Breaking News
Home / मनोरंजन / ह्या माणसाचा अजबगजब नृत्याविष्कार असलेला डान्स पाहून तुम्हीसुद्धा हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

ह्या माणसाचा अजबगजब नृत्याविष्कार असलेला डान्स पाहून तुम्हीसुद्धा हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

नृत्य करणं आणि त्यातून स्वतःला व्यक्त करणं हे आपण नेहमीच करत असतो. अनेक कसलेले कलाकार आपली कला सादर करत असताना. त्यांना आपण याची देही याची डोळा पाहणं, ही आपल्यासाठी पर्वणी असते. पण नृत्य हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा भाग असल्याने आपणही कधी ना कधी त्यात सहभाही होत असतो. खासकरून एखाद्या वरातीत, तर कधी समारंभाच्या निमित्ताने. यात काही जणं इतके उत्तम नाचतात कि त्यांच्या सोबत नाचायला सगळ्यांना आवडतं. पण काही जणं असेही असतात ज्यांच्या नाच आपल्याला आनंद देतो पण त्यांच्या जवळ जाऊन नाचण्याची हिम्मत काही होत नाही. कोणती स्टेप कधी करतील याचा नेम नसतो ना. अर्थात आपल्या पैकी अनेकांचा या गटात समावेश असल्याने आपल्याला जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील. आमच्याही टीमच्या आठवणी अशाच एका वायरल।व्हिडियो ने ताज्या केल्या आणि हसून हसून डोळ्यातून पाणी आलं.

हा व्हिडियो एखाद्या वरातीतील असावा. पण नक्की काही सांगता येत नाही. स्थळ वेळ कोणतीही असो, पण यातील एका महाशयांनी आपल्या डान्स ने जी धमाल उडवून दिली आहे त्यास तोड नाही. जेव्हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा नाचण्याच्या भरात या महाशयांनी एखाद्या कोंबड्या सारखे हावभाव करत, ‘डान्स’ करण्यास सुरुवात केलेली असते. आपले ‘पंख’रुपी हात पाठी पुढे करत त्यांचा डान्स चालू असतो. तेवढ्यात त्यांना काय जाणवतं काय कल्पना नाही, व्यायामप्रकार करणं चालू होतं. बरं हे चालू असताना त्यांच्या पाठी असलेले नृत्यवीर ही गप्प बसलेले नसतात. त्यांचंही ‘नृत्य’ चालू असतं. पण या महाशयांएवढी तीव्रता त्यात नसते. व्यायामप्रकार आटोपल्यावर अरे… आपण तर धावायचं विसरलो या अभिनिवेशात हे महाशय या संपूर्ण डान्स कंपूला एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. या सगळ्या मुख्य डान्स मुव्ह्ज दरम्यान छोट्या छोट्या स्टेप्स चालूच असतात आणि मग शेवटची स्टेप येते. यात हे महाशय थेट कॅमेरामन पर्यंत येऊन काही तरी काल्पनिक गोष्ट गुंडाळत मागे जातात असं दिसतं. कदाचित आपल्या नृत्य पसाऱ्याची आवरावर करताहेत असं उगाच वाटून जातं.

त्यांची ही आवराआवर संपते आणि काही आवरायचं बाकी तर राहिलं नाही ना, याची खात्री करून घेण्यासाठी हे महाशय आपल्या दोन्ही हातांकडे पाहत शेवटची स्टेप करतात आणि हा नृत्याविष्कार संपतो आणि बघणारा हसून हसून लोटपोट झालेला असतो. खरंच एका अर्थाने अफलातून आणि न भूतो न भविष्यती असा हा डान्स प्रकार आपल्याला खदखदून हसावतो. कदाचित सगळं चौकटीवर हुकूम करण्याच्या आपल्या सवयीमुळे हे ‘मुक्त’ नृत्य आपल्याला हसवतं आणि लक्षातही राहतं. या लेखमागे या व्हिडियोतील या महाशयांचा आणि इतरांचा डान्स विषयी काहीसं गमतीने भाष्य करावं आणि ही सगळी गंमत शब्दात मांडण्याचा प्रयत्न करावा, हा हेतू आहे हे कृपया लक्षात घ्यावं. आमच्या टीमने अशाच विविध वायरल व्हिडियोज वरील केलेले लेख आपल्याला वाचायला आवडतील. त्यासाठी वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन वायरल किंवा ‘डान्स नृत्य’ असं लिहिल्यास आपल्याला विविध लेख उपलब्ध होतील. धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.