Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलांनी केलेला हा जबरदस्त डान्स परफॉर्मन्स पाहून तुम्हीदेखील कौतुक केल्याशिवाय राहणार नाही

ह्या मुलांनी केलेला हा जबरदस्त डान्स परफॉर्मन्स पाहून तुम्हीदेखील कौतुक केल्याशिवाय राहणार नाही

गेली दीड दोन दशकं आपल्या आयुष्यात जे आमूलाग्र बदल झाले आहेत त्यांनी आपल्या जीवनाची दिशा अनेक अर्थांनी बदलली आहे. बरं हे बदल इतक्या चट्कन झाले आहेत की काही बदल समजून घेताना आजही दमछाक होते. पण काही बदल मात्र आपल्या अगदी चट्कन अंगवळणी पडले आहेत. किंबहुना त्यांचं स्वरूपच अस आहे की त्यांची सवय व्हावी आणि ती सुटू नये. होय, सोशल मीडिया हे त्याचं उत्तम उदाहरण होय.

विविध तंत्रज्ञान प्रगत होत असताना सोशल मीडियाने घेतलेली झेप ही नक्कीच लक्षणीय आहे. अर्थात सोशल मीडियाच्या या न भूतो न भविष्यती वाटचालीत आपल्या पैकी अनेकांचा वाटा आहेच. काहींचा प्रेक्षक म्हणून तर काहींचा त्या माध्यमातील क्रिएटर म्हणून. खासकरून युट्युब सारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर तर याची प्रचिती नेहमीच येते. यातही अनेक वेळेस कलाकारांचा भरणा जास्त असलेला दिसून येतो. कारण त्यांनी या माध्यमातून आजपर्यंत त्यांचे अनेक सुप्तगुण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहेत. यापूर्वीच्या माध्यमांतूनही स्वतःचे कलागुण दाखवता येत होतेच. पण युट्युब सारख्या माध्यमाने अवघे विश्वची माझा मंच हे समीकरण करून टाकल्याने अनेक जण पुढे येऊन स्वतःची कला सादर करताना दिसतात. त्यातूनच मग वायरल व्हिडियोज निर्माण होतात. पण एक मात्र खरं की सामान्य प्रेक्षक जे उत्तम असतं त्यालाच डोक्यावर उचलून धरतं.

आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो याचं उत्तम उदाहरण आहे. हा व्हिडियो रिषता कुमार यांच्या युट्युब चॅनेल वर पाहायला मिळतो. खरं तर तीन साडे तीन वर्षांपूर्वीचा हा व्हिडियो असावा. पण आजही त्यातील कंटेंट म्हणजे डान्स हा पाहण्यासारखा आहे. तसेच तो वाखाणण्याजोगा आहे. या डान्स परफॉर्मन्स मध्ये आपल्याला दोन तरुण डान्सर्स दिसुन येतात. आता डान्सर्स म्हंटले की एके ठिकाणी एकत्र जमून एकमेकांचे डान्स परफॉर्मन्स पाहणं हे आलंच. आपल्या कडे अनेक बागा, समुद्र किनारे यांच्या ठिकाणी ही होतकरू मंडळी डान्सची तयारी करताना दिसत असतात. तीच बाब आपल्याला या व्हिडियोतून दिसून येते. डान्सची खूप आवड असणारे हे सगळे जण एकत्र जमलेले दिसतात. मग अर्थातच गाणं सुरू होतं आणि या दोघांचा डान्स सुरू होतो. पाश्चिमात्य डान्स प्रकार करणं हा दिसायला सोप्पा प्रकार वाटत असला तरी तसा तो नसतो. त्यासाठी सतत मेहनत घ्यावी लागते आणि तेव्हाच त्यातील डान्स मुव्ह्ज मस्त होतात आणि अगदी गाण्यातील बिट्स ही पकडता येतात. या मुलांच्या डान्स मधून त्यांची ही मेहनत दिसून येते. तसेच डान्सवर असलेलं प्रेमही स्पष्ट होत. गंमतीचा भाग असा की गाण्याच्या मध्यावर ही मंडळी विनोदी स्टेप्स पण करतात. तसेच शेवटी केलेली स्टेप एका प्रसिद्ध गाण्याची आठवण करून देतेच देते.

आपण हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला हे जाणवलं असेल. किंबहुना आपण ते दुसरं गाणं ही ओळखलं असेल. पण सोबतच या परफॉर्मन्सचं ही कौतुक केलं असेलच. आपल्या प्रमाणेच आतापर्यंत जवळपास सवा दोन लाख लोकांनी हा व्हिडियो लाईक केला आहे. तर जवळपास दीड कोटी लोकांनी हा व्हिडियो पाहिला असल्याचं कळतं. यावरून या डान्स व्हिडियोची लोकप्रियता लक्षात यावी. तेव्हा मंडळी, आपण हा व्हिडियो पाहिला नसेल तर जरूर पहा. त्यावेळी तरुण डान्सर्सच्या या प्रयत्नांचं कौतुक ही करायला विसरू नका. किंबहुना ते तुम्ही करालच याची आम्हाला खात्री आहे.

कारण आम्हाला स्वतःला नेहमीच आपलं प्रोत्साहन आणि प्रेम मिळत आलेलं आहे. ते ही आपल्या टीमने लिहिलेल्या प्रत्येक लेखाला हे प्रेम मिळालं आहे. त्याविषयी आपली टीम आपली आभारी आहे. सोबतच हा पाठींबा येत्या काळात ही उदंड प्रमाणात मिळत रहावा ही आमची सदिच्छा आहे. आपली टीमही या प्रेमाचा मान राखत नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.