लग्न असो वा वरात… नाचणाऱ्या लोकांची भारतात कमी नाही. नाचणाऱ्या लोकांमध्ये 2 प्रकार पडतात. एक पिऊन नाचणारे, ज्यांना कुठल्याही प्रकारचे संगीत लागत नाही. एकदा गाडी फुल झाली की, नंतर ते जनरेटरच्या आवाजावरही नाचू शकतात. तर काही लोक इतके अफलातून नाचतात की, न पिता पण ते पिल्यासारखे वाटतात. अर्थात पिण्यापेक्षा यांच्या नाचण्याची नशा जास्त असते. आणि इतरही लोक नाचण्याची नशा एन्जॉय करत असतात. आमच्या टीमला असाच एक भन्नाट व्हिडीओ हाती लागला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही डान्समधील नशेचा आनंद घेता येईल.
तुम्ही गोविंदाला कशामुळे ओळखता, कॉमेडी आणि त्याच्या वेगळ्या डान्स शैलीमुळे. गोविंदाच्या डान्समध्ये जसे कॉमेडी एक्स्प्रेशन्स असतात. तसेच कॉमेडी एक्सप्रेशन्स आपल्या नाचण्यातून दाखवणारा एक गावाकडचा ‘गोविंदा’ आमच्या हाती लागला आहे. न पिताही या गोविंदाने अशी मज्जा आणली की, त्या कार्यक्रमातील वातावरणाचा नूरच पालटला. या व्हिडीओत तुम्हाला दिसून येईल, ज्या कार्यक्रमात हा व्हायरल झालेला गोविंदा नाचत आहे, तो कार्यक्रम कौटुंबिक आहे. तिथे लहान मुले, महिला, जेष्ठ नागरिक तसेच तरुण मंडळीही बसलेली आहेत.
झूम बराबर झूम शराबी हे गाणे सुरू होते आणि हा व्हायरल गोविंदा नाचू लागतो. सुरुवातीला वाटतं की, हा खरच पिलेला आहे. मात्र त्याच्या ही स्टेप्स लक्षात घेतल्यावर हे स्पष्ट होतं की, तो बेवडा असल्याचा अभिनय करत आहे. हा नाच आणि अभिनय इतका खरा आहे की, व्हिडीओत बराच वेळपर्यंत आपल्याला असे वाटते हा माणूस नक्कीच पिलेला असणार. गाणे सुरू झाल्यापासून या व्हायरल गोविंदाने हातात बाटली पकडलेली आहे. ज्यात दा’रूसारखे दिसणारे कोल्ड्रिंक आहे. हा भन्नाट नाचणारा व्यक्ती हळूहळू ते कोल्ड्रिंक गाण्याच्या शेवटपर्यंत संपवतो. या व्हिडीओत शेवटपर्यंत एकच गोष्ट लक्षात राहते, ती म्हणजे हा व्यक्ती नाचला कमी पण त्याने एंटरटेन खूप भारी केले. नाचता नाचता मध्येच तो दा’रू प्यायलेल्या व्यक्तीसारखा पडतो. मध्येच त्याच्याकडून पायातील बूट निसटतो. खऱ्याखुरा बेवडा माणूस नाचायला लागला तर जे काही होईल ते सगळी मजा या व्हिडीओत आपल्याला दिसते.
या व्हिडीओतील गोविंदाचे अजून एका गोष्टीसाठी कौतुक वाटते. सर्वसामान्य माणसाला नाचण्यासाठी कायम एक जोडीदार लागत असतो. जोडीदार उत्साहात नाचत असेल तर आपणही उत्स्फूर्तपणे नाचतो. या व्हिडीओतील व्यक्ती मात्र जवळपास 5 मिनिटे एकटाच नाचला आहे. अर्थात मंडपात असणाऱ्या निर्जीव खांबाने या व्हायरल गोविंदाला साथ दिली आहेच. जेव्हा जेव्हा या व्हायरल गोविंदाला स्टेप्स सुचत नाहीत तेव्हा तेव्हा हा त्या मंडपात असणाऱ्या खांबाला वेढे घालतो. आणि वेढे घालताना काहीतरी गम्मत नक्कीच करतो. संपूर्ण 5-6 मिनिट, एक नॉन-डान्सर सामान्य व्यक्ती, इतक्या लोकांसमोर नाचतो आणि बघणार्यांना शेवटपर्यंत बोअर होत नाही. ही कला असणाऱ्या या व्हायरल गोविंदाचं कौतुक करावं तेवढं कमीच. आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, तुम्ही नक्की पाहून घ्या. तसेच तुमच्या प्रतिक्रिया द्यायलाही विसरू नका. मराठी गप्पाला देत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
बघा व्हिडीओ :