Breaking News
Home / जरा हटके / ह्या माणसाने प्रसंगावधान दाखवत जे केले ते पाहून तुम्हीही सलाम कराल, माणुसकी अजूनही जिवंत आहेत

ह्या माणसाने प्रसंगावधान दाखवत जे केले ते पाहून तुम्हीही सलाम कराल, माणुसकी अजूनही जिवंत आहेत

आपलं काम करत असताना आपल्याला अनेकदा विविध अडचणींचा, अडथळ्यांचा सामना करावा लागतो. काही वेळा हे अडथळे चट्कन बाजूला होतात तर काही वेळेस बराच वेळ लागतो. पण काही वेळेस अशी ही परिस्थिती येते की जिथे चट्कन प्रसंगावधान दाखवून काम करावं लागतं अन्यथा तुम्हाला होणारं नुकसान अटळ असतं. आता या वायरल व्हिडियोचं उदाहरण घ्या ना. या वायरल व्हिडियोत बकऱ्यांना सांभाळणारा माणूस दिसून येतो. बकऱ्यांना चरायला नेत असताना, त्याच्यापुढे असा एक क्षण येतो जिथे त्याच्या प्रसंगावधनामुळे अनर्थ टळतो. तर होतं काय, तर नेहमीप्रमाणे हा माणूस बकऱ्यांना घेऊन बाहेर पडलेला असतो. पण बकऱ्याच त्या काही कारणाने घाबरून इथून तिथे जाऊ लागतात आणि या धांदलीत त्यांच्या गळ्यातील दावे एकमेकांत गुंतून जातात.

चार पाच बकऱ्यांचा हा कळप मग वाट फुटेल तिथे जाऊ लागतो. दु’र्दैवाची गोष्ट अशी की यातील एक बकरी खाली पडते आणि इतर बकऱ्यांच्या पायाखाली तुडवली जाते. एकंदर गोंधळाच्या परिस्थितीत हा माणूस मात्र डोकं शांत ठेवत त्या बकऱ्यांना एके ठिकाणी उभं करण्यात यशस्वी होतो. त्यातील एका बकरीला या जंजाळातून बाहेर काढण्यात यशस्वी होतो. मग चटकन इतर उभ्या बकऱ्यांनाही तो मोकळं करण्यात यशस्वी होतो. राहता राहते ती शेवटची बकरी जी तुडवली गेलेली असते. तो हाताने तिला उभं करायला बघतो तर ती मानच टाकते. बिचारीचा प्राण गेला कि काय बहुतेक ही आपली पहिली प्रतिक्रिया असते. पण या माणसाने अजूनही धीर सोडलेला नसतो. तो आपल्या तोंडाने तिच्या तोंडात हवा भरण्याचा प्रयत्न करतो. एकदा करतो पण काही होत नाही. दुसऱ्या वेळेस थोडा जास्त वेळ देतो आणि मग पोटही दाबतो. सी.पी.आर. करावं असं आणि काय आश्चर्य, बकरीच्या तोंडून आवाज निघतो. आपणही निश्वास सोडतो.

त्याच्या प्रयत्नांनी एक मुका जीव वाचला याचं आपल्याला बरं वाटत असतं. पण अजूनही पूर्णपणे उभी राहू शकेल एवढी ताकद त्या बकरीत नसते. मग काय, हे साहेब पुन्हा त्या बकरीला सी.पी. आर. देतात. याचा मात्र फायदा होतो. अडखळत, धडपडत ती बकरी चालू लागते. जवळच्या भिंतीचा आधार घेत घेत ती पुढे जाते आणि हा माणूसही सुटकेचा निश्वास सोडतो. बकऱ्यांवर त्याची गुजराण चालत असल्याने त्याला जमेल आणि सुचेल ते तो करतो आणि त्यात त्याला यशही मिळतं. या यशाचं श्रेय अर्थातच त्याच्या प्रसंगावधानाला.

आपल्याला हा लेख आवडला असल्यास आम्हाला तुमच्या क’मेंट्स मधून नक्कीच कळवा. ला’ईक ही करा. आणि हो आपल्या मराठी गप्पाच्या टीमने लिहिलेले इतर लेखही वाचायला विसरू नका. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.