Breaking News
Home / मनोरंजन / ह्या माणसाने रस्त्यावर सादर केलेली कला पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल, बघा एकदा व्हिडीओ

ह्या माणसाने रस्त्यावर सादर केलेली कला पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल, बघा एकदा व्हिडीओ

असं म्हणतात की तुमच्या जवळ कला कौशल्य असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तगून राहू शकता. आपल्या पैकी अनेक जणांनी याचा वेळोवेळी अनुभव घेतला असेल. कधी स्वतःच्या बाबतीत तर कधी इतरांच्या अनुभवातून. आता या एका वायरल व्हिडियोचं उदाहरण घ्या ना. हा वायरल व्हिडियो आहे एका कलंदर व्यक्तीचा. त्याच्या कपड्यांवरून त्याची आर्थिक ह’लाखीची प’रिस्थिती समजून येते. पण या प’रिस्थितीवर मात करण्यासाठी त्याने त्याच्या जवळ असलेलं कलाकौशल्य वापरलं. या व्यक्तीला सर्कशीतले खेळ आणि करामती करून दाखवणं अगदी सहज जमतं आणि त्याने याच कौशल्यांचा वापर स्वतःची गुजराण करण्यासाठी केलेला दिसून येतो. या व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा ही व्यक्ती बि’यरच्या बॉटल्स घेऊन करामती दाखवत असतो.

त्याच्या करामती अफलातून असतात त्यामुळे कधी कधी आपल्याला वाटतं आता बॉटल्स पडून फु’टतात की काय. पण तसं काही होत नाही. परफॉर्मर म्हणून त्याचा स्वतः वर असेलला ताबा आणि हुकूमत आपल्याला कळून येते. पुढेही मग विविध असे खेळ तो करून दाखवतो. टेनिस बॉल्स सोबत जगलिंग करून दाखवतो. ह्या व्हिडियोतील १ मिनिट ३० सेकंदानंतर दाखवलेली करामत तर अगदी वाखाणण्याजोगी आहे. पायाने बॉल उडवत, तोंडात धरलेल्या इवल्याश्या काठीवर त्याला झेलणं म्हणजे कारामतच. पण हा पठ्ठ्या ते ही करून दाखवतो. मग चेंडू आणि थाळ्यांचाही काही करामती तो करत असतो. पण प्रत्येक कलाकाराकडे काही ना काही अशी एखादी ट्रिक किंवा खुबी असते ती तो शेवटच्या क्षणी दाखवतो. या व्यक्तीबाबत ही तसंच काहीसं होतं. पण त्याचसोबत त्याचा व्यावहारिकपणाही जागृत असतो. त्यामुळे तो सगळा सेट अप करतो. ठराविक अंतरावर बॉटल ठेवतो आणि मग कोणती ट्रिक करून दाखवणार आहे हे दर्शवतो.

या क्षणी कळून येतं की त्याला बोलता येत नाही. आपल्याला वाईटही वाटतं. तेवढ्यात जमलेल्यांकडून तो पै’से गोळा करायला जातो आणि हा व्हिडीओ संपतो. हातावर पोट असणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यामुळे जे जमेल ते करून दैनंदिन खर्च भागवण्यासाठी त्यांना बरंच काही करावं लागतं. या व्हिडियोतील हा कलंदर माणूस याचं प्रातिनिधिक उदाहरण. त्याच्या कामात त्याला यश मिळो आणि त्याची आ’र्थिक परिस्थिती सुधारो हीच मराठी गप्पाच्या टीमची आणि नियमित वाचकांची इच्छा !!!

आम्ही हा लेख खाली देत आहोत, तुम्ही नक्की पहा. आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आपल्याला हा लेख आवडला असल्यास लाईक करा, शेअर ही करा. आपल्या सातत्यपूर्ण पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.