Breaking News
Home / मनोरंजन / ह्या माणसाने पावसाच्या पाण्यात कार वाहून जाऊ नये म्हणून काय जुगाड केला बघा

ह्या माणसाने पावसाच्या पाण्यात कार वाहून जाऊ नये म्हणून काय जुगाड केला बघा

भारतीय लोक काटकसरी असतात. कमी भांडवल, चौकस वृत्ती आणि प्रयत्न या सवयी अंगी असल्याने भारतीय लोकांनी अनेक वर्षे संशोधन करून विविध शोध लावले. काही जगासमोर आले तर काही मागे पडले. शोध लावणारे भारतीय आज आपल्यात नसले तरी त्यांची जुगाडू वृत्ती आजही आपल्यात कुटून कुटून भरलेली आहे. जुगाड म्हणजे अत्यंत विपरीत, कठीण परिस्थितीतही संधी शोधून काढण्याची आणि हाताशी उपलब्ध असलेल्या साध्यासुध्या साधनसामग्रीसह पुढे उभ्या ठाकलेल्या समस्येचा धाडसानं सामना करण्याची कला. आता तुम्ही अनेकदा रस्त्याने प्रवास करताना बघितले असेल की, एखाद्या बंद पडलेल्या किंवा पेट्रोल संपलेल्या टूव्हीलरला दुसरा टूव्हीलरवाला ढकलत असतो, यालाच जुगाड म्हणतात. आपल्याकडे बहुतांश जुगाड हे गाड्यांच्या बाबतीतच केले जातात. म्हणजे स्प्लेन्डर या गाडीला डीलक्सची खोपडी बसवलेली असते. किंवा पल्सरला शाईनचा आरसा बसवलेला असतो. तसे पाहिलं तर असे जुगाड करणाऱ्या टॅलेंटेड लोकांची आपल्याकडे अजिबात कमी नाही.

त्यातही आपले अतरंगी डोक्याचे लोक तर कशासाठी कोणते जुगाड करतील याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर असे अनेक जुगाडू व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कधी हे जुगाड महागात पडतात. म्हणजे “चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला” अशी गंमतही होते. गेल्या 4-5 वर्षात अनेक जुगाडू भारतीयांचे जबराट शोध पुढे आले ते सोशल मीडियामुळे.

तंत्रज्ञान, विज्ञान आणि अक्कलहुशारीत जग कितीही पुढं गेलं असलं तरी आम्ही भारतीय जुगाड या एका संकल्पनेमुळे सगळ्यांच्या पुढेच असतो. अनेकदा शिकलेल्या लोकांपेक्षा जास्त शोध न शिकलेले शोध लावतात. कारण गरज हीच शोधाची जननी आहे. ‘‘काही तरी कौशल्य कमवा रे! नुसतेच प्रमाणपत्र आणि पदव्या घेत बसू नका!’’, असे अनेकदा विद्यार्थ्यांना ऐकावे लागते. याचा सरळसरळ अर्थ असा की, कौशल्य कमावले की पैसे हाताशी येतात आणि कौशल्य हाच जुगाडू वृत्तीचा पाया आहे, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे.

तर आमच्या टीमला एक व्हिडिओ मिळाला आहे, ज्यात एका बहाद्दर माणसाने एकदम खतरनाक जुगाड केला आहे. त्याची ही कल्पना बघून तुम्हाला त्याला एकदा कडक सलाम ठोकावासा वाटेल. गेल्या 2-4 वर्षात अनेकवेळा छोटे-मोठे पूर महाराष्ट्रात आले. जीवित हानी झाली, आर्थिक हानी झाली. शेती-गाड्यांचे सगळ्यात मोठे नुकसान झाले. कारण या तालुक्याच्या गाड्या वाहात वाहात थेट त्या तालुक्यात गेल्या होत्या. मात्र लोकांना शेतीचे नुकसान थांबवता येणे आपल्या हातात नसले तरी गाड्यांचे नुकसान थांबवने, आपल्या हातात आहे, हे लक्षात आले. मग अशाच एका जुगाडू माणसाने अक्कल लावली आणि मोठ्या कष्टाने पै पै जमवून विकत घेतलेली गाडी पुराच्या पाण्यात वाहून जाणार नाही, यासाठी जुगाड लावला.

त्याचा जुगाड पाहून सुरुवातीला त्याला लोक हसले पण जेव्हा खरोखर पूर आला तेव्हा लोकांनी त्याचे कौतुक केले. कारण अख्खा गावाच्या गाड्या पुरात वाहून गेल्या. आणि भर पुरात याची एकट्याची गाडी जागची हलली नाही. अवघ्या कमी पैशात केलेला हा जुगाड कायमस्वरूपी कामाला येणारा ठरला. आता या माणसाने नेमका काय जुगाड केला, हे पाहण्यासाठी व्हिडीओ तर बघावाच लागेल ना भाऊ…

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.