Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलांनी केलेला हा अतरंगी ग्रुप डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अजब व्हिडीओ

ह्या मुलांनी केलेला हा अतरंगी ग्रुप डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अजब व्हिडीओ

गॅदरिंग म्हणजे नुसता दणकेबाज उत्साह… हा एकमेव असा उत्सव असतो ज्यात मुले शिक्षकांना अजिबात न भिता सेलिब्रेशन करतात. शाळेत असणार गॅदरिंग आणि कॉलेजमध्ये असणारं गॅदरिंग यात जमीन अस्मानाचा फरक आहे. शाळेत असणाऱ्या गॅदरिंगमध्ये काही मोजकी गाणी वाजतात, काही मोजके डान्स, गायन प्रकार सादर केले जातात. रंगीडो म्हारो ढोलना, गौरी गणपतीच्या सणाला, कोळीगीत आणि अजून 2-4 मोजकी गाणी. दरवर्षी तीच गाणी, तीच नाटकं, त्याच कला फक्त विद्यार्थी बदललेले असतात. कॉलेजमध्ये मात्र वेगळी गम्मत असते, वेगवेगळ्या गोष्टी, कलांना वाव असतो. वादविवाद स्पर्धा, गायन, वादन, नृत्य आणि विविध कला सादर केल्या जातात. तेही अगदी बिनधास्तपणे. शाळेत मात्र ठराविक मुलांना संधी दिली जाते. कॉलेजमध्ये मात्र तुम्ही अगदी लग्नात नाचतात, तसा डान्स स्टेजवर जाऊन करू शकता. एवढंच नाही तर तुमच्यात जी कला असेल मग ती अगदी कोलांट्या उड्या मारण्याची का असेना… पण त्या कलेला कॉलेजमधील गॅदरिंगमध्ये भाव मिळतो आणि वावही.

तर अशाच एका कॉलेजमधल्या गॅदरिंगचा व्हिडीओ आमच्यासमोर आला. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून त्याला तब्बल लाखोंमध्ये हिट्स आहेत. तर असं काय आहे या व्हिडीओत, हे पाहण्यासाठी आम्हीही उत्सुक होतो. चावट बॉयज ने सादर केलेला हा व्हिडीओ, असं शीर्षक असल्याने आमची हा व्हिडीओ पाहण्याची उत्सुकता अजूनच वाढलेली होती. या व्हिडीओत ना गायन होतं, ना नृत्य होतं, ना नाटक होतं. हे प्रकरण भलतंच काहीतरी होतं. म्हणजे मागे साउंडवर गाणी वाजत असतात पण पुढे स्टेजवर वेगळाच काहीतरी प्रकार चालू असतो. हा प्रकार डान्स आणि नाटक यांच्यामध्ये कुठेतरी येतो. याला अजून काही नाव मिळालेलं नाही पण याला आपण सध्या कॉमेडी म्हणून शकतो. मेरी निंद, मेरा चैन मुझे लोटा दो या गाण्यापासून तर देवा रे देवा देवा पर्यंत सगळ्या गाण्यावर या व्हायरल झालेल्या पोरांनी परफॉर्म केलं आहे. आणि शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडीओ पाहून खो खो हसत सुटता. इतकी भन्नाट कॉमेडी केलेली आहे.

म्हणूनच हा व्हिडीओ जबराट व्हायरल होतोय. 6 पोरांनी एकत्र येऊन ही जी मजा केली आहे, ती ना कुठल्या डान्स मधून जमली असती, ना कुठल्या नाटकातून… हे मनोरंजन त्यांनी केलेल्या कॉमेडी प्रकारातूनच जमलं असतं. रसिकांचे परिपूर्ण मनोरंजन करण्यात हे चावट बॉयज यशस्वी झालेले आहेत. आता आम्ही एवढं कौतुक करतोय, म्हणजे या चावट बॉयज ने नेमकी कोणती कला सादर केली आहे, हे जाणून घेण्यासाठी व्हिडीओ तर बघावाच लागणार ना भाऊ… निव्वळ आणि निखळ मनोरंजन असलेला हा दर्जेदार व्हिडीओ नक्कीच बघा. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *