Breaking News
Home / मनोरंजन / ह्या माणसाने केलेला खुर्ची डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

ह्या माणसाने केलेला खुर्ची डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

नमस्कार मंडळी ! आपणांस आमच्या टीमकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!नवीन वर्ष म्हणजे आपल्यासाठी आमच्याकडून नवीन लेखांची मेजवानी असणार हे नक्की. त्यासाठी आपली टीम आता कामाला ही लागली आहे बरं का ! त्यामुळे येत्या काळात अतरंगी, बहुढंगी, विनोदी, माहितीपूर्ण आणि अनेक प्रकारच्या लेखांचं वाचन आपल्याला करता येईल. किंबहुना आजपासूनच त्याची सुरुवात होणार आहे. तेव्हा चला तर मग, वेळ न दवडता आजच्या विषयाला हात घालू.

आता बघा मंडळी, नवीन वर्ष आलं आणि जुनं सरलं तरी त्या वर्षातील काही गोष्टी या वर्षातही होणारच आहेत. यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे लग्न. आता लग्न म्हंटलं की किस्से आले. किस्से म्हंटले की त्याचे व्हिडियोज आले आणि मग आपसूकच ते प्रसिद्ध झाल्यावर वायरल व्हिडियोज ही आलेच. आणि वायरल व्हिडियोज म्हणजे आपली खासियतच की. त्यामुळे आजचा हा लेखही एका वायरल व्हिडियोवर आहे आणि तो ही एका लग्नातला वायरल व्हिडियो आहे. हा व्हिडियो कधी चित्रीत केला होता माहीत नाही. तसेच कोणी चित्रित केला होता माहीत नाही. पण व्हिडियो तसा काही काळापूर्वीचा असलेला वाटतो. पण तरीही त्यातली गंमत आजही हसायला लावते. किंबहुना तुम्ही हा व्हिडियो अजून एका वर्षाने जरी पाहिलात तरी तुम्हाला हसू येईल.

कारण यात आपल्याला भेटतात ते एक अतरंगी काका. खरं तर कोणत्याही लग्नात जास्तीत जास्त किस्से हे तरुण मुलामुलींपेक्षा काका काकू वयाच्या व्यक्तींकडून जास्त होतात. अर्थात हे निरीक्षणातून आमचं मत तयार झालं आहे. त्याला काही शास्त्रीय आकडेवारी वगैरे नाही. पण एक मात्र खरं की या किश्यांमुळे मजा जबरदस्त येते. इतकी की आपण हसुन हसून वेडे होऊ. त्यातही आजच्या व्हिडियोतल्या काकांसारखे काका असतील तर बघायलाच नको. अतरंगीपणाची हद्द काय असते हे या काकांनी आज दाखवून दिलं आहे. तुम्ही म्हणाल एवढं केलं तरी काय. अहो, या काकांनी चक्क खुर्ची डान्स केला आहे. खुर्ची डान्स म्हणजे खुर्ची वर बसून वा तिचा प्रॉप म्हणून वापर करून नव्हे. तर हे काका त्या खुर्चीत चक्क घुसले होते. लहान मुलं नाही का खुर्चीत उलट्या बाजूने बसतात. आपणही तसे बसतो कधी कधी. पण तेव्हा दोन्ही पाय हे खुर्चीच्या बाजूने बाहेर आलेले असतात. पण हे काका यापलीकडले असतात. ते थेट खुर्चीच्या मधून दोन्ही पाय घालतात. त्यामुळे त्यांचं मंचावर आगमन होतं ते थेट खुर्चीच्या सानिध्यात. मंडळी, आजपर्यंत करमणूक म्हणून, कामाचा भाग म्हणून इतके व्हिडियोज पाहिले. पण हे अजब गजब डोकं लावलेला हा पहिलाच प्रकार पाहिला.

बरं या अशा अवस्थेत ह्या काकांनी डान्स ही केला आहे. आता तो डान्स कसा केला वगैरे गोष्टी इथे सांगण्यात अर्थ नाही. कारण तो व्हिडियो मुळातच लहान आहे. त्यामुळे त्याचं वर्णन करत बसलो तर आपलं मनोरंजन म्हणावं तसं होणार नाही. त्यापेक्षा आपण हा व्हिडियो स्वतः बघा. त्या काकांच्या अतरंगी डोकॅलिटिचा आणि तेवढ्याच अतरंगी डान्सचा आनंद घ्या. तसेच ज्याने हा व्हिडियो एडिट केला आहे त्याला ही सलाम. त्याने ही यात गाणं अगदीच निवडून आणि नेमकेपणाने टाकलं आहे. असो.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *