ सुरू असतो पण इथे आनंद घ्यायला त्याला जमत नाही. आपल्याला पण असं अनेकदा वाटत असते की, काय करतोय आयुष्यात? काय कळत नाही? उठ सूट एकच काम असते, एकच रुटीन असते… आयुष्य अगदी यंत्रप्रमाणे जगायची सवय लागलेली असते. जेव्हा असं वाटायला लागलं की आपल्या आयुष्यात समस्या निर्माण होतायेत तेव्हा कुठेतरी आपल्या आयुष्याचा समतोल बिघडलाय असं समजावं… आणि अशाच काळात एखादा सुंदर व्हिडीओ समोर यावा… त्याने आपल्याला विचार करण्याची एक वेगळीच बाजू दाखवून द्यावी.

तुमचा रुटीन किंवा दिनक्रम काय? असा प्रश्न मी आपणांस विचारल्यास, आपले उत्तर काय असेल? सकाळी उठून आवरणे, नोकरीवर जाणे, रोजचे काम जमेल तितक्या आवडीने किंवा फक्त पगार मिळतो म्हणून करणे, घरी येऊन परिवारासोबत वेळ घालविणे, मनोरंजनासाठी टी.व्ही. बघणे आणि जेवण वगैरे उरकून झोपी जाणे. आपण गृहिणी असाल, तर यात स्वैपाक करणे, मुलांची काळजी घेणे, त्यांचा होमवर्क वगैरे करून घेणे, या जबाबदाऱ्यासुद्धा आल्या. हे चक्र रोज त्याच गतीने फिरत असते. जवळजवळ त्याच वेळेला, रोज त्याच गोष्ट घडत असतात. अगदी रविवारचे रुटीनसुद्धा तेच-तेच झालेले असते – उशिरा उठणे, मनसोक्त टी.व्ही. बघणे, पिक्चर बघायला जाणे आणि बाहेर खाणे…. यात आयुष्य जगणं, आपण विसरलेलो असतो… आणि अशातही आपल्यापेक्षा कमी पगार असून, साधे वागणे- वावरणे असणारे लोक प्रचंड समाधानी असतात. हे लोक दुसरे-तिसरे कोणी नसून आपल्याच ऑफिसमध्ये आपल्या हाताखाली काम करणारे, आपल्या बिल्डिंगचे सुरक्षा रक्षक किंवा अगदी पोटपाणी साठी शहरात आलेले लोक…

तसे पाहता, आनंद हेच सर्वसाधारण माणसाच्या जीवनाचे उद्दिष्ट असते. पण त्यासाठी तो अनेक ताणतणावांतून जात असतो. याचे कारण आपला आनंद हा भौतिक गोष्टींशी जोडला गेला आहे. म्हणजेच, पर्यायाने तो पैसे कमविण्याशी जोडला गेला आहे. तो कमविण्यासाठी मग ऑफिसात वेळेवर पोचायला हवे; त्यासाठी वेळेवर लोकल गाठली पाहिजे; ट्रॅफिकचा, हॉर्न्सचा गोंगाट ऐकला पाहिजे; बॉसची बोलणी ऐकायला हवी; प्रमोशन मिळवत राहायला हवे; कार विकत घ्यायला हवी आणि सरतेशेवटी पॉलिसी काढून, पुढच्या पिढीचीही सोय करायला हवी. या छोट्या-छोट्या गोष्टी जोडत जाताना, आयुष्याविषयीचा मोठा दृष्टीकोन हरवत जातो… मात्र या सगळ्या धावपळीच्या जीवनात आनंद, समाधान हे आपल्या विचारात असेल तर मग कोणतेही काम बोर वाटणार नाही. प्रत्येक क्षणाचा आपल्याला आनंद घेता येईल.

काही व्यक्ती मात्र कुठल्याही परिस्थितीत आनंदी असल्याचं आपण पाहतो. कितीही बिकट परिस्थिती समोर आली, तरी त्यांच्यावर येणारा तणाव ते सहजरित्या पेलतात आणि त्या परिस्थितीतून मार्ग काढत आपलं आयुष्य आनंदी ट्रॅकवर ठेवण्यात यशस्वी होतात, अशाच एका व्यक्तीचा हा व्हायरल व्हिडीओ आहे. हा व्यक्ती एक सफाई कामगार आहे मात्र तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्या लोकांपेक्षा तो जास्त समाधानी आहे… का तर आनंदी राहण्याची वृत्ती… सकारात्मक दृष्टिकोन व विचार… हा व्हिडीओ तुमचंही मनोरंजन तर करेलच पण यासोबतच एक सुंदर विचार आणि सकारात्मक दृष्टिकोन देईल, याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *