Breaking News
Home / मनोरंजन / ह्या माणसाने ‘ब्राझील’ गाण्यावर केला अतरंगी डान्स, पाहून हसू आवरणार नाही

ह्या माणसाने ‘ब्राझील’ गाण्यावर केला अतरंगी डान्स, पाहून हसू आवरणार नाही

आपलं आयुष्य मजा, मस्ती आणि आनंदात जगावं अस प्रत्येकाला वाटतं. किंबहुना तसं ते जगण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा आयुष्याची मजा घेण्याची संधी आपण शोधत असतो. ही संधी अगदी आयतीच चालून येते जेव्हा आपण एखाद्या लग्नसमारंभाचा भाग होतो. मुळातच हा सोहळा म्हणजे एका नवीन नात्याच्या सुरुवातीचा. त्यामुळे सगळीकडे उत्साह आणि आनंद हा सहसा दिसून येतोच. त्यात हल्लीच्या लग्न सोहळ्यांत डीजे असतातच. डीजे आले की मग डान्स फ्लोअर ही आलेच. त्यामुळे वर उल्लेख केलेली मजा मस्ती ही घेता येतेच. आपणही अगदी जीव ओतून ही मजा घेत असतो. पण तेवढ्यात एक माणूस कोण कुठून येतो माहीत नाही. पण असा काही नाचतो की नंतर पूर्ण सोहळ्यात त्याच्या डान्सची चर्चाच चालते. आपण लग्न सोहळ्यांना वरचेवर जात असाल तर निदान एकदा तरी तुम्हाला हा अनुभव आला असेलच.

असाच अनुभव एके ठिकाणच्या लग्नात आला असण्याची शक्यता आहे. कारण या लग्नात एक दादा येतात आणि जो काही अतरंगी डान्स करून जातात की विचारु नका. आणि जेथे अतरंगी डान्स असतो तेथे सतरंगी मजा ही असतेच असते. ही सतरंगी मजा आमच्या टीमने आज एका व्हिडियोतून घेतली. या व्हिडियोविषयी आगा पिछा असलेला इतर व्हिडियो नाही. त्यामुळे विशेष माहिती मिळत नाही. पण त्याची गरज ही नसते. कारण हे दादा अशी काही मजा करतात की विचारू नका. त्यात अजून एक गंमतीची बाब म्हणजे डीजे वाल्याने लावलेलं गाणं. लग्नात आपण काही ठराविक गाणीच ऐकतो. त्यातही बहुतांश गाणी लग्नाची असणं अपेक्षित असतं. इथे मात्र डिजेवाले बाबूने थेट ‘लालाला…. ब्राझील’ हे गाणं लावलेलं असतं. एवढी वर्षे झाली पण हे गाणं आजही प्रत्येकाला थिरकायला लावतं. त्यात या दादांचा ही उल्लेख व्हायला हवाच. त्यात त्यांच्या आजूबाजूला उत्साही मंडळी असतात.

व्हिडियो सुरु झाल्यापासून ते शेवटपर्यंत त्यांना नाचण्यास उद्युक्त करत असतात. त्यामुळे एकूणच व्हिडियोत पूर्णवेळ मजा मस्तीचं वातावरण कायम राहतं. आपण जर हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही हे जाणवलं असेलच. जर व्हिडियो बघितला नसेल तर जरूर पहा. कमी वेळेचा पण भरपूर आनंद देणारा असा हा व्हिडियो आहे त्याचा भरपूर आनंद घ्या.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.