Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलांनी ‘गुलाबी आँखे’ गाण्यावर स्टेजवर केलेला हा अप्रतिम डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या मुलांनी ‘गुलाबी आँखे’ गाण्यावर स्टेजवर केलेला हा अप्रतिम डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

सोशल मीडियाचा वापर बहुतांश वेळेस मनोरंजनाचं एक साधन म्हणून होतो हे आपण जाणतोच. पण अस असलं तरी हे नवमाध्यम त्या पलीकडे जाऊन काम करतं. खासकसरून कलाकारांसाठी. कारण त्यांच्यासाठी सोशल मीडिया म्हणजे स्वतःतील कला सादर करण्याचं एक हक्काचं व्यासपीठ असतं. त्यांच्यासोबतच ज्यांना काही नवीन गोष्टी शिकण्यात रस आहे त्यांनाही मदत होतेच. तर ज्यांनी हे शिक्षण घेतलं आहे आणि आपल्या कलेचं सादरीकरण करायचं लोकांसमोर मांडायचं आहे त्यांनाही हे माध्यम मदत करतं. त्यामूळे खासकरून कलाकारांसाठी माध्यम एक पण फायदे अनेक अशीच सोशल मिडियाविषयी भावना असते.

अर्थात प्रत्येक जण या नवमाध्यमाचा आपापल्या परीने वापर करतात. उदाहरण घ्यायचं झालं तर डान्सचे क्लासेस किंवा इन्स्टिट्यूट यांचं उदाहरण घेऊ. कारण सोशल मीडिया म्हंटलं की डान्स हा कलाप्रकार त्यात हमखास आलाच. त्यामुळे हा कलाप्रकार शिकवणारे ही यात आलेच. त्यामुळे आपसूकच अनेक डान्स स्टुडियोज, इन्स्टिट्यूट आणि क्लासेस यांचे युट्युब चॅनेल्स असलेले आपण पाहतो. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही त्यांचे अकाउंट असतातच. अनेक वेळेस असंही होतं की केवळ कोरिओग्राफर हे स्वतःच्या नावाने युट्युब चॅनेल्स चालवत असतात. पण या दोहोंमागील ध्येय हे समान असते. ते म्हणजे आपल्या शिष्यांची कला आणि पर्यायाने आपली कला लोकांसमोर मांडणं हे ध्येय असतं. सोशल मीडियाचा विस्तार पाहता हे ध्येय साध्य ही होताना दिसतं. त्यामुळे अनेक वेळेस डान्स शिकवणारे आणि शिकणारे दोन्ही कलाकारांच्या कामाची ओळख आपल्याला होते.

वायरल व्हिडियोज मध्ये या डान्स स्टुडियोत केलेल्या डान्सचा समावेश असलेला दिसून येतो. आता आज आपल्या टीमने बघितलेल्या व्हिडियोचं उदाहरण घ्या ना. हा व्हिडियो अनुज जैन यांच्या परफॉर्मिंग आर्टस् इन्स्टिट्यूटच्या (मुव्ह इन) युट्युब चॅनेल वर पाहायला मिळतो. ही इन्स्टिट्यूट कोलकाता, पश्चिम बंगाल येथील असल्याचं कळतं. या व्हिडियोत आपल्याला या इन्स्टिट्यूटच्या दोन हुशार आणि कुशल डान्सर्सना बघण्याची संधी मिळते. त्यांचा डान्स परफॉर्मन्स जवळपास दीड मिनिटं चालतो. पण त्या दीड मिनिटांत ही हे दोघेही आपली छाप पाडून जातात. खरं तर हा व्हिडियो तीन ते चार वर्षांपूर्वीचा आहे. त्यावेळेस हे दोघेही लहान असणार. पण त्यांच्या डान्स मधून त्यांना असलेली समज कळून येते आणि त्यांचं कौतुक वाटतं. कारण पाश्चिमात्य डान्स करणं सोप्पं वाटत असलं तरी तो तसा नसतो. पण ही छोटी जोडी मात्र अगदी लीलया हा डान्स करून जातात. त्यात त्यांच्या चेहऱ्यावर कायम आत्मविश्वास आणि प्रसन्नता दिसून येते. त्यामुळे हा परफॉर्मन्स बघताना वातावरण पूर्ण वेळ प्रसन्न राहतं. तसेच कमी वेळेत पण उत्तम डान्स केल्याने ही आपल्याला हा डान्स लक्षात राहतो.

तसेच या डान्सची ज्यांनी कोरिओग्राफी केली आहे त्यांचं ही कौतुक करावंसं वाटतं. आपण लहान मुलांसाठी कोरिओग्राफी करतो आहोत हे ध्यानात ठेवत त्यांनी कोरिओग्राफी केली आहे. त्यामुळे त्यांचा डान्स बघताना वावगं असं काही वाटत नाही. आपणही हा परफॉर्मन्स बघितला असेल तर आपल्याला ही हे जाणवलं असेलच. नसेल बघितला तर आवर्जून बघा. कारण तसंही लहान मुलांचा डान्स म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. त्यात उत्तम कोरिओग्राफीची जोड दिल्याने बहार येते हे नक्की. तसेच सनम पुरी यांच्या आवाजातील ‘गुलाबी आँखे’ हे गाणं यात समाविष्ट असल्याने रंगत वाढत जाते. असो.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.