Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलांचा भांडणानंतर वडिलांना उत्तर देतानाचा व्हिडीओ होतोय वायरल, पाहून हसू आवरणार नाही

ह्या मुलांचा भांडणानंतर वडिलांना उत्तर देतानाचा व्हिडीओ होतोय वायरल, पाहून हसू आवरणार नाही

मराठी गप्पा म्हणजे मनोरंजन विश्वातील अनेक विषयांवरील लेख, असं समीकरण झालेलं आहेच. त्यात गेल्या काही दिवसांमध्ये या मनोरंजन विश्वातील लेखांना वायरल व्हिडीयोज विषयीच्या लेखांची चांगलीच फोडणी मिळाली आहे. बरं या फोडणीमुळे ठसका लागत नाही. पण कधी कधी हसून हसून, तर कधी त्यातील गंभीर गोष्टींमुळे डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. अर्थात हसण्याचं कारण म्हणजे अनेक वेळेस लहान मुलं आणि त्यांनी त्यांच्या वयाला साजेशा केलेल्या गोष्टी कारणीभूत ठरतात. आता हा एक व्हिडियो आमच्या टीमच्या नजरेस पडला. ज्यात एक वडील आपल्या तीनही मुलांना त्यांच्या वागणुकीबद्दल विचारत होते. यात लहान दोन बहिणी आणि एक छोटा भाऊ आपल्याला दिसतो.

सुरुवात होते, ती मोठ्या बहिणीपासून. मध्ये बसलेल्या बहिणीने श्रुती नामक एका मुलीला बोचकारलेलं, असं ती मोठी बहिण सांगते. त्यात ती अशा पद्धतीने सांगत असताना ती मधली बहिण तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. पण वडील त्यांना शिस्त लावण्यासाठी मोठ्या बहिणीला बोलणं चालू ठेवायला सांगतात. मग वेळ येते ती दुसऱ्या बहिणीची. ती स्वतःची बाजू सांगते. पण यात बोलणं सुरु असताना तिला रडूच येतं. तिने बाजूला बसलेल्या भावालाही मा’रलं आणि त्यानेही तिला मा’रलं असं सांगितलं असता, तिचा रडण्याचा आवाज अजून मोठा होतो. मग तिचं रडणं गप्प करण्यासाठी तिला बाजूला पाठवलं जातं. मग वेळ येते ती लहानग्या भावाची. तो त्याची बाजू सांगत असतो आणि काही काळाने व्हिडियो संपतो. यात त्या तिघांचं वागणं पाहून आपल्याला आपल्या लहानपणची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आपण किती दंगामस्ती केली ते यानिमित्ताने आठवतं. आज मोठं झाल्यावर या जुन्या आठवणींना आपण हसण्यावारी नेतो. अनेक वेळेस भाऊ-बहिणच काय, तर अगदी सवंगडयांसोबत केलेली दंगामस्ती आठवूनही आपण अलगद त्या जुन्या आठवणींच्या सुखावह विचारात गुंग होतो.

यासोबत एक गोष्ट नक्की कि लहानपणी जर आपल्याला या गोष्टींवरून आई, वडील वा इतर वडिलधार्यांनी वेळेनुसार समज दिली असेल, तर त्या गोष्टी आपल्याला लक्षात राहतात. लहान मुलांना मारणं योग्य नव्हेच. पण जर ती चुकत असतील तर त्यांना काही वेळेस कडक शब्दांत बोलणं सुद्धा महत्वाचं होऊन जातं. यात कॅमेऱ्यामागे असलेले वडील आणि इतर वडीलधारे तेच करताना दिसतात. अर्थात या व्हिडियोमध्ये घडलेल्या गोष्टींचा आधीचा आणि नंतरचा संदर्भ आमच्या टीमजवळ नसल्याने त्याविषयी अजून भाष्य करणं आम्ही योग्य समजत नाही. तसेच या व्हिडियोवरील लेखातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. आपणाला आमच्या टीमने आणलेले वायरल व्हिडीयोज वरील लेख आवडत असल्यास वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च करा. आपल्याला अनेक वायरल व्हिडीयोज विषयी लेख मिळतील. तसेच नेहमीप्रमाणे आमच्या लेखांना शेअर करायला विसरू नका. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.