Breaking News
Home / मनोरंजन / ह्या माणसाने स्वतःचा जीव धोक्यात टाकून जे केले ते पाहून तुमच्या देखील डोळ्यांत पाणी येईल, बघा व्हिडीओ

ह्या माणसाने स्वतःचा जीव धोक्यात टाकून जे केले ते पाहून तुमच्या देखील डोळ्यांत पाणी येईल, बघा व्हिडीओ

आपल्या आजूबाजूला असलेली परिस्थिती बघता, कधी कधी आपण माणसं, आपली माणुसकी हरवत चाललो आहोत की काय असं वाटायला लागतं. दया, क्षमा, शांती, प्रेम, बंधुता, दया यांचा आपल्याला काहीसा विसर पडतोय की काय असं वाटायला लागतं. पण हे सगळं जरी असले तरी आयुष्यात सगळंच कधी वाईट नसतं. वाईट दिवसांत ही चांगलं काही तरी होत असतं आणि हेच महत्वाचं असतं. कारण याच चांगल्या क्षणांनी आजही आपल्यातील माणुसकी शिल्लक आहे याची खात्री पटत जाते.

अर्थात हे विविध उदाहरणांनी सिद्ध होतं. त्यातील एक उदाहरण हे आपल्याला भूतदयेच्या बाबतीत आपलं जे वागणं आहे त्यावरून कळून येतं. कारण एका बाजूला प्राण्यांना अगदी निर्दयीपणे वागवणारी माणसं असतात. तर त्याच्या विपरीत अगदी प्रेमाने या मुक्या प्राणी मात्रांवर प्रेम करणारी माणसं ही असतात. काहींच प्रेम तर इतकं असतं की वेळप्रसंगी मुक्या प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीवही धोक्यात घालायला कमी बघत नाहीत. सध्या चालू असलेल्या रशियन आणि युक्रेन युद्धात याची प्रचिती देणारी उदाहरणे आपण वाचली असतीलच. तसेच अनेकवेळा जंगलात वणवा पे’टलेला असताना, वा चक्रीवादळ वगैरे आलेलं असताना ही आपल्या जीवाची पर्वा न करता, या मुक्या प्राण्यांना जीवदान देणारे अनेक जण आपण पाहतो. खरं तर ही अशीच माणसं आपल्या खऱ्या आयुष्यातील सुपर हिरो ठरतात.

अशाच एका खऱ्या आयुष्यातील सुपर हिरोची ओळख आपल्या सगळ्यांना काही दिवसांपूर्वी झाली. निमित्त झालं एका वायरल व्हिडियोचं ! आता वायरल व्हिडियो म्हंटला की त्यात, काही तरी ‘तुफानी’ करते हैं ही भावना असते. पण केवळ प्रसिद्धी मिळण्यासाठी केलेले प्रकार हे थट्टेचा विषय ठरतात. पण या व्हिडियोत मात्र जो काही तुफानी कारनामा केला जातो तो एका मुक्या जनावराला वाचवण्यासाठी केलेला असतो. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एके ठिकाणी बांधकाम चालू असलेली जागा दिसते. तिथले बांधकाम मजूर, तिथली अवजड यंत्रणा यांमुळे हे कळून येतं. तेवढ्यात लक्ष जातं की एक भलं मोठं खोदकाम करणारं यंत्र(ज्याला आपण सहसा जेसीबी(जे एका कंपनीच नाव आहे) म्हणून ओळखतो) तिथे आहे. या बांधकामाच्या दोन्ही बाजूला सिमेंट काँक्रीटच्या भिंती असतात. या दोन्हींच्या मधून धुवांधार मळकट पाणी वाहत असतं. डाव्या बाजूच्या भिंतीकडे जेसीबी असतो आणि तो या पाण्याच्या प्रवाहावर काहीसा झुकलेला वाटतो. पुढच्या काही क्षणातच याचं कारण कळतं. तिथला एक मजूर त्या जेसीबीच्या जबड्यात जाऊन बसणार असतो. बरं एवढंच नाही तर तो जेसीबीचा जबडा मजुरासकट त्या पाण्याच्या प्रवाहाच्या मध्यभागी वर तरंगता ठेवला जाणार असतो. हे सगळं गतीने होत असत. पण का? कारण या पाण्याच्या प्रवाहात एक कुत्रा पडलेला असतो. त्याला वाचवण्यासाठी ही सगळी धडपड चालू असते.

खरं तर या पाण्याच्या प्रवाहावर असं टांगून राहणं हे धोकादायकच आहे. कारण त्या जेसीबीच्या जबड्यात ही धड बसायला जागा नसते. परिणामतः आपलाच तोल जाऊन आपण त्यात पडण्याची आणि धुवांधार प्रवाहात वाहून जाण्याची भीती असतेच. पण या कुत्र्याच्या जीवसाठी हे मजूर हे ही पाऊल उचलतात. भूतदया असेल तर किती टोकाची असू शकते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे..आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही हे पटलं असेलच. पण आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर जरूर बघा. आपली टीम, आपल्या वाचकांसाठी सदर व्हिडियो खाली शेअर करते आहे. जेणेकरून आपल्याला या घटनेचा अनुभव स्वतः घेता यावा. असो.

बरं तर मंडळी हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख !आपल्याला हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.