Breaking News
Home / मनोरंजन / ह्या माणसाने लग्नामध्ये ट्रॉम्बोन वाजवता वाजवता केला अतरंगी डान्स, बघा हा व्हिडीओ

ह्या माणसाने लग्नामध्ये ट्रॉम्बोन वाजवता वाजवता केला अतरंगी डान्स, बघा हा व्हिडीओ

अतरंगी माणसांची एक गोष्ट आपल्या सगळ्या मंडळींना थोडी फार का होईना आवडत असते. ही गोष्ट म्हणजे परिस्थिती कोणतीही असो ही मंडळी आनंदी राहतात तसेच आजूबाजूचं वातावरण पण आनंदी ठेवतात. खासकरून जर एखादा प्रसंग चांगला असेल, काही उत्तम होत असेल तर मग त्यांची मजाच असते. कारण तसंही आजूबाजूला प्रसन्न वातावरण असतं. सगळे जण आनंदात असतात. आणि या अतरंगी माणसांना गंमत जंमत करण्याची हुक्की आली की मग धमाल सुरू होते.

अशाच एका अतरंगी माणसाचा व्हिडियो आपल्या टीमने आज पाहिला. खरं सांगायचं तर अशी मजा मस्ती करणारा व्हिडियो फार क्वचित पाहायला मिळतो. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एका वरातीच्या ठिकाणचं दृश्य दिसून येतं. पाठी वरातीचा अश्व उभा असतो. सोबत बँड वाले असतात. उजव्या बाजूला कोपऱ्यात त्यांचं गाणं बजावणं चालू असतं. पण भाईसाहब, आपलं लक्ष तर व्हिडियोच्या केंद्रस्थानी असतं. कारण वर उल्लेख केलेले अतरंगी दादा मस्त मजा करत असतात.

सुरुवातीला तर ते आपल्या हातांनी पोट हलवत डान्स करत असतात. दादांच्या या बेली डान्स व्हर्जनने आपल्याला मुळातच हसायला येणं सुरू होणार असतं. तेवढ्यात दादा त्यांच्या स्टेप्स बदलतात. आता ते केवळ मानेने नाचायला लागतात. त्या दक्षिण भारतात बनणाऱ्या प्रसिद्ध बाहुल्या आपल्याला माहिती असतीलच. ज्यांची डोकी सतत हलत असतात. आपल्या शोकेस आणि गाड्यांमध्ये आपण त्यांना वापरलं पण असेल. त्यांची आठवण यानिमित्ताने होते. काय अगदी टायमिंगने डोकं हलवतात. आपण एव्हाना हसायला लागलेले असतो. पण खरा मजेदार भाग पुढे असतो. त्यांच्या हातात त्यांचं ट्रॉम्बोन हे वाद्य असतं. ते वाजवण्याऐवजी सरळ डोक्यावर ठेवतात. मग तोंडाचा चंबू करतात आणि हातांनी माशाचा आकार बनवतात. आणि आता हा मानवी मासा पायांनी डुलत असतो. एवढे हसतो ना आपण या कृतीवर. काय बोलणार रे भावा हीच बहुतेक प्रतिक्रिया असते आपली. पण विचार करा, केवळ २३ सेकंदांचा हा व्हिडियो आहे. पण तरीही हे दादा आपल्याला मनापासून हसावण्यात यशस्वी ठरतात.

कारण ते जे करतात ते बिनधास्तपणे आणि स्वतः मनापासून करतात. त्यात कोण काय म्हणेल याची भीती नसते. असतो तो केवळ त्या क्षणांचा आनंद घेण्याची इच्छा. या दादांचा हा व्हिडियो अजून थोडा वेळ चालला असता तर आवडलं असतं. पण काही वेळेस कमी वेळेचे व्हिडियोज मनात जास्त जागा करून जातात हेच खरं. हा व्हिडियो म्हणजे त्याचं उत्तम उदाहरण.

आपल्या टीमला तर हा व्हिडियो खूप आवडला. आपणही हा व्हिडियो पाहिलेला असेल तर आपल्याला आवडला असेलच. तसेच यावरील आपल्या टीमने लिहिलेला लेखही आपल्याला आवडला असेल अशी आशा आहे. आपण वाचक म्हणून नेहमीच आपल्या टीमच्या पाठीशी उभे असता. प्रत्येक लेखांवर आपल्या सकारात्मक कमेंट्स, प्रोत्साहनपर कमेंट्स, काही सूचना येत असतात. त्यातून आम्हालाही नवनवीन गोष्टी कळतात. तसेच जोडीला आपण आपले हे लेख मोठया प्रमाणात शेअर ही करता. यासाठी आपले मनःपूर्वक धन्यवाद ! आपला हा पाठिंबा, आम्हाला सतत नवनवीन विषय हाताळण्यासाठी ऊर्जा देत असतो. तेव्हा येत्या काळातही आपला लोभ, आमच्या या टीमवर राहू द्या ही विनंती. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *