Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मित्रांनी डोळ्यांवर पट्टी बांधून केलेला प्रॅन्क पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

ह्या मित्रांनी डोळ्यांवर पट्टी बांधून केलेला प्रॅन्क पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

“मैत्री म्हणजे काय? एकदा प्रश्न पडला मला ! मैत्री म्हणजे कंटिंग चहा रे, माझा अनुभव सांगून गेला ! कधी जीभ भा’जते, चटका बसतो, पण वेळेस ऊब द्यायला चहाचं असतो ! मैत्री ही तशीच असते नाही का? कधी खेळते, खेळवते तर कधी रुसते, पण प्रसंग आल्यावर तीच पाठीशी खंबीरपणे उभी राहते !!!”

खरंय की नाही मंडळी ! मैत्रीचे हे असे अनेकविध रंग आपण लहानपणापासून अनुभव आलेलो आहोत. यापुढेही ते अनुभवास येतीलच. पण आज मोठं वय झाल्यावर या मैत्रीची खरी किंमत कळते. मग ती बालपणातील कट्टी बट्टीची मैत्री असो वा आता मोठं झाल्यावर कामाच्या निमित्ताने जमलेली मैत्री असो. प्रत्येक मित्र वा मैत्रीण हे आपल्याला काही ना काही शिकवून जातातच. काही जणांमुळे मित्र कसे नसावेत याचेही धडे मिळतातच. पण असो. चांगल्यासोबत वाईटही असतंच. पण एक मात्र खरं की या मैत्रीच्या नात्यांनी आपल्याला दिलेले अनुभव हे आपल्याला नेहमीच लक्षात राहतात. काही अनुभव हे तर इतके मनाला भिडलेले असतात की ते क्षण कधीही विस्मरणात जात नाहीत. यातील बहुतांश क्षण हे का कुणास ठाऊक पण बालपणीच्या आठवणींशी जास्त जोडलेले असतात. त्या वयात केलेली मस्ती, नसते उद्योग हेच पुढच्या काळात गोड आठवणींचं रूप घेतात. पण एक गोष्ट मात्र कायम मनात असते ती म्हणजे हे क्षण पुन्हा अनुभवायला मिळणार नाहीत. पण हे कितपत खरं आहे?

कोणतीही गोष्ट आपल्याला मानण्यावर खरी किंवा खोटी ठरते की नाही. आपल्या बालपणीच्या आठवणींचं तसंच आहे. आपण मनात आणलं तर या आठवणी पुन्हा जगता येतात. आम्हाला ही आधी हे एवढं खरं वाटत नसे. पण आज आम्ही एक व्हिडियो बघितला. त्याचा खूप आनंद घेतला. खूप हसलो आणि लक्षात आलं की या आठवणी पुन्हा जगता येतात. असं काय आहे या व्हिडियोत? या व्हिडियोत आपल्याला दिसून येतात काही दोस्त मंडळी. त्यांची बहुधा शाळेतील मैत्री असावी. अर्थात त्यांच्या ग्रुप विषयी फारशी माहिती नसल्याने जास्त काही सांगता येत नाही. पण हरकत नाही. कारण या मंडळींनी जी धमाल या व्हिडियोत केली आहे त्यास तोड नाही. ही मंडळी काय करतात, तर सगळे एकत्र जमल्याने एक खेळ खेळायचं ठरवतात. या ग्रुपमधल्या काही जणांना स्पर्धक म्हणून घेतलं जातं. समोर तीन दोऱ्या धरल्या जातात. प्रत्येक दोरी ही एकमेकांपासून समान अंतरावर आणि वेगवेगळ्या उंचीवर असते.

पण याचवेळी जे स्पर्धक असतात त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असते. त्यामुळे आपसूकच समोर काही दिसत नसल्याने स्पर्धकांना अंदाज घेत पुढे जावं लागत. सगळेच जण त्यांना या खेळात प्रोत्साहन देत असतात. त्यात डोळ्यावर पट्टी असल्यामुळे समोरचं काही दिसत नाही. म्हंटल्यावर हशेच हशे पिकत असतात. स्पर्धकांना वाटत असतं आपलं काही चुकतंय. पण तसं नसत. खरी गंमत वेगळीच असते. सुदैवाने आपण केवळ व्हिडियोतून हे सगळं बघतो त्यामुळे आपण हसून हसून बेहाल होतो. किंबहुना त्या स्पर्धकांची अवस्था ही तशीच असते. आपल्याच मित्रांनी आपली कशी फजिती केली हे पाहत ते ही हसत सुटतात.

आपण हा व्हिडियो एव्हाना पाहिला असेल तर आपल्यालाही ही धमाल अनुभवता आली असेल. कारण या व्हिडियोचा सगळा इतिवृत्तांत इथे देता येत नाही. कारण त्यामुळे या व्हिडियोतील मजा निघून जाईल. त्यापेक्षा अस करा. आपण हा व्हिडियो एकदा बघाच. तुम्हीही हसून हसून बेहाल व्हाल. आणि अजून एक गोष्ट जाणवेल. ही गोष्ट म्हणजे आपली मित्र मंडळी सोबत असली की वय कितीही झालं असू दे, मजा करता येते. आमच्या टीमला तर हा व्हिडियो खूप आवडला. आपल्याला ही तो आवडेल हे जाणून आज आपल्या टीमने त्यावर लेखन केलेलं आहे.

आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.